Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 49

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 49
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

पार्टी संपल्यानंतर तीचे आई बाबा घरी निघून गेले. ईशा थांबली होती, आज ती त्यांच्याकडेच राहणार होती. घरी आले, फ्रेश झाले.

ईशा मोबाईल बघत बसलेली होती, आकाश आला.

“ईशा तू जा ऋतुजाजवळ, मी इथे झोपतोय.”

“मी इथे कम्फर्ट आहे, तू उगाच तुझी जागा बदलली तर तुला झोप लागणार नाही.”

“अगं नाही नाही तुमच्या दोन मैत्रिणींच्या गप्पा होतील ना. माझ्या चुगल्या सांगायला वेळ मिळेल तुम्हा दोघींना.” असं म्हणून तो हसायला लागला.

“अच्छा म्हणजे आम्ही चुगल्या करतोय तर तुझ्या.” पाठीमागेहुन ऋतुजा आली.

“अगं तसं नाही ग, आज इतक्या दिवसानंतर ती आपल्याकडे मुक्कामाला आली आहे म्हणून म्हटलं दोघी मैत्रिणी झोपा आरामात, गोष्टी सांगा, गप्पा सांगा, खूप दिवसानंतर तुमची भेट होतीय. मी झोपतो इकडे आरामात.”

“मला चालेल.” ऋतुजाने पटकन सांगितलं.

“हो पण मला चालणार नाही, तू जा ग तू झोप तुझ्या जागेवर, दिवसभराची थकली आहेस आणि आकाश तू पण जा, तू ही दिवसभराचा थकलेला आहेस. उगाच इथे असा झोपू नकोस. मी थोड्यावेळ मोबाईल बघते आणि मग मी झोपते. माझी पिल्लु पण झोपली असेल आई जवळ."

आकाश आणि ऋतुजा त्यांच्या रूम मध्ये गेले, साक्षी सोफ्यावर बसून मोबाईल बघत होती. बराच वेळ मोबाईल बघितल्यानंतर ती झोपली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ईशा घरी गेली, नाश्त्याला सगळे बसले होते. तेव्हा आकाश बोलला,

"आई बाबा मी ऋतुजाला घेऊन कोकणात जाईन म्हणतो."

"अरे पण ऋतुजाला तेवढा प्रवास झेपणार आहे का?"

"आई मी काळजी घेईन ना तिची, तिला थोडं बरं वाटावं म्हणून घेऊन जातोय, तिलाही चेंज वाटेल."

दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश तिला त्याच्या मावशीच्या गावाला कोकणामध्ये घेऊन गेला.

कोकणातलं वातावरण खूप छान होतं. ऋतुजाला खूप फ्रेश वाटत होतं. तिथे पोहोचल्या पोहोचल्या मावशीने खायचे खूप पदार्थ करून ठेवलेले होते.
ऋतुजा आणि आकाश तिथे पोहोचताच मावशींनी आरतीचे ताट आणून दोघांचा औक्षवण केलं.

“या रे पोरांनो. आता तुमचं पायगुण माझ्या घराला लागू द्या.
दोघेही मावशीच्या पाया पडले. मावशीने दोघांना आशीर्वाद दिला.

“पोरी जास्त वाकू नकोस ग, माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. खुश रहा सदा सुखी रहा.” असं म्हणून तिने दोघांचे कौतुक केलं, दोघांची दृष्ट काढली.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all