Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 17

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 17

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025-जानेवारी 2026

ऋतुजा चहा पिऊन खोलीत गेली, तिथे तिची आई बसलेलीच होती.

"आई काय चाललंय? का माझ्या मागे मागे करत आहेस?"

"मग काय करू? तू मला काही सांगत नाहीस, मी काही विचारलं तर बोलत नाहीस. मला कसं कळणार काय घडतंय? "
"आई सगळं ओके आहे, काय जाणून घ्यायचं आहे तुला?"

"तुझ्या आणि आकाशमध्ये सगळं ओके आहे ना?"

"आई सगळं ठीक आहे."

"मग तुमचं बोलणं का होत नाही आहे?"
"आणि हे तुला कुणी सांगितलं?"

"ऋतुजा तू सगळं खरं खरं सांग मला, काही काही गोष्टी सांगायच्या नसतात त्या आपोआप माहीत होतात. तू काही बोलत नाही आहेस पण काहीतरी आहे हे नक्की."

दोघींचं बोलणं झालं, ऋतुजाने काहीही सांगितलं नव्हतं.

***************

आकाश त्याच्या लॅपटॉपवर काम करत बसला होता.

"आकाश आत येऊ का?"

"आई ये गं."

"तुझ्याशी थोड बोलायचं होतं."
"बोल गं."

"उद्या सकाळी तुला देशमुख पॅलेस lमध्ये जावं लागेल ऋतुजाला इकडे घेऊन येण्यासाठी."

"आई सकाळी माझी महत्त्वाची मीटिंग आहे सो मला ऑफिसला लवकर जावं लागणार आहे, गाडी पाठवून दे ना."
"असं गाडी पाठवणं शोभत नाही, ते काय विचार करतील."

"ओके मी प्रयत्न करतो."

मीटिंग करून आकाश देशमुखपॅलेस मध्ये गेला. 
त्याचं तिथे खूप छान स्वागत झालं, पंचपक्वान्न तयार होतं.
दोघेही जेवण करून निघाले.
गाडीमध्ये दोघेही शांत होते,

"ऐक ना, प्लीज एकदा माझं ऐकून घे."
त्याने काहीही न बोलता गाणी लावली.
गाणं सुरु झालं,

तेरे संग यारा,
खुशरंग बहारा
तू रात दीवानी,
मैं ज़र्द सितारा

ओ करम खुदाया है
तुझे मुझसे मिलाया है
तुझपे मरके ही तो
मुझे जीना आया है

ओ तेरे संग यारा
ख़ुश रंग बहारा
तू रात दीवानी
मैं ज़र्द सितारा

ओ तेरे संग यारा
ख़ुश रंग बहारा
मैं तेरा हो जाऊं
जो तू करदे ईशारा

दोघांनी नजरानजर झाली, काही सेकंद एकमेकांना बघण्यात गेली. ती काही बोलणार तिचं लक्ष समोर गेलं आणि ती जोरात किंचाळली.

"आ....का..श.."

समोरून मोठा टेम्पो आला आणि जोरात आवाज झाला ध..डा..म.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all