Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 51

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 51
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

दोघांनी छान जेवण केलं. बाजूला शेत होतं तिथे शेतात फिरायला गेले. हे सगळं गावाकडंचं वातावरण ऋतुजाने बघितलेलं नव्हतं त्यामुळे तिला खूप मस्त वाटलं.

तिने खूप एन्जॉय केलं, शेतावर मोठी विहीर होती विहिरीतून खाली उतरायला पायऱ्या होत्या. आकाश आणि ऋतुजा हळूहळू खाली उतरले, त्यांनी पाण्यातही खूप मस्ती केली.

शेतावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या होत्या, त्या बघून ऋतुजा खूप एक्साइड झाली, तिला खूप आनंद झाला, शेतातच त्यांचा वेळ गेला आणि बघता बघता संध्याकाळ झाली. शेतातून परत येत असताना त्यांना एका झाडावर काजवे दिसले, ते काजवे बघून ऋतुजा तिथेच थांबली.

“आकाश हे बघ काय आहे? किती सुंदर झाड आहे त्यावर लाइटिंग लावली आहे. बघ ना किती छान दिसतंय.”
आकाश जोरात हसायला लागला. त्यावर ऋतुजाने लहानस तोंड केलं आणि त्याला बोलली
“काय झालं तू असा का हसतोयस? मी काही चुकीचे बोलले का?”

“अग ते लाइटिंग नाहीये काजवे आहेत. चमकतात.. तुला बघायचं जवळून?”

“हो.”
“तू थांब मी आलोच..”

आकाश धावत त्या झाडाजवळ गेला, त्यातला एक काजवा त्याने हातात घेतला तिच्या जवळ येऊन उभा राहिला.

“हात समोर कर.”
तिने हात समोर केला, त्याने तिच्या हातावर तो काजवा ठेवला.
ती आधी घाबरली पण नंतर तिने हात सरळ ठेवून त्याला बघितलं.
“वाव किती सुंदर आहे, किती मस्त ना, मला अजून बघायचे आहेत.”

“चल, आपण त्या झाडाजवळ जाऊया.”

ते दोघे त्या झाडाजवळ गेले, ते झाड असं टिमटिमनार बघून तिला मस्त वाटलं.

बाजूला एक मचान होती,

“हे काय आहे?"

"याला मचान म्हणतात."
“मचान? हे काय असतं?”
“काही नाही याच्यावर चढायचं आणि तिथे मस्ती करायची.”

“ये खोटं सांगू नकोस प्लिज, आपण चढायचं का त्यावर?  आपण चढायचं का प्लिज? मला चढायचं आहे ना त्यावर.”

“नाही ग या अवस्थेत वरती नाही चढायचं. काही कमी जास्त झालं तर..”

“प्लिज प्लिज..”

“नाही तू जे म्हणशील ते करू पण मी तुला तिथे चढायला देणार नाही, हट्ट करू नकोस.”

“ओके..”

ती पुन्हा समोर जायला निघाली. तिला सुळसुळ आवाज आला म्हणून ती तिथेच थांबली, मागे वळली कुणीच नव्हतं. ती घाबरली..

“आकाश कुठे आहेस तू?”
तिने आवाज दिला,
पण तिथे कुणीच नव्हतं.

तिने चार-पाचदा हाक देऊनही त्याचा आवाज येत नव्हता. ती घाबरली, तिने चारही बाजूंनी नजर फिरवली. तिला कुठेच कुणीच दिसत नव्हत. ती चालत चालत थोडया समोर गेली. पुन्हा तसाच आवाज यायला लागला. आता मात्र तिला धडकी भरल्यासारखं झालं. ती भयंकर घाबरली, तिने पुन्हा त्याला आवाज द्यायला सुरुवात केली.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all