Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 60 अंतिम

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 60 अंतिम
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

ऋतुजाच्या आयुष्यात बाळाच्या जन्माने आनंद आला होता.
घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिला खूप समाधान झालं.

एकेक जण येऊन बाळाला हातात घेत होते, त्याचं रूप बघून कौतुक करून निघत होते. शेवटी तिचे बाबा तिच्याजवळ आले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, बाळाला घेतलं डोळ्यात आनंदाश्रू आले होते. त्यानंतर बाळाला पाडण्यात ठेवून ते निघणार होते तितक्यात ऋतुजाने त्यांचा हात पकडला.

"बाबा थँक यु थँक यु सो मच आणि खरच सॉरी आज पर्यंत मी तुम्हाला फक्त दुःख आणि त्रास दिलाय, खरंच मला माफ करा बाबा."

"नाही बाळा तू चुकीची नव्हतीस, चुकीची कदाचित समोरची व्यक्ती होती. मी तुझ्या प्रेमावर शंका घेणारच नाही तू खरं प्रेम केलं होतंस मला माहिती आहे. पण कधी कधी  आपल्याला जे हवं असतं ना ते मिळत नाही जे मिळणार नाही असं वाटतं तेच आपल्या आयुष्यात येतं. मी जे केलं ते चुकीचं होतं पण काही हरकत नाही आज तुझ्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आलाय हा एन्जॉय कर. आता मागच्या कुठल्याही गोष्टींची आठवण करायची आहे किंवा तो विषय पण काढायचा नाही. आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच येणार आहे बाळा, काळजी घे." असं म्हणून तिचे बाबा तिथे निघून गेले.
'बाबा मी आकाशला सगळं सांगितलंय आणि त्याने मला समजून घेतलं.' ती मनोमन बोलली, डोळे बंद केले आणि
अलगद तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले.

ऋतुजाला डिस्चार्ज मिळाला,

बारा दिवसानंतर बाळाचे नामकरण झालं.

ऋतुजा आणि आकाश या दोघांची नावे मिळून "ऋतांश" नाव ठेवण्यात आलं. दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर फुलणारं हे फुल होतं, याच फुलाने त्या दोघांच्या आयुष्यात सुगंध दरवळला होता.

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाच्या आधी प्रेम येत असं नाही कधी कधी प्रेम लग्नानंतरही होऊ शकतं. ऋतुजा आणि आकाशचं लग्न झालं, मनात काहीही विचार नसताना त्याच्याशी अचानक लग्न झालं, त्यावेळी त्यांच्यात प्रेम नव्हतं पण नंतर हळूहळू त्यांचं प्रेम बहरू लागलं. आकाशने ऋतुजाला समजून घेतलं, तिच्या भूतकाळाला कुरवाळत बसला नाही तर तिचा हात धरून पुढे चालायला लागला.
त्यांच्या प्रेमाच्या वेलीवर अंकुर आलं, त्यामूळे दोघांचं नातं अधिकच घट्ट झालं. सगळं छान झालं आणि ते एकमेकांसोबत आनंदात राहु लागले.

समाप्त:

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all