Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 24

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 24
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

मी धावतच आत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली तो मात्र माझ्याकडे नि:शब्द बघतच राहिला.

ऋतुजा बोलतच होती आणि आकाश झोपून गेला.
तिच्या आणि प्रकाशच्या प्रेमाची कहाणी अधुरी राहिली होती.
ऋतुजा आकाशच्या उशाशी झोपली, सकाळी आकाश उठला तेव्हा त्याच्या लक्षात आलं तो तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या डोळ्यावरून हात फिरवला, त्याच्या स्पर्शाने ती पटकन उठून बसली.

"तू कधी उठला."

"आताच."

"तू फ्रेश हो मी तुझ्यासाठी कॉफी आणते."

"नको आज मी खालीच सगळ्यांसमोर कॉफी घेतो."

सगळे नाश्ता करत असताना समीर आणि पूजाचा विडिओ कॉल आला, आकाशने रिसीव्ह केला.

"हाय आकाश, कसा आहेस? सॉरी आकाश इतकं सगळं होऊनही मी तिथे येऊ शकलो नाही, पण मी आईच्या मोबाईलवर रोज चौकशी करायचो."

"दादा मी ओळखत नाही का तुला? तू इतकं एक्सप्लेनेशन का देतोयेस?

"आकाश खरंच सॉरी आम्ही येऊ शकलो नाही."
"वहिनी इट्स ओके गं."
"बरं कसा आहेस तू? आणि ऋतुजा कशी आहे?"
"आम्ही ठीक आहोत, बोल तिच्याशी इथेच आहे ती."

विडिओ कॉल वर बोलणं झाल्यानंतर दोघेही रूममध्ये गेले.
"चल उशीर झालाय आपण निघूया."
"ऐक ना, मला बरं वाटत नाही आहे तर मी आज घरी आराम करतो."

"ओके मग मी जाऊन येते, जमलं तर लवकर येते."
"तू ही थांब ना घरी."
"नाही पण आज एक महत्वाची मीटिंग आहे."

"डोन्ट वरी, मी कामिनीला सांगतो मीटिंग उद्या अरेंज करायला."

ऋतुजाने चेंज करून ती लॅपटॉपवर काम करायला बसली.
"ऐक ना, पुढे काय झालं ते सांग ना."

मला वाटलं त्याच्या आयुष्यात सायली आली पण नाही तसं काही नव्हतं. सायलीचं प्रेम एकतर्फी होतं, प्रकाशला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं.
पण जेव्हा मला हे कळलं होतं त्यावेळी मी भांबावले होते, काहीतरी हातातून निसटल्यासारखं वाटलं होतं. जणू कुणीतरी दूर जातंय अशी फिलिंग मला पहिल्यांदाच वाटत होती. मला नक्की काय होत होतं माहीत नाही पण ईशूने मला जाणीव करून दिली की मी त्याच्यावर प्रेम करते, मला तो आवडायला लागला आहे. पण प्रेम म्हणजे काय हेच ठाऊक नसताना कुणावर प्रेम कसं काय होऊ शकतं.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all