ऋतुकाश प्यूअर लव भाग 40
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
"मी त्याला धक्का देऊन तिथून पळून आले." इशू पुन्हा तिला बिलगली आणि रडायला लागली.
"तु रडू नकोस मी आहे तुझ्याबरोबर, घरी सांगितलंस का सगळं?"
"नाही मी घरी गेलेच नाही डायरेक्ट तुझ्याकडे आले."
"तू अजिबात घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत, चल आपण आधी तुझ्या घरी जाऊया, तिथून विवानच्या आई-वडिलांशी बोलूया."
ऋतुजा आणि आकाश दोघेही ईशूच्या घरी गेले. तिच्या आई-वडिलांना सगळं सांगितलं. ईशूच्या आई-वडिलांनी विवानच्या आई बाबांना फोन करून आम्हाला तुम्हाला भेटायचं असं सांगितलं, त्यांची मीटिंग ठरली. विवानचे आई-बाबा ईशूच्या घरी आले. ईशूने सगळा घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यांचाही त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.
ऋतुजा आणि आकाश दोघेही ईशूच्या घरी गेले. तिच्या आई-वडिलांना सगळं सांगितलं. ईशूच्या आई-वडिलांनी विवानच्या आई बाबांना फोन करून आम्हाला तुम्हाला भेटायचं असं सांगितलं, त्यांची मीटिंग ठरली. विवानचे आई-बाबा ईशूच्या घरी आले. ईशूने सगळा घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यांचाही त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.
लगेच विवानला बोलवण्यात आलं. ईशू त्याच्या समोर सगळं खरंखरं बोलली, पण तो हे सगळं मान्य करायला तयार नव्हता. उलट ईशावरच त्याने घाणेरडे आरोप लावले. पण ईशाने सगळे आरोप फेटाळून ती खंबीरपणे उभी राहिली आणि तिने सिद्ध केलं की विवान चुकीचा वागला.
त्यानंतर त्या दोघांचं लग्न मोडलं, ईशाच्या मनावर परिणाम झाला तिच्या चेहऱ्यावरचा हसू हरवलं, ईशा एकटी एकटी, शांत आणि गप्प राहायला लागली. बरेच दिवस असेच निघून गेले.
ऋतुजा काही दिवस तिला तिच्या घरी घेऊन आली, तिला मोकळीक मिळावी, ती आनंदी वातावरणात राहावी यासाठीच तिचे प्रयत्न सुरू होते. ईशा हळूहळू त्यातून बाहेर पडली, तिची जॉब करण्याची मनस्थिती नव्हती म्हणून तिने घरच्या घरी रांगोळीचे क्लास सुरू केले. काही दिवसातच तिच्या क्लासेस मध्ये खूप गर्दी वाढायला लागली. ईशाचं मन रमू लागत होतं, तिला बरं वाटत होतं.
काही दिवसांनी विवान पुन्हा तिच्या आयुष्यात आला तिला मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. तिला भेटण्याचा प्रयत्न करायचा. तिने त्याला साफ नकार दिला.
"ईशा मला माफ कर ग, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे."
"मला तुझ्याशी... तुझ्याशीचं काय आता मला आयुष्यात लग्नच करायचं नाही." असं सांगितलं.
ईशाने घरीच ट्युशन पण सुरू केले त्यात तिचा छान वेळ जायचा तिला बरं वाटायचं. त्या लहान लहान मुलांमध्ये रमून जायची. स्वतःचं दुःख, त्रास विसरून मनसोक्त हसायची, त्या मुलांसोबत ती पण लहान होत होती. या सगळ्या मुलांमध्ये राहून हळूहळू ती विवानला विसरू लागली.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा