ऋतुकाश प्यूअर लव भाग 36
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
ऋतुजाने घरी फोन करून सांगितलं की आकाश बरा आहे.
"मी येतोय त्याला घ्यायला."
"नाही बाबा तुम्ही येऊ नका, मी घेऊन येते त्याला तुम्ही घरीच रहा आणि आम्ही निघतो आता इथून, मी अपडेट देत राहिलं तुम्हाला."
ऋतुजा कामिनीला भेटायला गेली,
"कामिनी कशी आहेस?"
"मी बरी आहे मॅडम."
"मी बरी आहे मॅडम."
"एक फोन करायचा ना किती काळजी करत होतो आम्ही सगळे."
"सॉरी मॅडम आम्ही कॉल करू शकलो नाही खरच सॉरी."
"इट्स ओके, तुला आता बरं वाटतंय ना."
"हो, बरं वाटतंय."
"तुझ्या फोनला रेंज आहे का? आईला कळवलेस का? आईला फोन कर, त्याही काळजी करत बसल्या असतील."
"नाही मॅडम आई घरी नाही आहे, ती मावशीकडे गेली आहे म्हणून मी तिला सांगितलेलं नाहीये, उगाच काळजी करत बसेल. ती येईपर्यंत मी पूर्णपणे बरी होईल त्यामुळे तिला काही कळणार नाही आणि तुम्ही हे सांगू नका प्लीज."
सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर ऋतुजा दोघांनाही घरी घेऊन गेली. दोन-तीन तासाचा प्रवास करून तिघेही घरी पोहोचले. जानकीताई आरतीचे ताट घेऊन दारातच उभ्या होत्या, त्यांनी तिघांचे औक्षवण करून भाकर तुकडा टाकला आणि त्यांना आत बोलावलं.
"काय रे आकाश, असा कसा वागतोस तू? काही कळवलं नाहीस काही नाही आम्ही सगळे काळजीत होतो."
"कामिनी कशी आहेस बाळा."
"मी बरी आहे काकू."
"मी बरी आहे काकू."
"तुम्ही दोघीही बसा."
"ऋतुजा रामू काकांना सांग पाणी आणायला."
"रामू काका पाणी आणा आणि आशा ताईला सांगा काहीतरी खायला बनवायला."
रामू काका आणि आशाताई चहा नाश्ता घेऊन आले. दोघांनीही थोडं खाल्ल्यानंतर फ्रेश झाले.
"काकू आता मी निघते."
"तू कुठे जाणार नाहीस." ऋतुजा तिच्या मागे येऊन तिला म्हणाली.
"हे बघ, तसंही तुझी आई नाही आहे. दोन दिवस तू इथेच आराम कर पूर्ण बरी झालीच की मग घरी जा."
"पण मॅडम.."
"इट्स ऑर्डर .."
"आशाताई यांना गेस्ट रूममध्ये घेऊन जा."
"पण मॅडम.."
"इट्स ऑर्डर .."
"आशाताई यांना गेस्ट रूममध्ये घेऊन जा."
कामिनीने फ्रेश होऊन आराम केला.
आकाश ही रूममध्ये आराम करायला गेला.
संध्याकाळी ऋतुजाने सर्वांसाठी ज्यूस बनवला आशा ताईच्या हातांनी कामिनी साठी पाठवला आणि आकाश साठी रूममध्ये घेऊन आली.
आकाश ही रूममध्ये आराम करायला गेला.
संध्याकाळी ऋतुजाने सर्वांसाठी ज्यूस बनवला आशा ताईच्या हातांनी कामिनी साठी पाठवला आणि आकाश साठी रूममध्ये घेऊन आली.
"बरं वाटतंय का आता?"
तो नुकताच उठून बसलेला होता.
तो नुकताच उठून बसलेला होता.
"हो बरं वाटतंय. ऋतुजा थँक यू सो मच."
"अरे थॅन्क्स कशाबद्दल.. मी काही वेगळं केलेलं नाही आहे, एका बायकोने नवऱ्या साठी जे करायला हव तेच केलं.
क्रमश:
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा