Login

सांग कधी कळणार तुला ( अंतिम भाग )

तुझं मन मी नाही समजू शकलो त्याची काय शिक्षा द्यायची ती दे.बंदा हाजिर है .तुझे सगळे सगळे लाड मी पुरवणार.अगदी तुला हवे तसे."आदित्य कोमलच्या डोळ्यातले अश्रू टिपत म्हणाला."किती वेडी आहे ना मी?तुमचं प्रेम मला कळलंच नाही.पण तुमचंही चुकलंच ना.नवलाईचे दिवस यातच गेले आपले.आणि माझ्या नाजूक दिवसांत मला जे हवं होतं ते तर नाही ना मिळालं मला.आता आपण नव्याने जगू पण ते दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येणार आहेत का?"कोमल फुरंगटून म्हणाली."आता तयार रहा पुन्हा मागे जायला.स्वानंदला आई बाबांकडे पाठवलं आहे तर आपण आता ते दिवस पुन्हा अनुभवू या.आणि हो स्वानंद बहीण हवी म्हणत होता तेव्हा ते ही मनावर घेऊ.आणि त्या निमित्ताने तुझी राहिलेली सगळी हौस पूर्ण करू या.काय...?" कोमल एखाद्या नव्या नवरीसारखी लाजली.दोघांचा संसार पुन्हा एकदा फुलला.
न राहवून शेवटी कोमलने आज आपल्या मनातला सल बोलून दाखवला होता.गेले कित्तेक वर्ष ह्या विचारांनी तिला पोखरल होतं.आदित्यने तिचे डोळे पुसले.
" तुझं खरं आहे राणी पण मी ही नवीनच होतो ना.माझंही पहिलच लग्न होतं तुझ्यासारख.नवीन आयुष्य सुरु करणं आम्हा पुरुषांनाही अवघड असतं तुमच्यासारखंच." आदित्य हसत बोलला.त्याच्या बोलण्यानं कोमलसुद्धा थोडीशी सावरली.
" हो पण मला कधीच तुमच्या वागण्यात आतुरता जाणवली नाही. नवलाईची ओढ,प्रेमाचे कटाक्ष यासाठी मी आसुसले होते.आणि माझ्या प्रेग्नांसीमध्येही तुमच्या जवळ असण्याची गरज होती मला पण तुम्ही तर दूर दूरच राहत होतात.नक्की काय होतं तुमच्या मनात?" आज आपल्या मनाची सगळी भडास काढायची असं कोमलने ठरवलं होतं.
" खरंच मला माफ कर पण ह्या गोष्टी नकळत घडत गेल्या माझ्या कडून. तुला दुखवायचं आजिबात नव्हतं मला.पण माझ्या ह्रुदयात पण काही गोष्टी बसलेल्या होत्या.त्यात दोष तुझा नव्हता.मला तू खूप आवडली होतीस आणि माझं प्रेम नेहेमीच तुझ्यावर असणार आहे.तुझ्या मनात या गोष्टी येणं अगदी साहजिकच आहे पण खरंच दोष असेल तर तो माझ्या आयुष्यातील घटनांचा.आई बाबा तर तू बघतेस आहे ना कसे वागायचे एकमेकांशी.त्यामुळे नवरा बायको नेहेमी असेच वागतात एकमेकाशी असं मला लहानपणी वाटायचं.मोठा झालो तसं हे नातं नकोसं वाटायला लागलं.यासाठीच का लग्न करायचं तर ते नकोच असं वाटायचं, जवाबदारीची भितीसुद्धा वाटायची.ताईच्या लग्नानंतर मात्र तिला खुश बघून माझे विचार बदलू लागले.तिने समजावलं आणि माझ्या काही मित्रांचे सुखी संसार बघून मी लग्नासाठी तयार झालो.तुझ्याशी लग्न झालं आणि तुला खूप सुखात ठेवायचं असं मी मनोमन ठरवलं होतं.पण प्रेम कसं व्यक्त करायचं हे काही कळत नव्हतं.मी काही केलं आणि ते तुला आवडलं नाही तर उगीच तुझ्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण झाला तर?मी तुला सगळी सुख देऊ शकेल ना?अशी माझी घालमेल चालायची.आई बाबा सतत सोबत असायचे त्यामुळे मोकळेपणाने वागता यायचं नाही.बाहेर कुठे जायचं तर ते सतत काहीबाही बोलायचे म्हणून हिम्मत झाली नाही.हे माझं चुकलं हे मी मान्य करतो.
आपल्यात थोडा मोकळेपणा येण्याआधीच स्वानंदची चाहूल लागली.आनंद तर झाला होताच पण इतक्या लवकर आलेली ही जवाबदारी मनावर दडपण आलं होतं.मला तुझी खुप काळजी वाटायची.मी तुझ्या जवळ आलो आणि बाळाला धक्का लागला तर?अनवधानाने माझ्याकडुन तुला काही त्रास झाला तर?अशी भीती मला वाटायची.त्यामुळे मी तुझ्यापासून दूर रहायचो.माझ्या ताईच्या बाळाला तो पोटात असताना धक्का लागून ते या जगात यायच्या आधीच गेलं होतं.तो आघात मनावर होताच त्यामुळे मी तुझी विशेष काळजी घेत होतो.तू झोपलीस की मी जागा राहून लक्ष ठेवायचो.
स्वानंद लहान असताना सुद्धा त्याची काळजी वाटायची.मी असा वागलो ते फक्त तुझ्यावरच्या प्रेमामुळेच.आणि माझ्या अती काळजीमुळे.मी खरंच वेडा आहे.पण माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे.पण ते व्यक्त करण्यात मी कमी पडलो.मला माफ कर प्रिये पण मला आता माझ्यात खूप फरक झाला आहे की नाही सांग?मी बदललो आहे.आणि माझ्या बायकोचा गुलाम झालेलो आहे.तू जे म्हणशील ते करणार.मग कोणी मला बायकोचा बैल म्हणाला तरीही चालेल.
तुझं मन मी नाही समजू शकलो त्याची काय शिक्षा द्यायची ती दे.बंदा हाजिर है .तुझे सगळे सगळे लाड मी पुरवणार.अगदी तुला हवे तसे."आदित्य कोमलच्या डोळ्यातले अश्रू टिपत म्हणाला.
"किती वेडी आहे ना मी?तुमचं प्रेम मला कळलंच नाही.पण तुमचंही चुकलंच ना.नवलाईचे दिवस यातच गेले आपले.आणि माझ्या नाजूक दिवसांत मला जे हवं होतं ते तर नाही ना मिळालं मला.आता आपण नव्याने जगू पण ते दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येणार आहेत का?"कोमल फुरंगटून म्हणाली.
"आता तयार रहा पुन्हा मागे जायला.स्वानंदला आई बाबांकडे पाठवलं आहे तर आपण आता ते दिवस पुन्हा अनुभवू या.आणि हो स्वानंद बहीण हवी म्हणत होता तेव्हा ते ही मनावर घेऊ.आणि त्या निमित्ताने तुझी राहिलेली सगळी हौस पूर्ण करू या.काय...?"
कोमल एखाद्या नव्या नवरीसारखी लाजली.दोघांचा संसार पुन्हा एकदा फुलला.