ऋतुकाश प्यूअर लव भाग 48
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजा उठली तेव्हा रुममध्ये आकाश तिला दिसला नव्हता. तिने सगळीकडे शोधलं, तो कुठेच नव्हता. तिला खूप काळजी वाटायला लागली.
घरात कुणीच नव्हतं, ती खोलीत गेली.
घरात कुणीच नव्हतं, ती खोलीत गेली.
‘हा सकाळी सकाळी कुठे गेला? मला न सांगता गेला. सांगायला हवं होतं ना.’ असं विचार करून ती बेडवर बसली.
त्याला कॉल केला पण त्याचा मोबाईल घरीच होता. बराच वेळ ती वाट बघत बसली होती. बसल्या बसल्या अगदी तिचा डोळाही लागला. थोड्यावेळाने कुणीतरी रूमचा दार ठोकला.
ऋतुजाने दार उघडला तर समोर तिचे आई- बाबा, सासु- सासरे आणि ईशा उभे होते.
“हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डियर ऋतुजा, हॅपी बर्थडे टू यू” त्या सगळ्यांचा आवाज ऐकून ती अगदी भारावून गेली.
तिचा विश्वास बसत नव्हता, काही सेकंदात सगळे बाजूला झाले आणि मधात एक मोठा गुलदस्ता होता. तो गुलदस्ता हळूच बाजूला केला आणि समोर एक चेहरा दिसला, तो चेहरा आकाशचा होता. त्याला बघून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, ती त्याला जाऊन बिलगली.
आकाशने तिच्यासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती. ज्याची तिला अगदी कल्पनाही नव्हती.
सगळे आत आले, ऋतुजाला पटकन फ्रेश व्हायला सांगितलं. ती छान तयार होऊन आली. सगळ्यांनी तिच्यासाठी छान गिफ्ट आणि केक आणला होता.
केक कटिंग झालं आणि सगळे बाहेर फिरायला गेले. दिवसभराचं फिरून सगळे हॉटेलमध्ये गेले.
आकाशने हॉटेलमध्ये पार्टीची सगळी तयारी करून ठेवलेली होती. बलून डेकोरेशन, म्युझिक सगळं तिच्या आवडीचं केलेलं होतं.
सगळं छान चाललं होतं, सगळे एन्जॉय करत होते. अचानक ऋतुजा शांत झाली.
आकाशने हॉटेलमध्ये पार्टीची सगळी तयारी करून ठेवलेली होती. बलून डेकोरेशन, म्युझिक सगळं तिच्या आवडीचं केलेलं होतं.
सगळं छान चाललं होतं, सगळे एन्जॉय करत होते. अचानक ऋतुजा शांत झाली.
“काय ग ऋतुजा काय होतंय? दुखतंय का तुला? तुला बरं वाटत नाहीये का?”
“बाळाने किक मारली.”
“काय?”
“काय?”
“बाळाने किक मारली.” हे ऐकताच आकाशने त्याचे कान तिच्या पोटावर लावले. त्यालाही बाळाची हालचाल जाणवली.
त्याने तिच्या पोटावर हात ठेवला, आतून चाललेली हालचाल त्याने त्याच्या हाताच्या स्पर्शाने अनुभवली. त्यालाही खूप भारी वाटलं.
सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि हे दोघे त्यांच्या बाळाबद्दल बोलत होते. आज पहिल्यांदा आकाशने हा अनुभव घेतला होता, त्याला खूप खूप भारी वाटलं. त्याला खूपच आनंद झाला, ऋतुजाला डोक्यावर घेऊन नाचायचंच बाकी राहिलेलं होतं. इतका खुश होता तो.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा