सारं काही तिच्यासाठी भाग -11

प्रेम
भाग -11

" छे गं काही काय..आणि पडलो जरी प्रेमात तर सर्वात आधी तुला सांगेन.. " विशाल बोलतो..

सकाळ होते...

विशाल ऑफिस ला पोहचतो.. आत शिरल्या शिरल्या शालिनी त्याला सकाळच्या शुभेच्छा देते.

तो तिला कॅबिन मध्ये यायला सांगतो..

मोहन आणि ती दोघंही कॅबिन मध्ये जातात.. नेहमी प्रमाणे विशाल मोहन ला डेअली अपडेट विचारतो..

आणि शालिनीला तो समोरच्या खुर्चीत बसायला सांगतो..

" शालिनी.. मोहन काय काय बोलतो ह्यावर लक्ष दे.. कारण तुला ही ह्या सगळ्याची माहिती असली पाहिजे.. कारण तु रोज माझ्यासोबत साईड वर येणार आहेस.. म्हणजे मोहन चं अर्ध काम हलक होईल... " तो शालिनीला सांगतो..

" काय मोहन.. बरोबर ना..? " विशाल मोहन ला विचारतो..

" हो सर.. " मोहन बोलतो..

दुपार होते, ऑफिसचा लंच टाइम होतो.. शालिनी बाहेर जाते, बराच वेळ शालिनी येतं नाही.. लंच टाइम संपतो, काही मिनिटातच शालिनी येऊन डेस्क जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसते..

तेवढ्यात मोहन येतो, " तुला सर साईड वर चलायला सांगतायत.. " मोहन तिच्या हातात काही फाईल देतो आणि एक डायरी..

" हे काय..? ही डायरी कसली आहे..? " शालिनी विचारते..

" हो ही डायरी सरांना द्यायच्या अपडेट ची आहे.. ह्यात सगळं लिहलं आहे.. आणि सर काही बोलले तर तेही ह्यात लिहायचं आहे.. " मोहन तिला नीट समजावून सांगतो..

विशाल आणि शालिनी ऑफिस मधुन निघतात, काही वेळातच ते साईड वर पोहचतात..

विशाल साईड बद्दल सांगतो आणि शालिनी ते डायरीत लिहत असते.

बराच वेळ गेल्या नंतर...

विशाल मनगटावरच्या घड्याळात पाहतो, " कॉफी पियायला जाऊ शकतो का आपण..? " विशाल तिला कॉफी साठी ऑफर करतो..

ती घड्याळात पाहते, " हो नक्की.. "

" अर्धा तास आहे अजुन.. " विशाल शालिनीला बोलतो..

शालिनी गालात हसते... विशाल ची गाडी एका हॉटेल जवळ येऊन थांबते.. दोघ ही गाडीतुन उतरतात..

हॉटेल ची पायरी चढून डायनिंग वर जाऊन बसतात..

शालिनी आजूबाजूला पाहत असते, " सुंदर आहे ना हॉटेल..? "

" हो... आवडल तुला..? " विशाल विचारतो..

" हो म्हणजे महिन्यातून एकदा इथे येऊच शकतो.. " शालिनी बोलते..

" सो कॉफ़ी ओरडर करूया...? " आणि विशाल वेटर ला आवाज देतो..

वेटर येतो, " दोन स्पेशल कॉफ़ी.. " वेटर ऑर्डर घेऊन जातो..

" स्पेशल...? " शालिनी विचारते...

" कसं आहे ना स्पेशल व्यक्ती साठी स्पेशल हवं.. " विशाल बोलतो...

" मला ना एक गणित अजुन कळलं नाही, तुझ्या बद्दलच...? " विशाल बोलतो..

" काय...? " शालिनी विचारते..

" सहाच्या नंतर न थांबायच असं का....? काय आहे सहाच्या नंतर...? तु बोलल्या पासुन मला सतत हाच प्रश्न पडतो..!"
विशालचा प्रश्न ऐकुन ती अस्वस्थ होते..

विशाल तिच्याकडे पाहतंच असतो, तिला अस्वस्थ झालेलं पाहुन तो तिचा हात पकडतो.. " सॉरी तुला अस्वस्थ वाटतं असेल तर मि हा प्रश्न नाही करणार... " विशाल बोलतो..

ती हात मागे घेते, " ते... ते... मि अजुन एका ठिकाणी जाते ना म्हणुन... क्लास घ्यायला लहान मुलांचे...म्हणुन सहा वाजता निघायचं असत ना.. " ती विशाल ला तात्पुरतं उत्तर देऊन थांबवते...

" गुड... छान.. तुला हे ही जमत... ग्रेट.. " विशाल तिचं उत्तर ऐकुन खुश होतो..

" थँक्स... पण तुम्ही हे असं का विचारलात..? म्हणजे तुम्हाला मि खोटं बोलते असं वाटलं का..? " ती विशाल ला विचारते..

" नाही गं असं काही नाही... वाटलं तुला विचारावं बसं.. " विशाल बोलतो..

शालिनी रिलॅक्स होते, कॉफ़ीचा घोट घेते..

" मि काही विचारू का...? नाही म्हटलं तुम्हाला राग येणार नसेल तर...? " शालिनी विचारते..

" काय बोल ना... हा विशाल कधीच कोणाशी खोटं बोलतं नाही.. बिनधास्त विचार तु.. " शालिनीला बोलतो.

" तुमचं लग्न झालं आहे का...? " टिपिकल मुलींसारखं तिने त्याला विचारलं होतं...

" हो.... झालं आहे.. " तो एक मोठा श्वास घेतो..
" आणि एक मुलगी सुद्धा आहे... पण माझा आणि माझ्या बायकोचा डिवोर्स झाला आहे.. " तो तिला घडाघडा सर्व सांगतो..

" अच्छा म्हणजे ती स्कूल जवळ मला भेटलेली आणि तुम्ही जिला घ्यायला आलेलात ती तुमची मुलगी...? " शालिनी विचारते..

" हो... " विशाल बोलतो..

" मग तुम्ही दुसरं लग्न का नाही करत..? " शालिनी विचारतो..

तो तिला शांतपणे उत्तर देतो, " करेन लवकरच.. "

क्रमश....

🎭 Series Post

View all