Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 45

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 45
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

हळूहळू दिवस सरकायला लागले होते, तीन महिने आराम केल्यानंतर ऋतुजा आता ऑफिसला जायला लागली. आकाश तिथे तिची काळजी घ्यायचा, तिला ऑफिसच्या कामाचा बर्डन येऊ नये म्हणून तिला जास्त कामही देत नसे. पण उगाच घरी राहून बोर होईल म्हणून तिने ऑफिसला जाण्यासाठी तगादा लावला होता म्हणून आकाश तयार झाला. दोघेही सोबत जाऊन सोबत यायचे. कधी कधी तो तिला लवकर घरी आणून सोडायचा.

घरी काळजी घ्यायला त्याची आई होतीच. काय हवं नको ते सगळं जानकी ताई बघायच्या.

दुसऱ्या दिवशी दोघेही ईशाच्या घरी गेले, आज ईशासोबत बालसंगोपन मध्ये जायचं होतं. आज प्रोसिजर पूर्ण होऊन बाळ घरी येणार होतं.

"ईशा झाली का तयार?"

"आलात तुम्ही दोघे, मी रेडीच आहे निघुया आपण."

तिघेही आश्रमात गेले, तिथली फॉर्मलिटी पूर्ण करून ईशाने सहा महिन्याच्या मुलीला तिच्या कुशीत घेतलं. ती गोंडस बाळ तिच्याकडे बघून हसली त्या क्षणी ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. ते आनंदाश्रू घडाघडा वाहायला लागले. ऋतुजा आणि आकाशलाही खूप आनंद झाला होता, तिघेही घरी आले.

ईशाच्या आईने औक्षवणाची तयारी करून ठेवलेली होती. बाळाचं आणि तिच्या आईचं औक्षवण करण्यात आलं. आता नामकरण विधी करण्याचा ठरलं.

दुसऱ्या दिवशी थोड्याच लोकांमध्ये नामकरण विधीचा कार्यक्रम करण्याचं ठरलं,

सगळी तयारी झाली, हळूहळू पाहुणे यायला लागले.
ईशाने आधीच एकटीने सगळी तयारी करून ठेवलेली होती.
मुलीचे नाव आनंदी ठेवलं कारण तिच्यामुळेच ईशाच्या आयुष्यात आनंदा आला होता आणि समोरही तिच्या सोबत आनंदीच राहणार होती. नामकरण विधीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर तिचं रोजचं रुटीन सुरू झालं, सगळं व्यवस्थित सुरू होतं.

बघता बघता ऋतुजाला सहा महिने पूर्ण झाले, आकाश तिला रुटीन चेकअपला घेऊन जाणारं होता. आज सोनोग्राफी करायला सांगितलं होतं. आकाश रेडी झाला.

" ऋतुजा तू रेडी हो, आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया."

दोघेही तयार होऊन हॉस्पिटलला गेले. ऋतुजा सोनोग्राफी सांगितलेली म्हणून मनोमन खूप आनंदी झाली होती. आज तिला बाळाची हालचाल बघायला मिळणार होती, रोज जाणवत होतं पण आज तिला प्रत्यक्ष बघायला मिळणार होत. त्यामुळे ती जास्तच खुश होती. दोघेही वेटिंगरूम मध्ये बसलेले होते.
आकाश ऋतुजाकडे बराच वेळ बघत होता.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all