सारं काही तिच्यासाठी भाग -12

प्रेम
भाग -12

" काय..? अरे वाह छान की. " शालिनी बोलते..

" आता मि तुला एक विचारू का...? तुला जर नाही आवडलं तर मला तु तिथेच थांबव.. " विशाल बोलतो.

" असं काय विचारणार आहात...? जे मला नाही आवडेल.. " शालिनी बोलते.

" हेच की तुझं लग्न झालं नाही का..? " विशाल विचारतो.

" बसं इतकंच ना...? " शालिनी विचारते..

" हो.. मुलींना कोणी ना कोणी साथीदार असतोच की..? " विशाल बोलतो.

शालिनी थांबते, कॉफ़ीचा कप तोंडाला लावते आणि हसते..
" हसायला काय झालं..? " विशाल बोलतो..

" सॉरी पण मला तसं कोणी नाही, आणि माझं लग्न ही झालेल नाही... " शालिनी बोलते.

" मग लग्नाचा विचार आहे की नाही तुझा..? " विशाल विचारतो.

" आहे पण इतक्यात नाही.. जॉब सुरळीत होऊ दे मग बघू.. " शालिनी त्याला बोलते..

" तु मुलांचे क्लास घरीच घेते की...? " विशाल तिला विचारतो..

ती बोललेल्या शब्दांत अडकते..
" घरीच... पण का..? " शालिनी त्याला विचारते.

बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगतात..

ती घड्याळात पाहते.. आणि डोक्याला हात लावते.. " आई गं मेले... बघा सात वाजत आले.. तुमच्यामुळे लक्षातच नाही आलं माझ्या.. " ती घाईघाईत उठते..

" चिल.. मि तुला ड्रॉप करतो.. म्हणजे लवकर पोह्चशील.. "
विशाल बोलतो..

" नाही नको... माझी मि जाईन.. " आणि ती हॉटेल मधुन बाहेर येते, घाईघाईत रिक्षा थांबवते...

" सिटी हॉस्पिटल.. " शालिनी घाईत बोलुन जाते..

विशालला ऐकुन धक्काच लागतो, " सिटी हॉस्पिटल..? तिला तर घरी जायचं होतं मग, सिटी हॉस्पिटल का सांगितलं असेल तिने रिक्षावाल्याला...? " विशाल स्वतःशीच पुटपुटतो आणि घरी येतो..

तो तिला अनेक फोन ट्राय करतो पण ती एकही कॉल घेत नाही.

" आलास..? फार थकलेला दिसतो आहेस..? " आई विचारते.

"घरात आल्या आल्या प्रश्न नको...मि फ्रेश होतो.." बराच वेळ फ्रेश होऊन तो बाहेर येतो..

आई त्याच्या पुढ्यात गरमागरम कॉफ़ी ठेवते..
" कॉफ़ी नको मला.. " आणि तो ड्रिंक चा ग्लास भरतो..

बाल्कनीत उभं राहून, ड्रिंक घेत असतो आणि आराम खुर्चीत शांत डोळे मिठून राहतो..

" कसल्या विचारात आहेस..? " त्याची आई त्याला विचारते..

आणि ती तेलाची बाटली घेऊन त्याच्या डोक्यात, ( केसात ) तेल घालून मालिश करते..

" वाह... किती बरं वाटतंय.. काय सांगु तुला.. " विशाल ला फार बरं वाटतं असत.

" तुला वाटतं नाही आजकाल तु खुप कसल्या तरी विचारात असतोस.. " आई विचारते..

" नाही गं छे... विचारात वगरे नाही.. " विशाल बोलतो.

" मग हा ड्रिंक चा ग्लास...? गेले दोन दिवस झाले तु सतत ड्रिंक करतो आहेस .. सीमा चा तर तु विचार नाही करत. मग राहील कोण...? तर ती काल आलेली मुलगी शालिनी..? " आई ने त्याची दुखरी नस चांगलीच पकडली होती..

आई ने प्रश्न केल्यावर त्याचं उत्तर विशाल कडे नसतं..
" काय झालं..? उत्तर दे... " आई विचारते.

" खरं तर हो.. " विशाल आईचा हात पकडतो, " खरं तर तिचं वागणं अतिशय वेगळं आणि सौंशयास्पद वाटतं मला नेहमी.. " विशाल बोलतो..

" कसला सौंशय...? " आई विचारते...

" हेच की तिने मला सांगितलं सहा च्या नंतर तिला लहान मुलांचे क्लासेस घायचे असतात.. पण आज तिने सिटी हॉस्पिटल असं नाव सांगितलं रिक्षाला.. आणि ती गेली.. " विशाल बोलतो..

" मग एक काम कर तु तिला स्पष्ट विचार ना.. नाही तर तिच्या घरी फेरी मार.. खरं खोटं नीट समजेल तुला.. " आई सांगते..

" तु बरोबर बोललीस पण..ह्याने गैरसमज वाढेल.. आणि मग ती कदाचित ऑफिस ला देखील येणार नाही.. अविश्वास दाखवण्यासारखं होईल ना आई.. " विशाल बोलतो..

" अरे तु तुझ्या प्रत्येक स्टाफची ऑफिस जॉईन करायच्या आधी चौकशी केलीस ना, तसंही आता समज आणि चौकशी कर.. "
आई त्याला सुचवते..

" नाही नको, उगाच ती गैरसमज करून घेईल.." विशाल बोलतो..

बराच वेळ त्यांच्यात गप्पा होतात, तो त्याच्या मनात जे होतं ते आईपाशी बोलतो..

रात्रीचे दहा वाजलेले असतात, " काय करू... करू का कॉल..? विचारू का तिला...? नाही नको ती स्वतःहून सांगेल तेव्हाच.. " आणि तो फोन हातात घेतो आणि तिला कॉल लावतो..

पण ती कॉल काही केल्या घेईना.. म्हणुन तो तिला मॅसेज करतो.. " हाय... तु आज हॉस्पिटलला होती...? " नाही नको.. आणि तो टाईप केलेला मॅसेज डिलिट करतो..

पुन्हा तो मॅसेज टाईप करतो, " जेवलीस का... " तो मनातल्या मनात बोलतो..

" हा हे ठीक आहे.. " आणि तो मॅसेज सेंड करतो..

क्रमश...





🎭 Series Post

View all