Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 18

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 18
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

ऋतुजाला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती,
इकडे तिकडे बघितलं बाजूला तिची आई बसलेली होती.

"आई..." ती हळूच बोलली.

"ऋतुजा उठू नको, आराम कर."

"आई आकाश कसा आहे?"

"ओके आहे."
"मला बघायचं आहे, मला त्याच्याकडे घेऊन चल आई."

"ऋतुजा तुला आरामाची गरज आहे, तू आराम कर."

"आई मी सांगतेय ना तुला मला बघायचं आहे."

"डॉक्टर कुणालाही आत जाऊ देत नाही आहेत."

"काय? पण का?"

"कारण त्याची प्रकृती अजूनही नाजूक आहे."

ऋतुजा रडायला लागली,

"तू रडू नको, डॉक्टर बोलले आहेत तो लवकर बरा होईल. रडू नको गं, तुला त्रास होईल."

"आई प्लिज घेऊन चल ना मला. मला फक्त एकदा त्याला बघायचं आहे."

काही वेळाने तिथे नर्स आली, ऋतुजाने तिला विनंती केली.
नर्स ऋतुजाला त्याच्या बेड जवळ घेऊन गेली.
तिने त्याला बघितलं, तो निपचित पडला होता.
तिने बाजूनेच त्याच्या गालावरून हात फिरवला आणि तिला अश्रू अनावर झाले.

तिला तिच्या रूममध्ये शिफ्ट केलं,
तिने आईने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या.

"तू बेशुद्ध होती तेव्हा रात्र रात्र तुझ्या उशाशी बसायचा, त्याला  किरकोळ मार होता, त्याकडे दुर्लक्ष करून तो फक्त तुझी काळजी घ्यायचा. तू लवकर बरी व्हावी म्हणून प्रयत्न करायचा. एक दिवस तुझ्यासाठी औषध आणायला गेला आणि..."

"आणि काय? बोल ना आई काय झालं?"

"परत येताना आकाशच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याला जबर मार लागला. एक वेळा वाचला पण दुसर्‍यांदा त्याला नशिबाची साथ मिळाली नव्हती."

ऋतुजा खूप रडली, 

"आई काय अवस्था झाली आहे गं त्याची, आई मला आकाश बरा व्हायला हवा आहे."
"होईल देवाला प्रार्थना कर, आकाश लवकर बरा होईल."

ऋतुजा बरी होऊन तिच्या सासरी गेली, आकाश अजून रिकव्हर झालेला नव्हता. तो हॉस्पीटलाइज होता..
ऋतुजाला बरं वाटायला लागलं तिने ऑफिस जॉईन केलं, आकाश नसल्यामुळे त्याच्या बाबांवर कामाचा ताण आलेला होता, ऋतुजा त्यांना मदत म्हणून त्यांच्या सोबत ऑफिसला जायला लागली, दिवसभर ऑफिस करून रात्री आकाशा जवळ असायची.
दिवस सरत गेले,आकाश बरा होऊन घरी आला.. त्याला सक्त आराम सांगितला होता.
-----------------------------

प्रकाश त्याच्या कामात गुंतला होता, त्याने स्वतःला कामात गुंतवून टाकलं होतं.. त्याची चांगली प्रगती झाली होती. त्याच्या आईने त्याच्या लग्नासाठी मुलगी बघून ठेवलेली होती. पण प्रकाशने स्पष्ट नकार दिला होता. त्याची आई त्याला समजावून थकली होती. तो कधी एकदाचा लग्नाला तयार होतो याची वाट बघत होती.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all