ऋतुकाश प्यूअर लव भाग 56
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजाच्या पोटात दुखायला लागलं.
आकाश ऑफिसला रेडी होत होता,
आकाश ऑफिसला रेडी होत होता,
"आकाश अरे माझ्या पोटात दुखतय."
"काय? तू बस आधी. आराम करतेस का थोडा वेळ की हॉस्पिटलला जायचं."
थोडा वेळ आराम करते.
ती झोपली थोडा वेळ,
"ऋतुजा बरं वाटतंय का तुला की जायचं हॉस्पीटलला."
"बरं वाटतंय तू जा ऑफीसला."
"ओके."
आकाश ऑफिसला गेला,
काही वेळाने ऋतुजाच्या पोटामध्ये पुन्हा दुखायला लागलं.
आकाश ऑफिसला गेला,
काही वेळाने ऋतुजाच्या पोटामध्ये पुन्हा दुखायला लागलं.
तिने आकाशला फोन केला,
तो लगेच घरी आला आणि तिला हॉस्पीटलला घेऊन गेला, चेकअप झालं सर्व ठीक होतं, तिला काही औषधं लिहून दिली.
तो लगेच घरी आला आणि तिला हॉस्पीटलला घेऊन गेला, चेकअप झालं सर्व ठीक होतं, तिला काही औषधं लिहून दिली.
हॉस्पिटलमधून दोघेही घरी आले,
"चल मी निघतो बाय." त्याने तिच्या माथ्यावर चुंबन घेतलं.
"बाय." तिने स्मितहास्य केलं.
तो दारातूनच निघून गेला.
ऋतुजा आत आली, तिची सासू वाट बघत बसलेली होती.
"काय म्हणाले डॉक्टर?"
"आई सगळं ठीक आहे."
"आकाश कुठे आहे ग?"
"आई तो दारातूनच गेला. ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग होती ना म्हणून."
"अच्छा तू काही खाल्लसं का? काही खातेस का?"
"आई सकाळी नाश्ता केला होता मी आता नको मी जरा फ्रेश होऊन येते मग बघते. काही खाण्याचा विचार करते आता सध्या नको मला."
"ओके जा मग तू आराम कर."
ती तिच्या खोलीत गेली, फ्रेश झाली त्यानंतर ती तिच्या बाळाशी गप्पा मारायला लागली.
"बाळा आज तुला असं बघून मला खूप आनंद झाला. आज तुझ्यावरची नजर हटतच नव्हती, फक्त तुला बघत राहावं असंच वाटत होतं. तुझ्या बाबाची पण इच्छा होती तुला भेटायची पण बिचारा काही बोललाच नाही. पण तू आलास की मग छान गट्टी जमेल तुझी आणि तुझ्या बाबांची. तो खूप प्रेमळ आहे. तू आलास की सगळं जीवन आनंदाने उजळून निघणार आहे."
ती स्वतःच्याच विचारात गुंग झाली.
दिवस आनंदात जात होते, ईशा आनंदीला घेऊन ऋतुजाकडे आली, ती काही दिवस इथे राहणार होती.
इथूनच ती तीचे ऑनलाईन क्लासेस करणार होती.
आता ऋतुजाला एकटं वाटणार नव्हतं की ती बोअर होणारं नव्हती.
दिवस आनंदात जात होते, ईशा आनंदीला घेऊन ऋतुजाकडे आली, ती काही दिवस इथे राहणार होती.
इथूनच ती तीचे ऑनलाईन क्लासेस करणार होती.
आता ऋतुजाला एकटं वाटणार नव्हतं की ती बोअर होणारं नव्हती.
ऋतुजाला सातवा महिना लागला. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे दोन कार्यक्रम करण्यापेक्षा एकच मोठा कार्यक्रम करण्याचं ठरलं.
मोठा हॉल, डेकोरेशन, मेन्यू सगळं आकाश आणि ऋतुजा ठरवणार होते, तिथीनुसार तारीख काढण्यात आली. त्यानंतर सगळं ठरवणार होते, आकाश रोज ऑफीसमधून लवकर यायचा आणि मग दोघेही एक एक प्लॅन ठरवायचे.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा