Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 58

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 58
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

"आई मला अजून माहिती सांगा ना. काय काय करायला लागतं."
दोघींचं बोलणं सुरू होतं तितक्यात ऋतुजाची आई तिथे आली.
तिघींच्या गप्पा सुरू झाल्या, माहिती द्यायला सुरुवात झाली.

"फुलांची वाडी, पाच फळे आणि ओटी हे लागतं, तसेच फराळ, पंचपक्वान्न इतर खावेसे वाटणारे पदार्थ यांच एक ताट तयार करावं लागतं, त्यात पाच वाट्यांमध्ये प्रत्येकी एका वाटीत एक याप्रमाणे पेढा, बर्फी, जलेबी, गुलाबजाम इत्यादी ठेवुन त्यावर पुरी झाकुन ठेवतात आणि ते उघडायला लावतात. म्हणजे बघ तू पहिल्यांदा ज्या वाटीवरची पुरी उचलशील त्यावरून ठरेल तुला मुलगा होणार की मुलगी."

हे ऐकून ऋतुजा हसायला लागली.

"हसायला काय झालं ऋतुजा?"

"अहो आई त्यावरून सगळं कसं कळणार?"

"तू हसण्यावारी नेऊ नको, कळेल तुला सगळं हळूहळू. पुढे ऐक"

"हा कार्यक्रम संध्याकाळी व सुर्यास्ताच्या आधी करतात.
जिचे डोहाळजेवण आहे तिला हिरव्या रंगाची साडी किंवा ड्रेस किंवा ब्लाऊजपीस भेट म्हणून देतात, हल्ली इतरही भेटवस्तू दिल्या जातात. जसं गर्भसंस्कार पुस्तके, कुणी बाळाची फोटो देतं, बाळासाठी आवश्यक वस्तू,आईसाठी आवश्यक वस्तू इ.
वेगवेगळ्या प्रकारच्या फळांनी ओटी भरतात. फक्त सासूबाईंनी ओटी भरायची, इतर स्त्रियांनी पाच फळे हाती लावणे."

"अच्छा म्हणजे माझी ओटी तुम्हीच भरणार."

"हम्म त्यानंतर तू मुलगा की मुलगी होणारं हे बघायचं."

ऋतुजा पुन्हा हसली.
"हे खूप मजेशीर आहे ह."
"हसणे पुरे आता."

"फुलांची किंवा चांदण्याची वाडी भरणे या गोष्टी ऐच्छिक व प्रत्येक घराण्याप्रमाणे वेगळ्या असू शकतात."

"हौस असेल तर चांदण्यातले, बोटीतले, बागेतले, कोवळ्या उन्हातले असे वेगवेगळे डोहाळेजेवण पण करतात. कळलं जा,आता तयारीला लाग, मी पण माझं आवरते."

दुपार झाली, संपूर्ण तयारी झालेली होती, आता फक्त बायका येण्याची वाट बघायची होती.
"सगळे रेडी झाले.

"ऋतुजा थोडं खाऊन घे, रात्रीपर्यंत काही खायला मिळणार नाही तुला."

तिचं आवरलं.

ती आरश्यासमोर बसलेली होती, आकाश आला.
"आज तू खूप सुंदर दिसत आहे."

"थॅन्क यू डियर."
"हा बाबा पण खूप हँडसम दिसतोय."

"ओहह थॅन्क्स माय जान."
"चल पुर्ण तयारी झाली आहे, तू चल बाहेर."

तो तिला बाहेर घेऊन गेला.

हळूहळू पाहुणे जमायला लागले.

दोघेही खूप छान दिसत होते, मेड फॉर ईच अदर...


क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all