Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 57

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 57
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

"आई बाबा हॉल, मेन्यू, डेकोरेशन सगळं फायनल झालं आहे, तूम्ही एकदा बघून घ्या आणि तुमची घरची काय काय तयारी असते ती करा, आपल्याकडे दिवस कमी आहेत. इन्विटेशनचं आई तू बघ. बाबा तूम्ही बाकीची अरेंजमेंट बघा."

आकाश एक एक गोष्टी ठरवतं होता, ऐनवेळी गडबड व्हायला नको म्हणून सगळ्यांची कामे आधीच ठरलेली होती.

"अरे आम्हाला शॉपिंगला जायचं आहे, तू येणार आहेस का?"

"नको मला भरपूर काम आहे, तुम्ही जाऊन या."

तो खोलीत गेला,

"ऋतुजा झाली का तयार? शॉपिंगला जात आहेस ना?"

"आकाश तू पण चल ना सोबत."

"नको खरंच आज अजिबात वेळ नाही."

"प्लिज मला हेल्प होईल तूझी.. प्लिज."

"ओके ओके चील, येतोय मी."

तिघेही शॉपिंगला गेले.

बऱ्याच साड्या बघून झाल्या, काही साड्या नेसून पण बघितल्या.
तिला काहीच आवडतं नव्हतं.

तिने जानकीताईला हळुच विचारलं,
"आई मी वनपीस घेऊ का? तुम्हाला चालेल?"
तिने होकारार्थी मान हलवली.
बरेच वन पिस बघुन झाले.

शेवटी ऋतुजासाठी हिरव्या कलरचा वन पीस खरेदी करण्यात आला.

"ऋतुजा तुझा ड्रेस झालाय. त्याच्यावरचे कडे घेतले. तुला काही सामान लागणार असेल तर सांग आपण घेऊन येऊ."

"मला आता काही नको."

"अच्छा ठीक आहे."

सगळे घरी गेले, ऋतुजा खूप आनंदात होती.
आकाश ऑफीसला निघून गेला, भराभर दिवस गेले.
कार्यक्रमाची सगळी तयारी सुरू होती. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. ऋतुजाने सकाळी उठून आंघोळ करून पूजा केली.

"आई खूप दिवसानंतर मला छान प्रसन्न वाटतंय."

"हो ना, पूजा केलीस ना म्हणून. रोज पूजा करत जा, पूजा केल्याने मन प्रसन्न वाटतं."

"हो आई खरच आहे, रोज पूजा तुम्हीच करताय, त्यामुळे मला सवयच नाही पडली पूजा करायची. पण आता करत जाईल, खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय."


"अच्छा आता आवरायला घे, कारण पाहुणे दुपारी लवकर येणार आहेत, आपण कार्यक्रम लवकर लवकर संपवूया. बाहेरचं सगळं काम आकाश बघतोय, त्याने बाहेरची सगळी तयारी करून ठेवलेली आहे.

"आई डोहाळे जेवणाबद्दल थोडी माहिती सांगा ना."

"बस सोफ्यावर."

दोघीही बसल्या.

"हे बघ, डोहाळे जेवणासाठी हिरवी साडी, त्यावर हिरव्या बांगड्या. नंतर अंगावर हलव्याचे दागिने घातले जातात."

"पण आई मी तर ड्रेस घेतलाय."

"मग साडी घ्यायला हवी होती. साडीवर बाईचं सौंदर्य आणखीनच खुलतं, बर घेतला ना ड्रेस मग आता त्यावरच नटायचं. काही हरकत नाही तशीही या दिवसात तू जास्तच गोड दिसतेय.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all