ऋतुकाश प्यूअर लव भाग 34
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
ऋतुजा तिच्या खोलीत गेली, फ्रेश झाली, तिचं मन कुठेच लागत नव्हतं. संध्याकाळची रात्र झाली आता येईल आत्ता येईल आत्ता कॉल येईल त्याचा असं करता करता अर्धी रात्र झाली. सगळे वाट बघत बसलेले होते. ऋतुजाला रडायला येत होतं, काय करावे कळेना. प्रतापराव आणि जानकी दोघेही त्याची वाट बघत बसलेली होते. पहाट झाली ऋतुजा तशी सोफ्यावर वाट बघत झोपलेली होती. जानकीताई खोलीत आल्या, तिला आवाज दिला तेव्हा तिला जाग आली.
"आई आकाश आला का?"
"नाही बाळा अजून नाही."
"आई काय झालं असेल? का आला नसेल तो?"
"बाबा चौकशी करायला गेलेत, तू घाबरू नकोस सगळं ठीक होईल."
"मला स्वस्थ बसवणारच नाही, मला जावंच लागेल मला जावंच लागेल." ती उठली.
"अग एकटी कुठे जाणार आहेस तू? ते शेत खूप दूर आहे."
ऋतुजा घरातून बाहेर पडली.
दुपार व्हायला आली तरी ती त्या गावी पोहोचलेली नव्हती वाटेतच तिची गाडी बंद पडली, गाडी तशीच ठेवून ती निघाली.
भर दुपारचं ऊन, सगळीकडे शांतता, निर्जन रस्ता त्यावरून एक एक पाऊल टाकत ती निघाली होती.
चालता चालता एका पायातील चप्पल तुटली, आता ती अनवाणी चालायला लागली. रस्त्यातील खळे गोटे पायाला रुतत होते, रक्तही निघायला लागलं होतं पण ती थांबली नव्हती, ती चालणं सुरूच होतं. थोडयासमोर जाऊन धडपडली.
चालता चालता एका पायातील चप्पल तुटली, आता ती अनवाणी चालायला लागली. रस्त्यातील खळे गोटे पायाला रुतत होते, रक्तही निघायला लागलं होतं पण ती थांबली नव्हती, ती चालणं सुरूच होतं. थोडयासमोर जाऊन धडपडली.
तेवढ्यात आवाज आला.
"सांभाळून ग पोरी."
भर उन्हात फक्त एक उसाचा रसवाला ठेल्याजवळ उभा होता.
भर उन्हात फक्त एक उसाचा रसवाला ठेल्याजवळ उभा होता.
तिने त्यांच्याकडे बघितलं.
चेहऱ्यावर स्मितहास्य आणत उभी झाली.
"काका बरी आहे मी."
"पोरी भर उन्हात अनवाणी अशी कुठे निघालीस? बस पोरी, उसाचा थंडगार रस पिऊन निघ."
"काका तुम्हाला मदत म्हणून मी नक्की प्यायले असते पण खरंच नको. माझ्याकडे पैसे नाहीत. मी घाई-घाईत पर्स विसरले आणि मोबाईलला रेंज पण नाही.
"पोरी मी उलट्या काळजाचा नाही ग, तुला गर्मीत थोडं बर वाटावं म्हणून म्हणतोय. ये बस सावलीत थोडावेळ."
ती टेबलवर जाऊन बसली.
बाजूला पाण्याने भरलेला जग ठेवलेला होता, त्यातून ती पाणी प्यायली.
बाजूला पाण्याने भरलेला जग ठेवलेला होता, त्यातून ती पाणी प्यायली.
त्या काकांनी तिच्या समोर रसाचा ग्लास धरला.
तिने लगेच हातात घेतला आणि घटघट प्यायली.
इकडे जंगलाकडे कुठे चाललीस इकडे तर एकही घर नाहीये. कुठे कोणाला शोधायला निघालीस?"
"माझ्या नवऱ्याला शोधायला निघाले, काल सकाळी इकडे शेताकडे आला होता आणि अजून परत आलेला नाही."
"जा पोरी, देव तुझं रक्षण करो."
क्रमश:
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा