ऋतुकाश प्यूअर लव भाग 44
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
ऋतुजा त्यातून सावरली, यात आकाशने तिला मदत केली. तिला समजून घेतलं. पण एक दिवस तिचा बी पी लो झाला, आकाश तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेला. ट्रीटमेंट झाली आणि दोघेही घरी आले,
"काय रे काय म्हणाले डॉक्टर?"
"आई काळजी करण्यासारखं काही नाही, बी पी लो झालं होतं."
"ओके तू तिला रूममध्ये घेऊन जा, मी ज्यूस घेऊन येते."
आकाश तिला रूममध्ये घेऊन गेला, तिला बेडवर झोपवल.
"ओके तू तिला रूममध्ये घेऊन जा, मी ज्यूस घेऊन येते."
आकाश तिला रूममध्ये घेऊन गेला, तिला बेडवर झोपवल.
जानकीताई ज्यूस घेऊन आल्या.
"अरे ही तर झोपली आहे."
"आई तू ज्यूस ठेव इथे, ती उठली की मी देईल तिला."
आता आकाश ऋतुजाची जास्त काळजी घ्यायला लागला.
त्याला ऋतुजा आणि त्यांचं बाळ याशिवाय काहीच दिसत नव्हतं. जेमतेम कळलेली बातमी पण तो खूप आनंदात होता. त्याला तिची खूप काळजी वाटत होती आणि म्हणून काल आणि आज ऑफिसलाही गेलेला नव्हता. या प्रेग्नंनसी मुळे त्यांचं नवरा बायकोच नात फुलत होतं.
म्हणतात ना, नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण प्रेमाची कळी फुलायला लागली की नातं आणखी फुलत जातं आणि ही गाठ घट्ट होत जाते.
आकाशने नेहमी सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं. कुठलाही प्रसंग असो नकारात्मक विचार करायचा नाही, यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. असं त्याला वाटून गेलं.
आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की समोरच्याच्या गोष्टी सकारात्मकतेने विचार करण्याची शक्ती मिळते. कुठल्याही प्रसंगात सकारात्मकता बळ देते.

ऋतुजाचा वेळोवेळी मूड चेंज व्हायचा. कधी कधी आकाशलाही कळायचं नाही की काय करावं आणि काय करू नये. तो प्रत्येक गोष्ट आईला जाऊन सांगायचा.0
एक दिवस आकाशने वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा विचार केला, तो बुकस्टॉलमध्ये गेला आणि दुकानदाराकडे गर्भसंस्कार आणि त्याविषयी डिटेल माहितीचे पुस्तके आणली. तो रोज रात्री पुस्तके वाचायचा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची काळजी घ्यायचा.
त्याने तिच्यासाठी पण छान छान पुस्तकं आणली होती. ती रोज एक पान तरी वाचायची. दिवसभर खोलीत राहून तिला कंटाळा यायचा मग एखादेवेळी लॅपटॉपवर पुस्तकं वाचायची.
कधी कधी जानकीताई तिला गोष्टी ऐकवायचा. तिच्यासोबत बागेत जायच्या. तिच्या आवडीचे फुल आणायच्या आणि तिच्या खोलीत सजवायच्या.
हळु हळू दिवस सरकत होते. बघता बघता ऋतुजाला तीन महीने पुर्ण झाले.
कधी कधी जानकीताई तिला गोष्टी ऐकवायचा. तिच्यासोबत बागेत जायच्या. तिच्या आवडीचे फुल आणायच्या आणि तिच्या खोलीत सजवायच्या.
हळु हळू दिवस सरकत होते. बघता बघता ऋतुजाला तीन महीने पुर्ण झाले.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा