ऋतुकाश प्यूअर लव भाग 30
दिर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दिर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
प्रकाशच्या आईने त्याला समजावलं, तो त्या वेळेपुरता शांत व्ह्यायचा पण पुन्हा ऋतूजाची आठवण त्याला त्रास द्यायची.
दोन दिवस तो कामावर गेलाच नव्हता. त्याच्या आईने त्याला समजावून पाठवलं, तो आधी ज्या कंपनीत होता त्या कंपनीतून त्याला काढून टाकण्यात आलं होतं आता छोटी मोठी नोकरी शोधत त्याला एक छोटसं काम मिळालेलं होतं घर खर्च कसा तरी चालायचा.

त्याची आई पण आता एक दोन घरी छोटी मोठी कामे करायला लागली, प्रकाशचं दारूचं व्यसन वाढायला लागलं होतं.
एक दिवस त्याची आई न राहवून ऋतुजाला भेटायला गेली. तिला भेटून तो कसा वागतो काय करतो याबद्दलची पूर्ण कल्पना दिली.
"काकू, मी तुमची मनस्थिती समजू शकते पण यात मी काय करू शकते तुम्ही सांगा."
"तुझ्या बाबांना सांग ना याला त्यांच्या कंपनीत घ्यायला."
"बाबा नाही घेणार आता, खूप काही घडून गेलंय मागच्या काही महिन्यात.. बाबा त्याला जवळही करणार नाही."
"पण तू बोल ना बेटा तू बोललीस तर तुझे बाबा त्याला नोकरी देतील, लहानपणापासून त्यांनीच वाढवले ना मग आता का नाही मदत करणार."
"बाबांचा विश्वास नाही राहिला आता त्याच्यावर."
"का नाही राहिला आणि याला जबाबदार तो एकटाच आहे का?"
"पण काकू.."
"का नाही राहिला आणि याला जबाबदार तो एकटाच आहे का?"
"पण काकू.."
"मी हात जोडते ग तुझ्यासमोर."
"काकू अहो काय करताय? तुम्ही माझ्या पाया पडू नका. काकू मी प्रयत्न करते, आईशी बोलते ती वेळ बघून बोलेल बाबांशी."
प्रकाशची आई घरी आली, तो आत बसला होता.
प्रकाशची आई घरी आली, तो आत बसला होता.
"कुठे गेली होती."
"कामावर, अजून कुठे?"
"तेच विचारतोय अजून कुठे? आई खोट बोलायचं नाही मला सगळं माहीत आहे."
"हो ना मग सांगच तू आता मी कुठे गेले होते."
"आई शेवटचं विचारतोय सांग कुठे गेली होती नाहीतर..."
"नाहीतर काय? बोल.. काय रे पोकळ धमक्या देतोयेस."
"नाहीतर काय? बोल.. काय रे पोकळ धमक्या देतोयेस."
"काय ग आई सगळंच कसं कळत तुला?"
"मी ऋतूजाकडे गेले होते, तुझ्या नोकरीचं बघायला."
"का उगाच तिथे गेलीस? हे बघ आई मला छोटी मोठी नोकरी मिळाली तरी मी समाधानी आहे, तू उगाच याच्या त्याच्या पाया पडायला जाऊ नको."
"बरं बाबा नाही जात पण तू ही निट वागायला शिक, शहाणा हो.."
"मी एक दोन कंपनीत रिझुम देऊन ठेवलेला आहे बघु काय होतंय."
क्रमश:
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा