Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 25

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 25
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

हळूहळू मी त्याच्यात गुंतत गेले, त्याला मात्र याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
याच दरम्यान बाबांचे आणि प्रकाशचे खटके उडाले. बाबांची इच्छा होती त्याने कंपनी जॉईन करावी पण प्रकाशला ते मान्य नव्हतं.
दोघांमध्ये वाद झाला आणि प्रकाश घर सोडून निघून गेला, मी सैरभैर झाले कुठे शोधू? काय करू काहीच कळत नव्हतं. आठ दिवसानंतर त्याच्या फोन आला, त्याचा आवाज ऐकून माझा जीवात जीव आला.
मी त्याला भेटायला बोलवलं, घरी यायला तयार नव्हता म्हणून बाहेर भेटायला बोलावलं. आमची बागेमध्ये भेट झाली. समोर येताच त्याला कडकडून मिठी मारली. आज मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगितलं, माझं त्याच्यावर प्रेम आहे तो मला खूप आवडतो आणि मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचंय.
त्याला काहीच ध्यानीमनी नसताना हे सगळं घडलं त्यामुळे थोडा अस्वस्थ झाला, काय बोलावं त्याला सुचेना, तसाच खाली बसला.

"बोल ना प्रकाश, तुला माझ्याबद्दल काय वाटतं?"

"ऋतुजा अगं मी कधी असा विचार केलाच नाही."
"मग आता कर ना काय हरकत आहे."

"मला वेळ हवाय."
"ओके घे तू तुझा वेळ, मी वाट बघेल."
प्रकाश तिथून निघून गेला. आमचं फोनवर रोज बोलणं व्हायचं पण दोन महिने उलटून देखील मला माझं उत्तर मिळालेलं नव्हतं.

शेवटी न रहावून मी त्याला भेटायला गेले, त्याला ईमोशनली ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याकडून होकार मिळवला. काहीही सोप नव्हतं, त्याला भीती होती बाबांना कळलं तर...?
त्यांना ते सहन होणार नाही रॅदर त्यांना ते चालणारच नाही.
हळूहळू त्याच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग निर्माण व्हायला लागली. त्याला मी हवीहवीशी वाटायला लागली आणि एक दिवस तो मला आय लव्ह यू बोलला.

तो दिवस माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस होता. खूप आनंदाचा दिवस होता. आम्ही त्या रात्री एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. एकमेकांप्रती मनात असलेली भावना व्यक्त केली.
आता आम्ही रोज फोनवर बोलायचो, संडे टू संडे भेटायचो.
आमच्यातील प्रेम बहरत चाललेलं होतं, प्रकाश माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करू लागला.
प्रकाश चाळीत रहायचा, एक दिवस त्याच्या घरासमोर त्याला एक बाई बसलेली दिसली थकलेली, आजारी. प्रकाशने तिची सेवा केली, तिला बरं वाटल्यावर ती तिथेच राहू लागली. ती त्याला मुलगा मानायची तो ही तिला आई म्हणू लागला.
त्या बाईचं आपलं असं कुणीच नव्हतं. आई मुलाचं नात घट्ट झालं.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all