Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 35

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्यूअर लव भाग 35
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

ती पुन्हा समोर चालत चालत गेली, तिने शेतं कधी पाहिलेलं नव्हतं. विचारत विचारत ती शेतापर्यंत पोहोचली. इकडे तिकडे, आजूबाजूला, सगळीकडे बघितलं तिला कुठेच कुणी दिसलं नव्हता. आकाशचा फोन लागत नव्हता, कामिनीचाही फोन लागत नव्हता. ती खूप घाबरली, रडायला बसली, काय करावं कळेना. जानकीला फोन करून सगळं सांगितलं, त्याही घरी रडत बसल्या होत्या. प्रतापने आपली माणसं चारही बाजूने पाठवून शोधमोहीम सुरू केली होती. पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन आले होते.

काही वेळाने ऋतुजाच्या मोबाईलवर कॉल आला.

"हॅलो."

"हॅलो, हा ज्यांचा मोबाईल आहे त्यांचा अपघात झालंय, तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या, इथे जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केले आहे." एवढा आवाज येऊन फोन बंद झाला. तिच्या हातातून मोबाईल पडला ती ही खाली कोसळली. काही क्षणाने भानावर आली आणि लगेच तिथून निघाली.

बऱ्याच लांब पायी आल्यानंतर मिळेल त्या गाडीने तिने हॉस्पिटल गाठलं.

तिथे चौकशी केली आणि सेकंड फ्लोअरला पोहोचली.

तिला समोर तो बसलेला दिसला. त्याला बघून तिला रडायला आलं.

ती हळूहळू त्याच्या जवळ जायला लागली.

त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.

"आकाश कुठे होतास तू? कालपासून सगळे काळजीत आहेत. तुझा फोन लागत नव्हता, तुझा कॉल आला नव्हता काय झालं काही कळतं नव्हतं. काय आहे हे सगळ.. तू कसा आहेस आणि हा मार? कसं लागलं हे आणि कामिनी कुठे आहे? ती होती ना तुझ्यासोबत?"

"हो हो जरा दम घे सगळं सांगतो, तू आधी बस बर इथे आणि काय अवस्था करून ठेवलीस."
ऋतुजाने त्याचा हात हातात घेतला, हातावर चुंबन घेतलं.

"तुला नाही कळणार आकाश कालपासून मी किती अस्वस्थ झाले होते, तुझी वाट बघत बसले होते आणि मी सकाळी तुला शोधायला निघाले.

"आम्ही रात्री निघालो आम्हाला निघायला उशीर झाला आणि रात्री आमच्या गाडीचा एक्सीडेंट झाला.
माझा मोबाईल बंद झाला होता आणि कामिनीच्या मोबाईलला रेंज नव्हती त्यामुळे आम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकलो नाही गावातून फोन मिळाला असता पण नंबर लक्षात नव्हते त्यामुळे फोन करता आला नाही."

"कामिनी कशी आहे?

"ती बरी आहे दुसऱ्या रूम मध्ये आहे."

"मी आधी फोन करून कळवते घरी."
तिने फोन करून आकाशबद्दल सांगितलं, तेव्हा सगळ्यांचा जीवात जीव आला.


क्रमश:

ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all