ऋतुकाश प्युअर लव भाग 20
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
प्रकाश त्याच्या मित्राला भेटून घरी आला.
"कुठे गेला होता? कधीची मी वाट बघतेय."
त्याची आई किचनमधून बाहेर आली.
त्याची आई किचनमधून बाहेर आली.
"कुठे नाही." दारातून हलत-डुलत आत आला.
"तू दारू प्यायलास?"
"नाही गं, दारू नाही ते तर औषध आहे औषध सगळं दुःख विसरण्याचं औषध..तुला नाही कळणारं तू हो बाजूला."
आईला बाजूला करून तो खोलीत गेला,
ऋतुजाचं बोलणं त्याच्या कानात गुंजत होतं, 'माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे.' तिचा एक एक शब्द त्याच्या हृदयाला छेद करून जात होता. तो हॉस्पिटलमधून निघाला आणि बार मध्ये जाऊन बसला.
त्याची ती आता त्याची राहिली नाही या गोष्टीचा त्याला खूप त्रास होत होता. बराच वेळ एकांतात घालवल्यानंतर तो उशिरा घरी गेला होता.
खोलीत जाऊन तो बेडवर पडला. त्याच्या आईने त्याच्या पायातले जोडे काढले आणि त्याच्या अंगावर पांघरुन घालून दिलं.
----------------------------------------------
आकाश रात्री औषध घेऊन झोपला, ऋतुजा मात्र विचार करत बसली.
आकाशला कसं सांगाव या विचारात ती रात्रभर जागत बसली.
दुसर्या दिवशी सकाळी ऋतुजा आकाश साठी रूम मध्ये नाश्ता घेऊन आली,
आकाशला कसं सांगाव या विचारात ती रात्रभर जागत बसली.
दुसर्या दिवशी सकाळी ऋतुजा आकाश साठी रूम मध्ये नाश्ता घेऊन आली,
"आकाश थोड खाऊन घे, मी आज ऑफिसला जात नाही आहे, घरूनच काम करेल, बाबा बाहेर जाणार आहेत. बाकीचं छोटं मोठं काम कामिनी बघेल."
"ओके."
"तू काही खाल्लं आहेस?"
"नाही तू घे आधी, माझं आवरलं की करते नाश्ता."
"माझी काळजी घेता घेता स्वतःला विसरलीस."
"नाही असं काही आहे, आय एम ओके."
"ऋतुजा बस ना थोडा वेळ."
"ऋतुजा बस ना थोडा वेळ."
ती त्याच्या बाजूला बसली.
"बोलं."
"एक विचारू."
"ह्म्म."
"एक विचारू."
"ह्म्म."
"यु लव्ह मी."
"हा काय प्रश्न आहे?"
"सांग ना तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यावर प्रेम करते."
"सांग ना तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यावर प्रेम करते."
"असं काय विचारतो?"
"तुझ्या मनात कुणी दुसरं आहे का?"
"नाही असं खरंच काही नाही आहे."
"नाही असं खरंच काही नाही आहे."
"ओके तुला जेव्हा सांगाव वाटलं तेव्हा सांग."
ती काही न बोलता तिथून निघून गेली.
दिवस सरत गेले, बघता बघता एक महिना झाला.
आकाश आता पूर्णपणे बरा झाला. त्याने ऑफिस जॉईन केलं.
दोघेही सोबत ऑफिसला जायचे, आता गाडीत शांतता नसायची तर ऋतुजाची बडबड असायची.
ती बोलकी आहे हे आकाशला पहिल्यांदाच कळलं.
ती बोलत होती आणि तो तिला बघत होता.
आकाश आता पूर्णपणे बरा झाला. त्याने ऑफिस जॉईन केलं.
दोघेही सोबत ऑफिसला जायचे, आता गाडीत शांतता नसायची तर ऋतुजाची बडबड असायची.
ती बोलकी आहे हे आकाशला पहिल्यांदाच कळलं.
ती बोलत होती आणि तो तिला बघत होता.
तिने त्याला डोळ्यांनी विचारलं,
"काय झालं."
"काय झालं."
तो फक्त हसला.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
