Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 26

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 26
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

आमचं प्रेम फुलायला लागलं होतं, पण जे व्हायला नको तेच झालं. बाबांना सगळं कळलं, खूप राडा झाला. बाबांनी लगेच तुझ्याशी माझं लग्न ठरवलं आणि प्रकाशला नजरकैद केलं.

"आता तो कुठे आहे?" आकाशने लगेच विचारलं.
"माहीत नाही मला. माझी त्याची भेट नाही झाली. तुला चेकअपला नेले होते त्यावेळी अचानक एकमेकांना धडकलो होतो. तेव्हा मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की आता माझं त्याच्यावर प्रेम नाही, हे ऐकून थोडा हादरला."

ऋतुजाने आकाशकडे बघितलं.
"पण आता माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीच भावना नाही आहेत, आकाश तू गैरसमज करून घेऊ नकोस."

त्याने तिला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
ऋतुजाला खूप बरं वाटलं, मनावरचं ओझं कमी झाल अस वाटत होतं.

दिवस सरत होते, सर्व सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस अचानक ऋतुजाच्या सासरी प्रकाश आला, तोही मद्यधुंद स्थितीत.

"ऋतू डार्लिंग....माय ऋतू डार्लिंग.."

सगळे नाश्ता करायला बसलेच होते की आवाज आला. कोण आहे बघायला आकाश उठला.

दोन्ही हात दाराला पकडून प्रकाश उभा होता,

"कोण आहेस तू? आणि इथे का आला?"

"मी माझ्या डार्लिंगला भेटायला आलोय."


"तू निघ आधी माझ्या घरातून."

"माय डार्लिंग..."

ऋतुजा खाली आली तिच्या कानावर आवाज गेला तसं ती शॉक झाली तिच्या लक्षात आलं आणि तिने दाराकडे धाव घेतली.

दारात येताच तिचे पाय थबकले तिने प्रकाशकडे बघितलं आणि दुसर्‍याच क्षणी आकाशकडे बघितलं.
दोघांची नजरानजर झाली, तिने त्याला ईशारा केला. त्याला सगळं कळलं.

"कोण आहे रे दारात?" आतून आवाज आला.

"कुणी नाही, माझा मित्र आहे मी बघतो तुम्ही नाश्ता करा. "

त्याने प्रकाशचा हात पकडला आणि त्याला बाहेर गार्डनमध्ये घेऊन आला त्याच्या मागे ऋतुजा पण आली.

"ऋतुजा सांग आता याचं काय करायचं हा तर शुद्धीत नाही आहे."

"हा शुद्धीत येईपर्यंत याला आउटहाऊस मध्ये ठेऊया."
"कुणी बघितलं तर?"

"डोन्ट वरी मी आज घरीच आहे, मी काळजी घेईल."

"आर यू शूअर."
"यस."

दोघेही त्याला आउटहाऊस मध्ये घेऊन गेले, त्याला चेअरवर बसवून त्याचे हात आणि पाय दोरीने बांधले.

क्रमशः
ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all