Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 47

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 47
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026


तिला तीन चारदा विचारलं पण ती फक्त शांत बसून होती.
“त्या बाईचं बाळ..”

“काय झालं?”

“तिने सोनोग्राफी केली ना त्यात तिला कळलं की तिचं बाळ.. तिच्या बाळाची वाढ झालेली नाही. डॉक्टरांनी तिला अबोर्शन करायला सांगितले. तिला कळत नाहीये काय करावे? घरी काय सांगावे? तिला तिचं मातृत्व संपण्याची भीती वाटते. आकाश माझ्यासोबत तर असं काही घडणार नाही ना?"

“ऋतुजा प्लिज स्टॉप, काय बोलतेस तू. मनात आलं तसं काहीही विचार करू नकोस. अग अश्या काही केसेस असतात, प्रत्येकासोबत नाही घडतं हे सगळं आणि तू निगेटिव्ह विचार का करतेस? आपण निगेटिव्ह विचार नाही करायचा, आपल्यासोबत छान होईल असंच विचार करायचा आणि आपलं सगळं छान व्यवस्थितच होणार आहे. तू असा का विचार करतेस? कधी कधी असं होतं पण ह्या रेअर केसेस असतात. प्रत्येकासोबतच नाही होत असं आणि तू आधी शांत हो. हे घे पाणी घे, आता रिलॅक्स हो कुठलेही विचार करायचे नाही आणि निगेटिव्ह विचार तर अजिबात करायचा नाही. तुला बरं वाटत नाहीये का? मी डॉक्टरांशी बोलू का आधी तुझं चेकअप करायला. किती वेळ लागेल ते? ओके तू बस मी विचारून येतो."

आकाश आत जाऊन विचारून आला.

"ऋतुजा अजून पंधरा मिनिट आपल्याला बसावं लागेल." "ओके."
"तू रिलॅक्स रहा कुठलेही विचार करू नकोस.”

आकाश बोलला खरा पण विचारांना थांबवता येत नाही. ऋतुजाचे विचार चक्र सुरू होते.


काही वेळाने दोघेही आत गेले.
“हॅलो डॉक्टर.”
डॉक्टरने तिच्याकडे बघत स्माईल केली.
“काय म्हणतो छोटं बाळ?”

“मस्त.”

“मॅडम ही उगाच घाबरत होती. पॅनिक झाली होती.”

“का? कशासाठी?”
“आता इथून एक बाई रडत बाहेर गेली. तिच्याशी बोलली ही. तिचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. तिला रडताना बघून ही घाबरली आणि निगेटिव्ह विचार करू लागली. तुम्हीच बघा आता.” आकाश बोलून मोकळा झाला.

“रिलॅक्स मिस्टर आकाश, होत असं कधीकधी.”


“ऋतुजा तू घाबरू नको आणि निगेटिव्ह विचार तर अजिबात करायचा नाही.”

डॉक्टरने तिला सोनोग्राफीसाठी आत नेलं. सोनोग्राफीची प्रोसिजर सुरू झाली. डॉक्टरने ऋतुजाला स्क्रीन दाखवली. तिला तिचं बाळ बघता येत होतं. तिला खूप भारी वाटत होतं.

“डॉक्टर प्लिज आकाशला पण बोलवा ना, त्यालाही  बाळाला बघायचं आहे. तो ही आसुसला आहे हे सगळं बघण्यासाठी. प्लिज डॉक्टर, मला माहित आहे असं इथे चालत नाही पण प्लिज डॉक्टर काही वेळासाठी प्लिज.”

“ओके ओके. मी बोलावून घेते.”

डॉक्टरने नर्सला आकाशला बोलवायला सांगितलं.

तो आत आला, स्क्रीन वर बाळाला बघून तो खूप आनंदीत झाला. दोघांनी ते क्षण मनात साठवून ठेवले. दोघांचे डोळे पाणावले होते.
“तुम्ही आता बाहेर जाऊ शकता मिस्टर आकाश.”

डॉक्टरने त्याला बाहेर पाठवलं.

“ऋतुजा आता जास्त रेस्ट घे, बाळाचं वजन जास्त आहे. तुला जास्त काम करता येणार नाही आहे."

दोघेही घरी गेले.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all