Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 41

प्रेम
ऋतुकाश प्यूअर लव भाग 41
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

आकाश आणि ऋतुजाचं नातं फुलायला लागलं होतं. दोघे एकमेकांवर प्रेम करायला लागले होते. हळूहळू त्यांच्या नात्यात एकमेकांबद्दलची ओढ निर्माण होऊ लागली होती. मन आणि शरीर एकत्र बहरू लागले होते. एकमेकांत ते समरस होऊ लागले होते.

आकाश सकाळी जॉगिंगला गेला, तिथून येऊन ऋतुजासाठी कॉफी बनवली, कॉफी घेऊन रूममध्ये गेला तर ऋतुजा बेडवर नव्हती.
त्याने आवाज दिला तर ती वॉशरूम मधून निघाली.
त्याला ती अस्वस्थ वाटली.

“काय झालय ऋतुजा?..काय होतंय नेमकं?..हॉस्पिटलला जायचं का?"
“नाही, मला बसू दे आधी."

“हे घे कॉफी आणि लेट थोडावेळ तुला बरं वाटेल."
ती कॉफी प्यायली.
"छान झाली आहे कॉफी." अस्वस्थतेमुळे तिच्या आवाजात कंपन होतं.

"थॅन्क्स, तू आता आराम कर."

ऋतुजाने थोडावेळ आराम केला, तिला बरं वाटलं पण संध्याकाळी पुन्हा तिला मळमळ होऊ लागली.
“आकाश खूप मळमळ वाटत आहे."

“जायचं का हॉस्पिटलला? मी आईला बोलवू का?"
"जाऊया, पण आईला सांगू नको काही, उगाच टेंशन घेतील."

“हो.. तू तयार हो, मी गाडी काढायला सांगतो."

आकाश तिला हॉस्पिटलला घेऊन गेला..तिथे डॉक्टरने चेकअप केलं, काही टेस्ट करायला सांगितल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश रिपोर्ट आणायला गेला.
ऋतुजाची अस्वस्थता वाढत होती. आकाश आल्यानंतर काय सांगेल याच तिला टेन्शन आलं होतं.

न राहवून तिने फोन केला,
“हॅलो आकाश, मिळाले का रिपोर्ट्स?काय म्हणाल्या डॉक्टर? तू निघालास की वेळ आहे, ये रे लवकर..माझं टेन्शन वाढलंय."


“ऋतुजा.... अग मला बोलू तरी दे. तू दार उघड, मी दारातच आहे."

ऋतुजाने पटकन दार उघडला.

“इथेच होतास तर सांगायचं नाही का? मी आपली बोलतच गेले."
“मला आत येऊ देशील."
“हो हो ये."
“पानी दे ना प्लीज."
"हो हो.. हे घे पानी."
ती त्याच्या बाजूला जाऊन बसली.
त्याचा हात पकडला,

“आकाश आता तरी सांग ना, काय आहे रिपोर्ट मध्ये? डॉक्टर काय म्हणाले?"
आकाशने नर्वस चेहरा बनवला..

“आकाश असा चेहरा पाडुन का बसलास?.. सांग ना.. माझं बी पी वाढेल आता... बोल ना काय म्हणाले डॉक्टर...?
आकाश हळूच आवाजात बोलला.
“आपण आईबाबा होणार आहोत."


क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all