Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 19

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 19
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

ऋतुजा आकाशला चेकअपसाठी हॉस्पिटलला घेऊन गेली.
ती डॉक्टरच्या केबिन मधून बाहेर आली आणि कुणाला तरी धडकली.

वळली, खाली मान घालत...
"सॉरी सॉरी.." म्हणतच मान वर करून बोलली.
वर नजर जाताच ती बघतच राहिली.

समोर प्रकाश उभा होता.
"तू? तू इथे कसा?"
" मी तर माझ्या मित्राला बघायला आलेलो पण तू इथे कशी?"

"मी...मी..ते...आकाश..."

"काय झालं आकाशला?"

"नाही, काही नाही. मला उशीर होतोय मी जाते."

ती जायला निघाली तसा तो बोलला,
"आधी माझ्याशी बोलायला आतूर असायची आता समोर उभा आहे पण तूला बोलायचं नाही आहे.

ती थबकली..

त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली,

"प्रकाश माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि."

"आणि काय? आणि होतं म्हणजे आता तुझं प्रेम नाही माझ्यावर."

"प्रकाश नीट ऐक मी काय बोलते. माझं तुझ्यावर प्रेम होतं पण आता आहे की नाही मला नाही माहीत. माझं आकाश सोबत लग्न झालंय, मी त्याच्यासोबत खुश नव्हते..कधीच नव्हते पण त्याने नेहमी माझ्यावर प्रेम केलंय, मला समजूत घेतलं. मी त्याच्याशी फक्त तुसट वागले. पण आता मला त्याला त्रास द्यायचा नाही आहे. आज माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे." ऋतुजा रडायला लागली.

तिचं बोलणं ऐकून त्याचे डोळे पाणावले.

त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं.
दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागले.

तिला मिठीतून दूर सारत त्याने तिला शेवटचा निरोप दिला.

आकाश हळूहळू बरा व्हायला लागला.

एक दिवस त्याने तिला न रहावून विचारलं.

"ऋतुजा तूला एक विचारू?"

"विचार पण आधी मला हे भरवू दे, गोळ्या घ्यायच्या आहेत ना मग जेवण वेळेवर व्हायला हवं."
तिने त्याला जेवण भरवलं. ती त्याच्या बाजूने उठली, त्याने तिचा हात पकडला.

"बस ना दोन मिनिटं."

"बोलं."

"मला सगळं खरं खरं सांग ना, मी तुझ्यावर नाही चिडणार गं, रागावणार सुद्धा नाही बीकॉज आय लव्ह यू.. आय लव्ह यू ऋतुजा."

त्याने तिला मिठीत घेतलं पण ऋतुजा खूप अस्वस्थ झाली.

'आकाश तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस आणि मी...नाही मला तुला दुखवायचं नाही आहे. माझ्यामुळे तुला त्रास होता कामा नये.' ती मनातल्या मनात विचार करू लागली.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all