ऋतुकाश प्यूअर लव भाग 54
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
"आता इथे नीट बस उगाच गडबड करशील आणि विहिरीत जाऊन पडशील.” असं म्हणून तो हसायला लागला.
“मी इतकी वेंधळी आहे का? तुला वेंधळी वाटते का?”
“वेंधळी होण्याचा प्रश्न नाहीये कधी कधी असे अपघात होतात म्हणून म्हटलं.”
“जा बाबा तू बोलू नकोस माझ्याशी, मी चालले.” ती आत जाऊन बसली. तिला रुसून बसलेलं बघून तो तिच्याजवळ गेला.
“अशी रुसून बसू नकोस, मी तुला पाणी आणून देतो तू आंघोळ कर. आपल्याला अजून बाहेर फिरायला जायचं ना.”
“मंदिरात जायचं आहे?”
“हो, तुला तिथे जाऊन खूप मस्त वाटणार आहे. चल पटकन फ्रेश होऊन ये.”
“हो, तुला तिथे जाऊन खूप मस्त वाटणार आहे. चल पटकन फ्रेश होऊन ये.”
दोघेही फ्रेश झाले आणि जायला निघाले.
दोघेही मंदिरात गेले, मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर दोघे एका टेकडीवर गेले. टेकडी पर्यंत गाडी गेली त्यानंतर दोघेही उतरून थोडा समोर चालत चालत गेले.
“वाव, किती अमेझिंग? किती सुंदर आहे.”
“हो ना मला माहिती होतं तुला इथे येऊन खूप छान वाटणार आहे म्हणून मी तुला इथे घेऊन आलो.”
“हो ना मला माहिती होतं तुला इथे येऊन खूप छान वाटणार आहे म्हणून मी तुला इथे घेऊन आलो.”
“खरंच खूप सुंदर आहे बघ ना आणि तो धबधबा बघ किती सुंदर दिसतोय.”
सगळीकडे हिरवळ दिसत होती, मोठे धबधबे होते, वरून पाणी खाली पडत होतं, खालून नदी वाहत होती. निसर्गरम्य वातावरण होतं, नदीतून वाहणारे ते नितळ पाणीही इतकं सुंदर दिसत होतं.
"आकाश मला त्या पाण्यात जायची इच्छा होत आहे, बघ ना किती सुंदर दिसतोय. वाव इथे जर बोटिंग असती तर मी बोटिंगच केली असती. बघ ना किती सुंदर दिसतंय. आपल्याला त्या पलीकडे जाता येईल का?”
“नाही, तुझी अवस्था नाही की तू ट्रेकिंग करून जाणार आहेस, जे काही एन्जॉय करायचे ते इथूनच एन्जॉय कर.” तिने फक्त मान हलवली.
दोघांनी बराच वेळ तिथे घालवला. एकमेकांच्या मिठीत राहून एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांमध्ये सामावून गेलेत.
संध्याकाळ झाली आणि ते तिथून परत आले, आज मावशीचा नातू येणार होता, मावशी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवण्याच्या तयारीत होत्या.
“मावशी आज काय स्पेशल? खूप छान सुगंध येतोय.”
“नातू येतोय ना, सगळं त्याच्या आवडीचं बनवणार आहे.”
“अरे वा मावशी, म्हणून तुम्ही आज खूप आनंदात आहात तर.”
“अरे वा मावशी, म्हणून तुम्ही आज खूप आनंदात आहात तर.”
“खर आहे ग पोरी. आता माझ्या जीवनात काय राहिलंय, नातवाकडे बघून जगायचं.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा