ऋतुकाश प्यूअर लव भाग 59
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026
कार्यक्रमाला सुरुवात झाली,
सजवलेल्या झुल्यावर ऋतुजाला बसवलं. तिला हळदकुंकू लावून तिचं औक्षवण केलं, त्यानंतर तिची ओटी भरण्यात आली. आता बाजूला आकाशला पण बसायला सांगितलं.
त्याचं पण औक्षवण केलं.
त्यानंतर ऋतुजाने उखाणा घेतला.
सजवलेल्या झुल्यावर ऋतुजाला बसवलं. तिला हळदकुंकू लावून तिचं औक्षवण केलं, त्यानंतर तिची ओटी भरण्यात आली. आता बाजूला आकाशला पण बसायला सांगितलं.
त्याचं पण औक्षवण केलं.
त्यानंतर ऋतुजाने उखाणा घेतला.
"तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून
डोळे माझे पाणावले
आकाश रावांचं नाव गोड,
पुरवा माझे डोहाळे."
डोळे माझे पाणावले
आकाश रावांचं नाव गोड,
पुरवा माझे डोहाळे."
"आता आकाश तुला नाव घ्यायला लागेल."
"नाही ह आई, मी नाव वगैरे काही घेणार नाही."
"नाही ह आई, मी नाव वगैरे काही घेणार नाही."
"घ्यावचं लागेल." सगळ्या एकसुरात बोलल्या.
"मेथीत मेथी...." तो पुढे बोलणारच होता.
सगळ्या ओरडल्या,
सगळ्या ओरडल्या,
"अजीबात नाही.... दुसरा घे."
"रूपं तिचे गोड
नजर तिची पारखी
शोधूनही सापडणार नाही
बायको ऋतुजा सारखी"
सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
आणि गाणे म्हणायला सुरुवात झाली.
आणि गाणे म्हणायला सुरुवात झाली.
"डोहाळे पुरवा,
मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा,
डोहाळे पुरवा..
झोपाळा सजवा वेलींनी,
गर्भवतीला झुलवा...
डोहाळे पुरवा...."
मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा,
डोहाळे पुरवा..
झोपाळा सजवा वेलींनी,
गर्भवतीला झुलवा...
डोहाळे पुरवा...."
"गर्भीणनारी तुझा गर्भ डौलदार
उदराला येऊं दे कृष्णदेवाचा अवतार.."
उदराला येऊं दे कृष्णदेवाचा अवतार.."
बायांची दोन गाणी झाली. आनंदीला ती गाणी ऐकावीशीच वाटत होती.
त्यांनी अजुन पुढे गाणी म्हणायला सुरुवात केली.
नऊ महिन्यांचा पाळणा,
पहिल्या माशीं आई पुशीती
लेकीबाईच डोहाळ कस?
आमच डोहाळ पुरवीजी आई
ओल्या न्हाणीवर लावावीजाई
जु बाळा जु बाळा जुजुरे
दुसर्या माशीं बाप पुशीतो
लेकीबाईच डोहाळ कस ?
आमच डोहाळ पुरवीजी बापा
ओल्या न्हाणीवर लावावाचाफा । जु बाळा ..............
गाणी म्हणून झाली,
लहान मुलींनी डान्स केला, सगळ्यांनी खूप मजा केली.

कार्यक्रम संपला आणि सगळे पाहुणे निघून गेले.
सगळं छान झालं होतं.
ईशु दोन दिवस राहणार होती.
ईशु दोन दिवस राहणार होती.
दिवस आनंदात जात होते.
शेवटच्या दिवसात आकाशने ऋतुजाला खुप जपलं, तो तिची खुप काळजी घ्यायचा. पोट खूप वाढल्यामुळे तिला बसायला उठायला त्रास व्हायचा. ऋतुजाची आई पण राहायला आल्या होत्या. सगळे मिळून तिची काळजी घेतं असतं.
त्या त्रासातही वेगळाच आनंद मिळतो ही अनुभूती ऋतुजाला आली.
तिला निट झोप लागावी म्हणून आकाश तिच्या उशाशी रात्रभर बसून असायचा.
तिची नीट काळजी घ्यायचा.
त्या त्रासातही वेगळाच आनंद मिळतो ही अनुभूती ऋतुजाला आली.
तिला निट झोप लागावी म्हणून आकाश तिच्या उशाशी रात्रभर बसून असायचा.
तिची नीट काळजी घ्यायचा.
नववा महिना लागला, सोनोग्राफी झाली, पुर्णपणे बेडरेस्ट सांगितलं होतं.
त्याचदरम्यान कामिनीचं लग्न झालं, ती जॉब सोडुन दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली.
त्याचदरम्यान कामिनीचं लग्न झालं, ती जॉब सोडुन दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली.
बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि ऋतुजाच्या पोटात कळा यायला लागल्या. तिला ऍडमिट केलं.
ऋतुजाने गोंडस मुलाला जन्म दिला.
सगळे दवाखान्यात जमले. समीर आणि पुजाही आले होते.
सगळ्यांना खूप आनंद झाला.
सगळे दवाखान्यात जमले. समीर आणि पुजाही आले होते.
सगळ्यांना खूप आनंद झाला.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा