Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 43

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 43
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

दोघांनीही अभिनंदन केलं,
"सगळं व्यवस्थित आहे ना?"

"हो आत्ताच आम्ही डॉक्टर कडून आलो, सगळं व्यवस्थित आहे, काही औषधे लिहून दिली आहेत आणि थोडे दिवस आराम करायला सांगितलं आहे."

“आकाश तुझ्यामुळे आज माझ्या मुलीच्या आयुष्यात इतके आनंदाचे क्षण आले, खरच थँक यु थँक यु सो मच."
“बाबा तुम्ही थँक्यू म्हणून मला परक करताय."

“आता नाही बोलणार, ठेवतो."
आई-बाबांशी बोलणे झाल्यानंतर ऋतुजाने ईशाला फोन केला
“हॅलो ईशू."

“हा ऋतुजा बोल, अगं तुलाच फोन करणार होते मी."
“तू मला फोन करणार होतीस? बोल ना."

“ऋतुजा मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती."

“ये मला सुद्धा..पण ईशू आधी तू सांग."
“ये नाही ऋतुजा आधी तू सांग."

तू सांग तू सांग करत करत बराच वेळ गेला. आकाश सगळं ऐकत होता. आकाशने ऋतुजाच्या हातून फोन घेतला. स्पीकर वर टाकला.

“ईशा आणि ऋतुजा, काय चाललंय तुमचं? आधी तू आधी तू करताय काय सांगायचे दोघी एकावेळी सांगा ना."

“बघाना जिजू, हि आधी सांगत नाही आहे."
“मग तू सांग ना, ती नाही सांगत तू सांग."
“ओके मी सांगते."

"ऋतुजा तुला तर माहीत आहे, आता माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नाही आहे आणि कदाचित पुढेही नसेल आणि म्हणून मी बाळ दत्तक घेण्याचं ठरवलंय."

"ईशू ही तर खूप छान बातमी आहे, म्हणजे आता मी मावशी होणार. आता मी सांगू."

"ह्मम बोल पटकन.."

"तू पण मावशी होणार आहेस."

"काय सांगतेस तू?"

"हो.."
"ऋतुजा मला खूप आनंद झालाय."
"आणि मलाही खूप आनंद झालाय तूझ्या निर्णयाचा. तू आज घरी ये, आपण सेलिब्रेट करुया."

सगळं आनंदात सुरू होतं आणि एक दिवस अचानक प्रकाशच्या मृत्यूची बातमी कानावर पडली.

आकाशला ही बातमी कळली, त्याला हे ऋतुजापासून लपवुन ठेवायचं नव्हतं कारण आज ना उद्या तिला हे माहीत झालंच असतं.

"ऋतुजा तो आता या जगात नाही राहिला."

त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरुन तिने ओळखलं.
"प्रकाश?"
त्याने होकारार्थी मान हलवताच,
ती खाली कोसळली.

"ऋतुजा..." त्याने तिला उचलून बेडवर ठेवलं, तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं.

तिने डोळे उघडले.
"कसं झालं हे सगळं?"
"गाडीने ॲक्सीडांट झालाय आणि जागीच मृत्यु झाला."

"त्याची आई?"

"ती कुठल्या तरी आश्रमात आहे."
हे सगळं ऐकून ऋतुजाला धक्का बसला.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all