सारं काही तिच्यासाठी भाग अंतिम

प्रेम
भाग -23 अंतिम भाग..


" काय विशाल बरोबर आहे ना माझं बोलणं..? तु सुखात ठेवशील, तिला सांभाळून घेशील ह्याची खात्री आहे मला.. "
सागरची आई बोलते.

" तडकाफडकी मि निर्णय नाही घेऊ शकत... " शालिनी बोलते.

" अगं पण... " सागरची आई बोलते.

" असुद्या काकू.. तिला मि जबरदस्ती नाही करणार.. माझं चुकलं मि इथे यायला नव्हत पाहिजे होतं.. " विशाल बोलतो हताश होतो आणि तिथून तडक निघतो..

" का जाऊ दिलंस त्याला...? तुला ही माहित आहे तु त्याच्यावर प्रेम करतेस... तुझी जबाबदारी तो नीट घेईल.. मग तरी का तु त्याच्या सोबत नाही गेली...? " सागर ची आई बोलते.

" पण मग सागरला दिलेल्या वचनाच काय...? आज त्याच्या ह्या अवस्थेला मि जबाबदार आहे.." शालिनी बोलते.

सागर ची आई तिच्या जवळ जाते तिच्या खांद्यावर हात ठेवते, " मि एक मुलगा गमवलाय, आता पुन्हा मुलगी गमवायची नाही.. " आणि सागरच्या आई च्या डोळ्यांतून पाणी येतं.

शालिनी तडक तिथून निघते आणि इथे तिथे सर्व ठिकाणी ती विशाल ला शोधते.. तेव्हा तिचं लक्ष पार्किंग लॉट मध्ये जातं..

आणि ती विशाल ला जाऊन मिठी मारते, " मला माहित होतं तु नाही जाणार... " शालिनी विशाल ला बोलते..

सागरची आई वोर्ड च्या खिडकीतून पाहत असते, " तुझं सुख ह्यातच आहे.. " सागरची आई स्वतःशीच बोलते आणि सागरच्या जवळ जाते.

" सुखात राहील तुझी शालिनी.. " सागरची आई सागरचा हात हातात घेते, " तिची फरफट मला पाहवली नाही म्हणुन हा निर्णय घेतला.. बरोबर केलं ना मि...? " आणि तेवढ्यात सागर मोठा लांब श्वास घेतो.

त्याची आई अलगद हाताने त्याचे डोळे बंद करते..

लग्नाच्या दोन महिन्यानंतर...

" तु गाडी चालव मि बाजूला बसतो... " विशाल तिला बोलतो.

" यार नको प्लीज मला नाही जमणार.. " शालिनी विशाल ला विरोध करत असते..

" अगं त्यात न जमण्या सारखं काय...? बघ रस्ता मोकळा आहे... हा ब्रेक आहे. समोरून गाडी आली तर हळूच ब्रेक लावायचा... " विशाल तिला शिकवत असतो..

" तु सामोरं पाहुन चालव ना... मला खुप भिती वाटते रे... " शालिनी त्याला भीतीने सांगत असते..

" अगं मला सवय आहे... " आणि तेवढ्यात समोरून टेम्पो येतो आणि विशाल शालिनीच्या गाडीला जोरात आदळतो दोघांचाही अपघात होतो..

सहा महिन्यानंतर...

" डॉक्टर शालिनीची तब्येत होईल ना बरी..? अजुन किती दिवस ती कोमात राहील...? हवं तर मि उच्च डॉक्टर बोलावतो.. " विशाल बोलतो.

" हे बघा, त्या अजुन किती दिवस कोमात राहतील माहित नाही.. आमचे सर्व प्रयत्न चालु आहेत, आता तुम्ही प्रतीक्षा शिवाय काहीच करू शकत नाही.. " आणि डॉक्टर त्याला धीर देतात.

विशाल आत जातो,तिच्या बाजूला बसतो. तिच्या हातावर हात ठेवतो, " मला माहित आहे अजुन ही तु सागर साठीच जगतेय, मला माहित आहे तुझी भेट त्याच्याशी नक्की होतं असेल... तुझी मि वाट पाहतोय.. आणि वाट पाहण्याशिवाय माझ्या कडे पर्यायचं नाही.. " आणि विशाल रडू लागतो..

शेवटी तिला सागर साठीच जगायचं होतं...

समाप्त...