Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 42

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 42
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026


ऋतुजाने आधी न ऐकल्यासारखं केलं आणि मग तिच्या लक्षात आलं तर ती जोरात ओरडली.

"काय? तू खरं बोलतोय?"
आकाश उठला आणि तिचा हात हातात घेऊन
“हो ऋतुजा आपण आईबाबा होणार आहोत."

तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

“ऋतुजा आय एम सो हॅपी तू जगातला सगळ्यात मोठा आनंद मला दिलास, मला सगळंच दिलंस. थँक यु थँक यु सो मच ऋतुजा, बाबा होण्याचं भाग्य दिलेस तू मला. आज मी खूप आनंदात आहे, खूप आनंदात आहे."

तिच्या डोळ्यात पाणी तरळलं,
“मी पण खूप आनंदात आहे. चल देवाला नमस्कार करू आणि सगळ्यांना ही आनंदाची बातमी देऊया."

घरी सांगितलं आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळे खुश होते.

दुसऱ्यदिवशी आकाश ऋतुजाला हॉस्पिटलला घेऊन गेला, एकदा डॉक्टर कडून सगळे चेकअप केलं. डॉक्टरांनी काही मेडिसिन्स लिहून दिल्या आणि काही दिवस आराम करायला सांगितला.

आता डॉक्टरांनी सगळं नीट आहे म्हटल्यावर तिने लगेच तिच्या घरी फोन केला बाबांनी फोन उचलला.

“हेलो बाबा."
“बेटा कशी आहेस?...
“बाबा मी बरी आहे, खूप खुश आहे, आनंदात आहे तुम्ही पटकन आईला फोन द्या."
“काय ग आज बाबाशी बोलायचं नाहीये आईला फोन द्या डायरेक्ट म्हणतेस."

“बाबा, मी बोलेन तुमच्याशी आधी मला आईला काहीतरी सांगायचं प्लीज तिला फोन द्या ना."
त्यांनी तिच्या आईला बोलावलं.
“हॅलो ऋतुजा बोल बेटा कशी आहेस?"

“आई मी खूप आनंदात आहे तुला आनंदाची बातमी सांगायला फोन केला."

“आनंदाची बातमी? पण काय आनंदाची बातमी आहे?"
“आई तू आजी होणार आहेस."

“काय.. काय म्हणालीस तू?"
“हो तु जे ऐकलेस ना तेच बोलली मी तू आजी होणार आहेस आणि बाबा आजोबा."

आई तिच्या बाबांना सांगताना
"अहो ऐकलंत का आपण आजी आजोबा होणार आहोत."
"काय सांगतेस तू."

"हो हेच सांगायला फोन केला की आपण आजी-आजोबा होणार आहोत किती आनंदाची बातमी दिली ना आपल्या लेकीने मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या ऋतुजाच्या आयुष्यात इतका आनंदाचा क्षण येईल देवाचीच कृपा."

"देवाची कृपा तर आहेच ग, कारण आता तिच्या आयुष्यात आकाश आहे. प्रकाश नावाची बला गेली म्हणून तिच्या आयुष्यात हा आनंद आला लक्षात ठेव."

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all