Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 23

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 23
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

तुला यायला काही वर्ष बाकी होते पण तुझ्या आई बाबांशी जेव्हा जेव्हा भेट व्हायची चर्चा फक्त तुझीच असायची.
सगळं सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस अचानक.....
प्रकाशच्या आयुष्यात ती आली, आता विचारशील ती कोण?
तर ती होती सायली सायली जोगेवार.
तिचं प्रकाशवर एकतर्फी प्रेम होतं, कॉलेजमध्ये त्याच्या त्याच्या मागे मागे करायची.
एक दिवस ईशू आली माझ्याकडे.

"ऋतुजा तुला कळलंय का?"

"काय?"
"ती सायली प्रकाशच्या मागे मागे करत असते, शिकायला येते की प्रकाशच्या मागे मागे ते कळतंच नाही."

"जाऊ दे आपल्याला काय करायचंय."

"काय करायचंय म्हणजे? आपल्याला लक्ष ठेवायला हवं. अशी कुणीही कशी त्याच्या आयुष्यात येईल."

रात्री जेवणानंतर मी आणि प्रकाश दोघेही अभ्यास करत बसलेलो, मी हळूच विषय काढला.

"कोण आहे ती मुलगी?"

"कोण मुलगी?"
"तीच जी तुझ्या मागे मागे फिरत असते."
"कोण?"

"प्रकाश आता मार खाशील, मी कुणाबद्दल बोलत आहे हे तुला माहीत आहे."
"आणि मी ही तुला क्लिअर करतो की तिच्या आणि माझ्यामध्ये काहीही सुरू नाही आहे, त्यामुळे आगळ्यावेगळ्या रस्त्याने चालू नको."

मी खुश होऊन त्याला घट्ट मिठी मारली.
"तू का एवढी खुश होतीयेस."
"काही नाही तुला नाही कळणार."

दुसर्‍या दिवशी मी ईशूला सगळं सांगितलं आणि ती ही खूप खुश झाली.

"ऋतुजा तू मान अगर ना मान तू प्यार मे तो है."

ईशूच्या या वाक्याने माझं मन भरून आलं, मनातल्या मनात मी आनंदी होऊ लागली.  हळूहळू त्याच्या प्रेमात पडायला लागले. त्याला लपून बघणे, त्याच्या पाठलाग करणे सगळं सुरू झालं होतं. त्याला मात्र याची काहीच कल्पना नव्हती.

आमचं कॉलेज संपलं, बाबांनी त्याला कंपनी जॉईन करायला सांगितलं पण त्याला पुढे शिकून स्वतःचा बिझनेस उभा करायचा होता.
त्याने तशी मनाशी गाठ बांधलेली होती.
प्रकाश पुढच्या शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात जाणार होता. तो जाण्याआधी मला त्याला एकदा घट्ट मिठी मारायची होती, त्याला माझ्या मनातलं सांगायचं होतं.

"झाली पॅकिंग, मी मदत करू?"
"नको, झालंय सगळं."

मी धावतच आत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली तो मात्र माझ्याकडे निशब्द बघतच राहिला.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all