ऋतुकाश प्यूअर लव भाग 52
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
“आकाश कुठे आहेस तू? हे बघ आता थोड्या वेळात जर तू समोर आला नाहीस ना तर... घाबरून जीव जाईल रे माझा. श्वास वाढतोय माझा. तू आता गंम्मत करू नकोस माझ्याशी.” इतकं बोलूनही त्याचा आवाज आला नाही म्हणून ती पुन्हा त्या विहिरीजवळ गेली.
“हे बघ आकाश आता जर पाच मिनिटाच्या आत तू माझ्यासमोर आला नाहीस तर मी या विहिरीत उडी मारेल.” असं म्हणताचं त्याने मागेहून तिला आवाज दिला.
“ऋतुजा स्टॉप इट यार, काय करतेस? अगं मी गंमत करत होतो. तू तर एकदम घाबरलीस.”
“गंमत, ही गंमत करायची वेळ आहे का? मी किती घाबरले होते. एक तर अंधार आहे, आजूबाजूला काहीच नाही त्यात तू मला एकटं सोडलं, आता यानंतर असं केलंस ना तर याद राख कायमची सोडून जाईल मी तुला, कधीच परत भेटणार नाही.” असं म्हणत ती घराकडे जायला निघाली.
तो तिच्या मागे मागे गेला,
“ऋतुजा आय एम सॉरी, आय एम एक्सट्रीमली सॉरी. थांब ना प्लिज प्लिज प्लिज मला तुला दुखवायचं नव्हतं. मी सहज गंमत म्हणून केलं प्लिज सॉरी..” तो धावत धावत जाऊन तिच्यासमोर उभा राहिला. खाली गुडघ्यावर बसून कान पकडून तिच्यासमोर बसला.
“ऋतुजा आय एम सॉरी, आय एम एक्सट्रीमली सॉरी. थांब ना प्लिज प्लिज प्लिज मला तुला दुखवायचं नव्हतं. मी सहज गंमत म्हणून केलं प्लिज सॉरी..” तो धावत धावत जाऊन तिच्यासमोर उभा राहिला. खाली गुडघ्यावर बसून कान पकडून तिच्यासमोर बसला.
“सॉरी यानंतर नाही करणार प्लिज, आता तरी स्माईल दे प्लिज.” ती हसली.
“तू ऐकणार नाहीस ना.” असं म्हणत तिने त्याला उठवलं आणि त्याला बिलगली.
काही वेळाने दोघेही घरी गेले.
“काय रे पोरांनो आलात का फिरून?”
“हो आजी खूप मजा आली.”
“जा हात पाय धुऊन घ्या, जेवायचं करून ठेवलंय.”
“आजी मला आता भूक नाहीये, मी आता नाही जेवणार.”
“का ग पोरी भुक का नाही लागली?”
“दुपारी खूप जेवले मी, मला जेवण खूप आवडलं होतं. पण आत्ता नको मी काही वेळाने जेवेल.”
तुला जेवायचं असेल तर तू जेव. मी हात पाय धुऊन आले. दोघे फ्रेश झाले. आकाशने जेवण केलं, ती मात्र बाहेर अंगणात खाटेवर जाऊन बसली. वरती आकाशात चंद्र आणि चांदण्यांना बघत ती बराच वेळ गाणं गुणगुणत बसली होती.
काही वेळाने तो तिच्याजवळ बाहेर येऊन बसला.
“तुला ना अस आनंदात बघून मला खूप बरं वाटतंय. तुझ्या चेहऱ्यावर बघ किती आनंद दिसतोय. तुझा चेहरा किती खूलला आहे. मला तुला असं बघून खरंच खूप खूप आनंद होतोय.”
“हे सगळं तुझ्यामुळे घडलंय आकाश, तू मला इकडे घेऊन आलास ना म्हणून सो थँक्स टू यू माय डियर हबी.” दोघांनी हातात हात घेतले आणि वर आकाशात बघून गाणं गुणगुणू लागले.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा