ऋतुकाश प्युअर लव भाग 22
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

दिवसभर शाळा करून संध्याकाळी काम करू लागला. जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातू आईची औषध करायचा. शिक्षणाचा खर्च बाबा करायचे पण त्याचंही त्याच्या मनावर दडपण असायचं.
काही महिन्यांनी त्याची आई पण देवाघरी गेली आणि प्रकाश पोरका झाला.
आई बाबांनी त्याला एका आश्रमशाळेत घातलं, ती आश्रमशाळा चांगली होती, बाबा दरवर्षी तिथे डोनेशन द्यायचे, वातावरण देखील छान होतं पण प्रकाशला तिथे करमत नव्हतं. दोन-तीनदा त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात यश मिळालं नाही.
बाबांनी त्याला दोनदा पकडून आणलं आणि आता घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला.
आम्ही सोबत शाळेत जायचो, सोबत खेळायचो, सोबत अभ्यास करायचो..हळू हळू सोबत मोठे व्हायला लागलो.
आई बाबांनी माझा पंधरावा वाढदिवस खूप मोठा साजरा केला. खूप मोठी मोठी मंडळी आलेली होती.
आमच्या क्लासचे काही मुलं मुली पण आले होते. काही मुलांनी त्याला चिडवलं.

"बघ ऋतुजाचा मोठा वाढदिवस साजरा होतोय आणि तुझा..तुझा नाही कधी केला. तु त्यांचा सख्खा नाहीस ना. हा हाच फरक असतो आपल्यात आणि परक्यात."
काही मुलांनी त्याच्या मनात विश कालवलं. तो आतून निराश झाला, पार्टी सोडून गार्डनमध्ये जाऊन बसला. सगळ्यांनी त्याला खूप शोधलं, माझाही हट्टच होता प्रकाश आल्याशिवाय मी केक कापणार नाही.
बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर कुणीतरी त्याला घेऊन आलं. बाबा त्याच्यावर खूप चिडले होते, त्याला खूप बोलले पण आईने त्याला प्रेमाने विचारलं तेव्हा त्याने आईला सगळं सांगितलं. आईने त्या मुलांना चांगलंच खडसावले पण प्रेमाने त्यांनाही त्यांची चूक कळली आणि ते प्रकाशला सॉरी बोलले.

त्यानंतर आनंदात वाढदिवस साजरा झाला.
आता प्रकाश थोडा रुळायला लागला, पण आई बाबांची आठवण त्याला अस्वस्थ करायची अशा वेळी शांत ठिकाणी जाऊन बसायचा, मंदिराच्या बाहेर तलावाच्या बाजूच्या बाकड्यावरची जागा ठरलेली असायची. त्याचा आवडता लाकडी बाक आणि ती जागा, तिथेच त्याच्या मनाला शांतता मिळायची.
दिवस सरत गेले, बारावी झालो. आता आमची वेगवेगळ्या कॉलेजमध्ये अॅडमिशन झाली.
कॉलेजमधून परत आलो की दिवसभर काय काय झालं एकमेकांना सांगायचो. त्याला नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या होत्या. मला मैत्री करायला जरा वेळ लागतो, त्यामुळे मी एकटे पडले आणि त्याच वर्षी तुझे आई बाबा परदेशातून इथे शिफ्ट झाले. तुला यायला काही वर्ष बाकी होते पण तुझ्या आई बाबांशी जेव्हा जेव्हा भेट व्हायची चर्चा फक्त तुझीच असायची.
सगळं सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस अचानक.....

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा