ऋतुकाश प्यूअर लव भाग 38
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दुसऱ्या दिवशी कामिनी तिच्या घरी गेली,
तिची आई घरी आलेली होती.
तिची आई घरी आलेली होती.
"अगं कुठे गेली होतीस तू? तुझा फोन नाही लागत नव्हता, बरं माझ्याकडे चाबी होती म्हणून नाहीतर मला तुझी वाटच बघावी लागली असती."
"तू कधी आली?"
"मी आत्ता सकाळी आले, बरं तू सांग तू कुठे गेली होतीस आणि अशी थकलेली का दिसतेस? चेहरा असा का दिसतोय?"
"नाही मी बरी आहे, आकाशसरांसोबत जरा बाहेर गेले होते त्यामुळे दमले."
"अग पण रात्रभर त्यांच्यासोबत होतीस की काय?"
"नाही ग रात्री उशीर झाला म्हणून त्यांच्या घरी मुक्काम केला. बाकी काही नाही. बर मी फ्रेश होऊन येते."
"ये मी नाश्ता बनवून ठेवलाय दोघीजणी सोबत बसुन नाश्ता करूया."
कामिनीने थोडा वेळ आराम केला, त्यानंतर ती ऑफिसला जायला निघाली.
"आई मी येते ग."
"या वेळेला कुठे जात आहेस?"
"ऑफीसचं थोडं काम आहे, एका तासात येते मी."
आज ईशू आणि विवान बाहेर भेटणार होते, ईशू तयार झाली.
विवान तिला घ्यायला आला, दोघेही आधी गार्डनमध्ये गेले तिथे एकमेकांसोबत वेळ घालवला, एकमेकांबद्दल विचारांची देवाणघेवाण झाली त्यानंतर कॉफी प्यायला गेले.
तिथून विवान तिला एका मित्राच्या घरी घेऊन गेला. घरी कुणीही नव्हते फक्त त्याचा एक मित्र होता.
हे आल्यानंतर तो ही घरून निघून गेला. ईशूला यातलं काहीही आवडलेलं नव्हतं.
ती बोलली विवानला,

"विवान आपण इथे का आलोय? मला इथून जायचं आहे."
"चील ईशा, आपल्याला थोडी प्रायव्हसी मिळावी म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय."
"नाही.. नको.. आपण आता इतका वेळ घालवला ना एकमेकांसोबत.. आता कशाला प्रायव्हसी हवी आणि लग्नानंतर प्रायव्हसी मिळेलचं की आपलयाला."
तो सोफ्यावर बसला, तिलाही बाजूला बसवलं.
तिच्या खांद्यावर हात ठेवला,
"ऋतुजा थोड्या वेळाने आपण जाणार आहोत तोपर्यंत तरी माझ्या जवळ ये ना."
तिच्या खांद्यावर हात ठेवला,
"ऋतुजा थोड्या वेळाने आपण जाणार आहोत तोपर्यंत तरी माझ्या जवळ ये ना."
त्याच्या स्पर्शात तिला सुरक्षित वाटत नव्हतं, तिने त्याचा हात झटकला.
"काय करतोयस विवान?"
"जस्ट चील बेब.."
"आपलं लग्न व्हायचं आहे अजून."
"जस्ट चील बेब.."
"आपलं लग्न व्हायचं आहे अजून."
"तर काय झालं, होणारचं आहे ना."
"तेच मी म्हणतेय होणार आहे, झालेलं नाही अजून."
त्याने पुन्हा तिला जवळ खेचलं.
त्याने पुन्हा तिला जवळ खेचलं.
ईशूने त्याला ढकलले आणि ती तिथून बाहेर पडली, विवान रागाने लालबुंद झाला होता.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा