सारं काही तिच्यासाठी भाग -9

प्रेम
भाग -9

" माझ्या सारख्या..? पण का...? तुम्ही तर मला एकही क्षण ऑफिस मध्ये थांबू दिले नाही.. आणि तसं ही तुमच्या कंपनीला माझ्याहून चांगला स्टाफ मिळू शकतो.. "
शालिनी विशाल बोलते.

" बर माझं चुकल, पण आता मि तुला रिकवेस्ट करतोय.. प्लीज ही नोकरी हा जॉब ठेवून घे... " विशाल तिला विनवणी करतो..

काही वेळ गेल्या नंतर..
" बरं मि तयार आहे पण.. माझी एक अट आहे..? " शालिनी बोलते..

" कोणती अट..? जे काही असेल मला मान्य आहे.. " विशाल बोलतो आणि त्याला तिला जाऊ द्यायचं नव्हतं.

" मला सहा वाजताच्या वर थांबता नाही येणार.. कारण सहाच्या नंतर माझं काही तरी वेगळं कामं आहे ते करायचं असत.. " शालिनी त्याला सांगते..

" वेगळं कामं...? असं कोणतं कामं आहे जे तुला करायचंच आहे...? नाही सॉरी तुला विचारलं मि.." विशाल विचारतो..

" सॉरी पण मि नाही सांगु शकत तुम्हाला... " शालिनी बोलते..

तेवढ्यात कॉफ़ी येते," ही घे कॉफी.. " विशाल कॉफ़ीचा कप पुढे करतो..

" असं कोणतं कामं आहे जे ती मला सांगणं महत्वाचं नाही समजत...? पण असो निदान जॉब साठी तरी हा म्हणाली.. " विशाल स्वतःशीच पुटपुटतो आणि कॉफ़ीचा घोट घेतो.

बराच वेळ दोघांच्या गप्पा रंगतात.. विशाल तिला तिच्या घराजवळ सोडतो..
पण शालिनी त्याला घरी येण्यासाठी फोर्स नाही करत.

सकाळ होते... विशाल ऑफिस ला येतो, त्याच बरोबर पि ए मोहन सुद्धा त्याच्या कॅबिन मध्ये जातो..

" सो आजचं काय शेड्युल आहे मोहन..? "विशाल विचारतो.

" आहे ना सर आज एक इंटरव्हिव आणि एक साईड मिटिंग आहे..." मोहन त्याला सांगतो..

" ह्म्म्म इंटरव्हिव कॅन्सल करा आणि मिटिंग साठी मि शालिनीला घेऊन जाईन.. " विशाल बोलतो.

शालिनीच नाव ऐकताच मोहन चकित होतो, " शालिनी...? म्हणजे त्याच ना ज्यांना तुम्ही... "

" हो जिला मि जॉब साठी नकार दिलेला.. तिचं ती.. आज पासुन जॉईन करतेय.. " विशाल बोलतो..

" पण काल तर त्यांनी कॉल घेतला नव्हता.. " विशाल बोलतो..

"हम्म बरोबर आहे तुमचं... तिच्या शी मि बोलुन घेतल आहे.. तुम्ही एक कामं करा... तिच्या नावाचं अपॉइंटमेंट लेटर बनवा..."विशाल सांगतो..

"बरं... सॅलरी किती...? तिचं ना जी आपली ठरली आहे द्यायची...?" मोहन विचारतो..

" हम्म्म्म नाही त्याहून थोडी जास्त तीस हजार.. काम बघू मग वाढवू.. काय म्हणता...? " विशाल बोलतो..

हे सगळं ऐकुन मोहन चकित होतो, काल पर्यँत आलेली मुलगी चक्क सर तिला इतकी जास्त सॅलरी का देतायत..? त्याच्या मनाला प्रश्न पडतो..

" बरं सर मि आत्ताच कामाला लागतो.. " असं बोलुन मोहन कॅबिनच्या बाहेर जातो...

तेवढ्यात शालिनी येते, कॅबिनचा दरवाजा नॉक करते..
" मि आत येऊ का...? सर... " शालिनी विचारते..

शालिनीला पाहुन तो पाहतंच राहतो, सिम्पल साधा ड्रेस, त्यावर ओढणी, केस मोकळे सोडलेले.. आणि काही केस अलगद चेहऱ्यावर आलेले..

" ओह्ह्ह प्लीज ये... बसं.. " तो तिला समोरच्या खुर्चीत बसायला सांगतो..

" तु कॉफी वगरे काही घेणार आहेस का...?" विशाल तिला विचारतो..

" ह्म्म्म नाही.. मि कामालाच सुरवात करते.. " शालिनी बोलते..

विशाल रिसिव्हर उचलतो आणि मोहनला आत यायला सांगतो..

मोहन आत कॅबिन मध्ये येतो, तो अपॉइंटमेंट लेटर विशालच्या हातात देतो.. विशाल नीट वाचतो आणि ते लेटर तिच्या हातात देतो..

" हे अपॉइंटमेंट लेटर आहे.. एकदा वाचून घे.. " विशाल बोलतो..

शालिनी लेटर वाचते, आणि तिला धक्काच बसतो आनंदाचा.

" हे काय सॅलरी तीस हजार...? " ती आश्चर्याने बोलते..

" हो का कमी आहे का...? नाही तसं असेल तर आपण वाढवू ना... " विशाल बोलतो..

मोहन आणि विशाल एकमेकांकडे पाहतात..
" नाही विशाल सर इतकी सॅलरी खुप झाली मला.. मला वाटलं नव्हतं की इतकी सॅलरी मला भेटेल.. "शालिनी बोलते तिला हे पाहुन आनंदचं होतो..

" बरं... हा मोहन आहे... माझा पि ए.. हा तुला तुझा डेस्क दाखवेल आणि काम सुद्धा.. काही शंका असेल तर नक्की ह्याला सांग किंवा मला.. " विशाल बोलतो..

क्रमश...

🎭 Series Post

View all