ऋतुकाश प्यूअर लव भाग 55
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
आता माझ्या जीवनात काय राहिलंय, नातवाकडे बघून जगायचं.
“हो मावशी.”
“चला पोरांनो तुम्ही हात पाय धुवा.”
“मावशी आम्ही उद्या जाण्याचा विचार करतोय.”
“काय रे पोरांनो आता कुठे दोन दिवस झालेत आलात तर आणि आता जाण्याचं नाव काढताय, आता कुठे जायचं नाही आठ दिवस मस्त इथेच रहा. आता माझा नातू येतोय ना त्याच्यासोबतही वेळ घालवा.”
“नाही मावशी ऑफिसही आहे बरेच दिवस झाले मी ऑफिसला गेलेलो नाहीये.”
“तरीपण इकडे तर आत्ताच आलास ना.”
“नाही मावशी मला तिकडे काम होतं, माझं काहीच काम झालेलं नव्हतं. मी फक्त ऋतुजाला बरं वाटावं आणि तुझी पण भेट होईल म्हणून इकडे आलोय.”
"ठीक आहे रे पोरा पण माझ्या नातवाची भेट घे आणि मग जा, मी आग्रह करणार नाही. पण यानंतर माझ्या नातवाचं तोंड बघायला मी तिकडे येऊ शकणार नाही. तुला माझ्या नातवाला घेऊन इकडे यावं लागेल.”
“मी तुला इथून घेऊन जाईल माझ्याकडे, माझ्या नातवाची देखभाल कोण करणार? तुलाच घेऊन जाईल मी.” असं म्हणत सगळे हसले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि ऋतुजा निघण्यासाठी तयार झाले, मावशीने वाटेत खाण्यासाठी ऋतुजाला काही पदार्थ बनवून दिले होते. दोघेही मावशीच्या पाया पडले, दोघांनी नमस्कार केला आणि तिथून जायला निघाले.
वाटेत थांबून दोघांनी मावशीने दिलेले पदार्थ खाल्ले, काही वेळ थांबले आणि मग पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. संध्याकाळी ते त्यांच्या घरी पोहोचले.
संध्याकाळी गेल्या गेल्या ऋतुजा थकली असल्यामुळे आधी रुममध्ये जाऊन बसली. आकाशने बॅगा ठेवल्या आत मध्ये आणि दोन ग्लास पाणी घेऊन आला.
“पाणी घे.”
“थँक्स डियर..”
तो तिच्या बाजूला जाऊन बसला तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“काय ग खूप थकलीस?”
“नाही, थोडा थकवा वाटतोय मला पण इट्स ओके. थोडा वेळ आराम केला की बरं वाटेल मला.”
"मी आईला कॉल करून बघतो कारण घरात मला कुणीच दिसत नाही आहे."
त्याने जानकीताईला फोन केला.
"हॅलो आई कुठे आहेस? आम्ही घरी आलोय."
"मी मैत्रिणीकडे आले आहे, येते थोड्या वेळात. आज काका- काकी पण त्यांच्या गावी गेलेत. मी येते लगेच आणि तुम्हाला गरम गरम जेवण देते."
"ऋतुजा आई येतेय थोड्या वेळात, तुला भूक लागली असेल तर काही बनवू का मी तुझ्यासाठी?"
"नको.. मी आराम करते थोडा वेळ."
आकाश लॅपटॉपवर काम करत बसला होता.
आकाश लॅपटॉपवर काम करत बसला होता.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा