Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 28

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 28
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

ऋतुजाने त्याचा हात हातात घेतला,
"आय एम सॉरी आकाश, मला लग्नाआधीच तुला सगळं सांगायला हवं होतं पण मी नाही बोलू शकले. मनात खूप भीती होती. बाबांनी ताकीद दिली होती कुठेही काही बोलायचं नाही, आय एम सॉरी खरंच मी मनातून बोलतेय."

"ऋतुजा मी तुझ्यावर रागावलेलो नाही आहे, तू आता मला सगळं प्रामाणिकपणे सांगितलंय यातच सगळं आलं."

आज बर्‍याच दिवसांनी ऋतुजा आनंदी दिसत होती. प्रकाश तिथून निघून गेला पण त्याच्या मनात अजूनही काहीतरी शिजत होतं.

ईशाचं तिच्याच नात्यातल्या मुलासोबत लग्न पक्क झालं, एंगेजमेंटच्या खरेदीसाठी ती ऋतुजाला घेऊन गेली.

दोघीही साडी बघत होत्या,
तितक्यात ऋतुजाच्या मोबाईलवर कॉल आला,
"बोल आकाश."
"काय करतेय." तो जरा लाडात येऊन बोलला.

"तुला माहीत आहे ना मी ईशू सोबत आली आहे."
"आय मिस यू, मी येऊ तुझ्याजवळ."

"अजिबात नाही, बरं दिसत का ते?"
"ते मला माहीत नाही, मी येतोय."

आकाश शॉपमध्ये गेला. ऋतुजा एक एक साडी अंगावर लावून बघत होती. हा दुरून तिला बघत होता.
तिचं लक्ष गेलं, त्याने डोळ्याने छान दिसते म्हंटल्यावर ही लाजली.

"ऋतुजा काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे तुझं?"

"कुठे नाही, मला ही साडी आवडली. तू नेसून बघ."
आकाश पूर्ण एक तास दूर उभा राहून बघत राहिला.

"चला झाली एकदाची तयारी." ईशूने सुस्कारा टाकला.

"ईशू तुझ्या नवऱ्याला सांगितलेस का की आपण इथे आलो आहोत."
"सोड ग."
"अरे असं नाही करायचं, तू तुझा होणारा नवरा आहे, त्याच्याशी नीट वागायचं."

"हो ग सासुबाई आता तुझंच ऐकून सगळं करते मी." ती हात जोडून तिची गंमत करायला लागली.

दोघी शॉपमधून निघाल्या, कॅफेमध्ये गेल्या. आकाश त्यांना जॉईन झाला, छान पैकी कॉफी प्यायले. ईशू तिच्या घरी गेली, आकाश आणि ऋतुजा त्यांच्या घरी गेले.

"काय मग झाली का मस्त शॉपिंग?" जानकीताई ऋतुजाकडे बघून म्हणाल्या.

"होय छान शॉपिंग झाली आहे मी पण दोन साड्या घेतल्या." ती जानकी ताईंना साड्या दाखवायला लागली. जानकी ताईला तिच्या साड्या खूप आवडल्या. दोघींच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आकाश त्यांच्याकडे बघतच राहिला.

"काय ग हा तिथे कुठून आला?"
"आला तो माझ्या मागे मागे."
"काय रे असं शोभ  का हे बायकोच्या मागे मागे जायला."

दोघी हसायला लागल्या.
क्रमश:

ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.