ऋतुकाश प्यूअर लव भाग 53
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दोघांनी हातात हात घेतले आणि वर आकाशात बघून गाणं गुणगुणू लागले.
त्यांनतर झोपायला गेले.
“काय झालं ऋतुजा? झोप लागत नाहीये का?”
“काय झालं ऋतुजा? झोप लागत नाहीये का?”
“अजिबात झोप लागत नाहीये, अस्वस्थ वाटतंय.”
“का, काय झालं?”
“गर्मी पण वाटत आहे.”
“एक काम कर तू ये इकडे.”
त्याने तिला त्याच्या जवळ झोपवलं आणि एका हाताने वारा घालत तिला थोपटलं.
“तू झोप शांत मी तुला वारा घालतो.”
“अरे पण तू रात्रभर असाच बसणार आहेस का?”
“अरे पण तू रात्रभर असाच बसणार आहेस का?”
“मी माझं बघतो तू झोप आधी. चल डोळे बंद कर, चल डोळे मिट पटकन.” असं म्हणून त्याने तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. त्याने तिला एका हाताने थोपटलं आणि एका हाताने वारा घातला. काही वेळाने तिला शांत झोप लागली. त्याने हळूच तिला बाजूला सरकवून झोपवून दिलं आणि तोही झोपला.
सकाळी उठल्यावर ऋतुजाला खूप फ्रेश वाटत होतं.
“काय मग झोप लागली ना तुला?”
“हो रे, तू झोपवून दिलस ना मला म्हणून शांत झोप लागली. पण काय रे तू झोपलास ना नक्की?”
“हो गं मी पण शांत झोपलो होतो आणि मलाही छान झोप लागली. चल आता फ्रेश हो. आपल्याला मंदिरात जायचंय.
दोघांनीही ब्रश केले, मावशीने चहा टाकला. दोघेही चहा प्यायले. आंघोळीला छोटसं जुन्या पद्धतीचं बाथरूम होतं. बाथरूम मध्ये जाऊन ऋतुजा किंचाळली.
“काय झालं ग? अशी का किंचाळलीस?”
“बघ ना इथे पाणीच नाहीये, पाणी कुठून आणायचं आता?”
मागेहुन मावशी हसत हसत आल्या,
मागेहुन मावशी हसत हसत आल्या,
“अगं बाहेरून पाणी आणावं लागतं, तिथे नळ नाहीये. थांब मी तुला आणून देते पाणी.”
“मावशी.. मावशी.. थांबा. थांबा मी आणून देतो आणि तो पाणी आणायला गेला.
“अरे पोरा थांब विहिरीतून पाणी काढावं लागत.”
“मावशी काढतो मी.” असं म्हणत त्याने विहिरीतून पाणी काढलं. तोवर ऋतुजा बाहेर विहिरीजवळ जाऊन बसली होती, विहिरीतून असं पाणी काढताना ती पहिल्यांदाच बघत होती.
“मी काढून बघू प्लिज..थोडसं थोडसं..”
“नाही थोडसं ही नाही.”
“काय रे आकाश मग आपण इकडे येणार आहोत का नंतर. आता आलो आहोत मला सगळं करू दे ना. हे करू नकोस, ते करू नकोस, असंच सुरू असत तुझं, जा बाबा मला आणायलाच नको होतं तू एकटा यायला हवा होतास इकडे.”
"तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना बादली काढायला गेलीस आणि तुझ्या पोटाला बादली लागली तर उगाच कमी जास्त व्हायला नको ग. का अशी करतेस तू? हे सगळं आपण आपल्या बाळासाठीच करतोय ना, बाळाला त्रास व्हायला नको. आता इथे नीट बस उगाच गडबड करशील आणि विहिरीत जाऊन पडशील.” असं म्हणून तो हसायला लागला.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा