Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 37

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्यूअर लव भाग 37
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

आकाशने ऋतुजाचे आभार मानले.

"आकाश असं का बोलतोस? माझा तुझ्यावर अधिकार नाहीये का? असं बोलून तू मला परक करतोयस, मी काय वेगळी आहे का तुझ्यापासून, हे मला आवडलेलं नाही आहे."


"मला तस म्हणायचं नव्हतं सॉरी डियर सॉरी."

"ओके तू आराम कर मी येते."

"तू कुठे चाललीस?"

"ईशू कडे जायचं आहे, आज तिच्या दागिन्यांची खरेदी करायला जायचं आहे. तू येणार आहेस का मागे मागे." तिने त्याला चिडवलं.

"नाही आज मी नाही येणार नाही."तो हसला.

ऋतुजा ईशूकडे गेली, ईशू सोबत दागिन्यांच्या शोरूम मध्ये गेली. आज तिचा होणारा नवरा तिथे आलेला होता, सोबत तिची सासू पण होती. ईशू थोडी घाबरली 'सासूने मनासारखे दागिने घेऊ दिले नाही तर...' शंका कुशंकाने तिच्या मनात भिती निर्माण झाली. ती ऋतुजाला सगळं बोलली.

"ईशू प्लीज यार असा काही विचार करू नकोस, असं काही होणार नाही. तुझी सासू मला चेहऱ्याने बरी दिसते, मनानेही चांगलीच असेल आणि तू आधीच निगेटिव्ह विचार का करतेस? हे बघ चांगला विचार कर चांगले घडेल." तिने तिची समजूत काढली

मंगळसूत्र, अंगठी, जोडवे सगळं बघून झालं, ईशूला जे आवडतं होतं ते त्या दोघांना आवडतं नव्हतं.
बराच वेळ हो नाही हो नाही करत शेवटी सिलेक्ट झालं पण ईशूला ते सगळं काही आवडलेलं नव्हतं. तिने सासूचा मान ठेवावा म्हणून होकार दिला होता शॉपिंग करून ऋतुजा घरी आली.

ईशूचा कॉल आला, ती रडायला लागली.
"काय झालं अशी रडतेस का? कुणी काही बोललं का? विवान काही बोललाय का ?"

"तो काय बोलणार ग, तो आईचं सगळ एकतो. लग्न झाल्यावर माझा ऐकेल की नाही माहिती नाही. त्याच्या आईने जसं म्हटलं तसं तो करतो. त्याला स्वतःचं मत नाहीये का? मला तर मगाशी राग राग आलेला पण मी काही बोलले नाही आताही विवानचा कॉल येऊन गेला पण उचलला नाही मी. मला नाही बोलावसं वाटलं त्याच्याशी. तूच सांग ऋतुजा लग्नाआधीच हे हाल आहेत तर लग्नानंतर काय होईल माझं."

"ईशू तू खूप जास्त विचार करत आहेस. टेक इट इझी सगळं व्यवस्थित होईल तू फक्त आनंदी रहा. जास्त विचार करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल आणि हो बोल विवानशी त्याचं मन दुखावू नकोस, चल बाय."
ऋतुजाने फोन ठेवला ईशू मात्र विचार करत बसली.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all