Login

सांग कधी कळणार तुला ( भाग 2)

कोमलचे आई बाबा स्वानंदला सुट्टीत त्यांच्याकडे घेऊन गेले होते.आदित्य घरी आला.कोमल स्वयंपाक घरात जाऊ लागली.त्याने तिचा धरलेला हात तिला खूप काही सांगून गेला.ती अलगद त्याच्या मिठीत सामावली.त्याने हळूच आणलेला गजरा तिच्या केसात माळला तशी ती गांधाळली.दोघे एकमेकांत हरवून गेले.त्याने मंद संगीत लावले आणि तिच्या हातात हात घेऊन गाणं म्हणू लागला.' हे स्वप्न तर नाही ना ' असा प्रश्न तिला पडला.त्याने हळूच तिच्या डोळ्यात बघत ' काय झालं?' म्हणून विचारलं.तिच्या डोळ्यातले मोती हळूच त्याच्या हातात आले.आता मात्र तो गोंधळून गेला.तिला बसवून नक्की काय झालं ते सांगण्यासाठी गळ घालू लागला." खरं सांगू?हे जे घडतंय ते खरंच वाटत नाहीये.पण असं घडावं म्हणून मी नेहेमीच आसुसलेली होते.लग्न होण्याआधीपासून.पण तुमचं वागणं,माझ्यापासून दूर दूर राहणं मला नेहेमीच संभ्रमात टाकायचं.मी आवडत नव्हते का तुम्हाला?नक्की काय कारण होतं?मी सुखी नाहीये आसं नाहीये पण नवलाईच्या दिवसांत जे अनुभवायला हवं होतं ते नक्कीच मी मिस केलंय असं वाटतं.आता ते आठवायच नाहीये मला पण उत्तर मात्र नक्कीच हवं आहे.
कोमलने आडून आडून सुचवलं पण आदित्यने नेहेमीच हनिमूनचां विषय टाळला.त्याचे आई बाबा त्यांना मोकळीक देत नव्हते आणि तो ही नवीनच संसारात पडला होता.त्यामुळे आई बाबा काय सांगतील ते ऐकत होता. ' कशाला जावं लागतं बाहेर फिरायला? आधीच काय कमी खर्च झाला आहे लग्नात त्यात अजून खर्च कशाला?नसती थेरं हवीत कशाला? बायको डोक्यावर मिरे वाटेल आश्यानं. ' असं त्यांनी आदित्यच्यां मनात भरवल होतं.
आदित्यच वागणं खरंतर कोमलला कोड्यात टाकणारं होतं.नव्याची नवलाई , आतुरता कधी तिला जाणवलीच नाही.बाकी सगळं ठीक होतं पण काहीतरी कमी होती.पण ती काय ते मात्र कळत नव्हतं.लग्नाला जेमतेम तीन महिने होत नाहीत तर बाळाची चाहूल लागली. कोमलला काहीच कळत नव्हतं.इतक्या लवकर आपण ही जवाबदारी पेलू शकू का ह्या विचाराने तिला काहीच सुचत नव्हतं.पण आईने तिला छान समजावलं आणि ती नव्या जवाबदारीसाठी आनंदाने तयार झाली.आदित्यच्या मनात काय होतं कोण जाणे पण कोमल मात्र आपली काळजी घेत होती.आदित्य आनंदी आहे असं वाटत होतं पण तो स्वतःहून काहीच मनमोकळे बोलायचा नाही पण कोमलची काळजी मात्र घेत होता.
तिला वाटायचं की त्याने आपले लाड पुरवावेत,फुलासारखं जपावं,आपल्या पुढे मागे करावं पण तसं काही होत नव्हतं.सासू सासरे सारखे भांडायचे,वाद घालायचे, एकमेकांना समजून न घेता नेहेमीच एकमेकांवर ताशेरे ओढण्यात त्यांचा वेळ जायचा.कोमलशी ते बरे वागायचे.आता ते गावी असल्यामुळे कोमल आणि आदित्य दोघांचं जग होतं.आता तो आपल्या अधिक जवळ येईल असं वाटत असताना आदित्य मात्र तिच्याशी अंतर राखून वागत होता.तिची काळजी मात्र तो घेत होता.तिला हवं नको याची आस्थेने चौकशी करायचा.डॉक्टरकडे सोबत यायचा.सगळं छान होतं पण कोमल मात्र कोमेजली होती.बहरण्या ऐवजी सुकत चालली होती.आपल्या नवऱ्याने कधीतरी चोरून प्रेमाने हात धरावा,मिठी मारावी,कधी एखादा गजरा आणावा अशी तिची साधी स्वप्न होती.पण त्याच्यात आतुरता कधीच जाणवली नाही.आदित्यच तिच्याशी वागणं याचं तिला पडलेलं कोडं तसच होतं.तिला वाटायचं त्याने सतत आपल्या बरोबर असावं.फोटो शूट करावं.पोटावर हात ठेवून बाळाच्या हालचाली घ्याव्यात.पण तो मात्र तिच्यापासून दूर झोपायचा.तिची स्वप्न स्वप्नच राहिली होती.
बाळंतपणासाठी ती सातव्या महिन्यात माहेरी गेली.तिचं डोहाळ जेवण होतं.सगळ्या आनंदी आनंदात होत्या.कोमलचे अगदी लाड पुरवले जात होते.कोमलसुद्धा खुशीत होती.कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे पाहुणे गेले आणि कोमलने आईपाशी मन मोकळं केलं.
"काहीतरीच असतं बाई तुझं.अग इतकं चांगलं सासर मिळालं तुला.नाटक सिनेमात दाखवतात तसं नसतं ग आयुष्य.प्रत्येकाला नाही जमत तसं वागणं.प्रेम करण्याची पद्धत निराळी असते.जावई बापू तुझी इतकी काळजी घेतात ना मग त्यातच सगळं आलं.उगीच काहीतरी विचार करत बसू नकोस आता.छान आनंदी रहा."
आईच्या बोलण्याने कोमलच मन शांत झालं.ती आतुरतेने बाळाची वाट बघू लागली.दिवस भरले आणि कोमलने एका गोंडस बाळाला जन्म दिला.' स्वानंद ' असं त्याचं सुंदर नाव ठेवल गेलं.आदित्य खुश होता की नाही हे काही कळत नव्हतं. त्याचं वागणं पूर्वीसारखंच होतं.स्वानंदचे लाड तो करायचा.कोमलचे सासू सासरे अधून मधून येऊन जाऊन असायचे.
स्वानंदच्या बाललीलांमध्ये कोमल सगळं विसरून गेली.काळ पुढे सरकत होता.आदित्यचें आई बाबा एक एक करून या जगातून दूर निघून गेले.संसाराला इतकी वर्ष झाल्यामुळे आता दोघांमध्ये मोकळेपणा आला होता. सगळं छान सुरू होतं.पण आदित्यच्या वागण्याची सल कोमलच्या मनात कुठेतरी अजूनही होतीच.
कोमलचे आई बाबा स्वानंदला सुट्टीत त्यांच्याकडे घेऊन गेले होते.आदित्य घरी आला.कोमल स्वयंपाक घरात जाऊ लागली.त्याने तिचा धरलेला हात तिला खूप काही सांगून गेला.ती अलगद त्याच्या मिठीत सामावली.त्याने हळूच आणलेला गजरा तिच्या केसात माळला तशी ती गांधाळली.दोघे एकमेकांत हरवून गेले.त्याने मंद संगीत लावले आणि तिच्या हातात हात घेऊन गाणं म्हणू लागला.
' हे स्वप्न तर नाही ना ' असा प्रश्न तिला पडला.त्याने हळूच तिच्या डोळ्यात बघत ' काय झालं?' म्हणून विचारलं.तिच्या डोळ्यातले मोती हळूच त्याच्या हातात आले.आता मात्र तो गोंधळून गेला.तिला बसवून नक्की काय झालं ते सांगण्यासाठी गळ घालू लागला.
" खरं सांगू?हे जे घडतंय ते खरंच वाटत नाहीये.पण असं घडावं म्हणून मी नेहेमीच आसुसलेली होते.लग्न होण्याआधीपासून.पण तुमचं वागणं,माझ्यापासून दूर दूर राहणं मला नेहेमीच संभ्रमात टाकायचं.मी आवडत नव्हते का तुम्हाला?नक्की काय कारण होतं?मी सुखी नाहीये आसं नाहीये पण नवलाईच्या दिवसांत जे अनुभवायला हवं होतं ते नक्कीच मी मिस केलंय असं वाटतं.आता ते आठवायच नाहीये मला पण उत्तर मात्र नक्कीच हवं आहे.