ऋतुकाश प्यूअर लव भाग 46
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
आकाश ऋतुजाकडे बराच वेळ बघत होता.
“काय झालं आकाश असा का बघतोयस?”
“तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघतोय, अगदी मनोमन हसत आहेस.”
“हो खरच मी आज खूप आनंदात आहे, आज मला बाळाची हालचाल बघायला मिळणार आहे. बाळ बघायला मिळणार म्हणून मला खूप आनंद होतोय.”
हॉस्पिटलला गर्दी असल्यामुळे ऋतुजाला जरा जास्तच वेळ बसावं लागणार होतं पण तरी तो वेळ ती कंटाळा न करता आनंदाने घालवत होती आणि आकाश तिच्यासोबत असताना तिला कधीच कंटाळा येत नव्हता. ती मोबाईल मध्ये बेबीजचे फोटो बघत बसली होती.
डॉक्टरच्या केबिन मधून एक बाई बाहेर आली, तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिला बघून ऋतुजा पटकन उठली. तिच्या मागे मागे गेली. ती समोरच्या बेंचवर जाऊन बसली. ऋतुजा तिच्या बाजूला जाऊन बसली.
“एक्सक्युज मी, मी काही बोलू शकते का?”
तिने फक्त हो मान हलवली.
तिने फक्त हो मान हलवली.
“काय झालं का रडताय तुम्ही?”
“माझं बाळ..” ती पुन्हा रडायला लागली.
“काय झालं बाळाला?”
“मला सहावा महिना सुरू आहे, माझा पोट खूप दुखत होतं म्हणून मी चेकअपला आले होते डॉक्टरने मला सोनोग्राफी करायला सांगितली आणि आता सोनोग्राफी मध्ये..” ती बोलता बोलता थांबली आणि रडायला लागली.
“काय सोनोग्राफीमध्ये काय?”
“सोनोग्राफीमध्ये दिसतय की माझं बाळ अपंग आहे.”
“काय?” ऋतुजाला धक्काच बसला.
“हो त्याच्या हाताची आणि पायाची वाढ झालेली नाही आणि समोर होईल की नाही याची काही शक्यता नाही. आता मी काय करू मला खरंच कळत नाहीये. मी घरी जाऊन काय सांगू कसं सांगू मला काहीच कळत नाहीये. डॉक्टरने सांगितलं की अबोर्शन करावा लागेल. मला माझं बाळ गमवायचं नाहीये. पण अशा बाळाला जन्म देणं म्हणजे समाज नाही स्वीकारणार. घरचे नाही स्वीकारणार. मला भीती वाटते माझं मातृत्व संपत की काय? मी काय करू मला काहीच कळत नाहीये.” ती रडत रडत बोलू लागली.
“काळजी करू नका, सगळं होईल नीट.” ऋतुजाला समोर काय बोलावं कळेना. तिची इतकी वाईट अवस्था बघून ती घाबरली. तिला शॉक बसल्यासारखा झाला. ती काही न बोलता चालत चालत समोर आली.
आकाशचं लक्ष गेलं.
“काय ग कुठे गेली होती? ऋतुजा काय झालं?”
ती काही न बोलता तिच्या जागेवर बसली.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा