सारं काही तिच्यासाठी भाग -13

प्रेम
भाग -13

समोरून शालिनीचा रिप्लाय येतो, " हो आत्ताच... तुम्ही जेवलात का..? " टिपिकल मुलींसारखं ती विशालला विचारते.

रात्रीचे अकरा वाजतात, " इफ जर तुला चालत असेल तर मि कॉल करू का...? " विशाल न राहून तिला विचारतो.

मॅसेज पाठवल्या पाठवल्या समोरून शालिनीचा स्वतःहून विशालला कॉल येतो..

तो कॉल घेतो, हॅल्लो च्या पुढे काही वेळ शांतता होती. मग न राहून विशाल बोलायला सुरवात करतो..

" सॉरी मि अशी घाईतच संध्याकाळी निघाली, तुम्हाला साधं बाय सुद्धा मला करता आलं नाही.. सर... " शालिनी बोलते..

" अगं असूदेत त्यात काय झालं.. तु हॉस्पिटल ला अशी अचानक गेली..? सगळं ठीक आहे ना...? म्हणजे तुला काही त्रास वगरे तर होतं नाही ना..? " विशाल तिला न राहून विचारूनच राहतो..

काही वेळ ती काहीच बोलत नाही तिला नंतर तिच्या लक्षात येतं की, आपण विशालच्या पुढ्यातचं हॉस्पिटल बोललो रिक्षावाल्याला.

" अअ हो, ठीक आहे." शालिनी विषय कसा टाळता येईल ह्याचा विचार करते..

" अगं मग तु हॉस्पिटल ला कशाला गेली होतीस ...? म्हणजे कोणी ऍडमिट वगरे आहे का..? " विशाल तिला स्वतःहूनच उत्तर देतो..

" अअअ हा हो... आहे की.. माझे काका... काका ऍडमिट आहे... बाकी घाबरण्यासारखं काही नाही.. " शालिनी बोलते..

" बरं बरं.. अच्छा. म्हणजे तु ठीक आहेस ना मग ओके.. " विशाल बोलतो..

" बरं मि ठेवू का... उद्या सकाळी पुन्हा ऑफिस आहे ना सर.. " शालिनी बोलते..

" अगं एक मिनिट तु मला असं ऑफिस टाईम च्या बाहेर सर नको बोलुस.. विशाल अशी हाक मारलीस तरी चालेल.. हे अहो जाओ फॉर्मॅलिटी नको प्लीज.. " विशाल बोलतो..

" बरं ठीक आहे.. " आणि समोरून कॉल कट होतो..

सकाळ होते...
विशाल त्याच्या आईला फ्रेश दिसतो..

" झाली का झोप पूर्ण...? नाही काल तेल घातलेलं ना डोक्यात... म्हणुन म्हटलं. " त्याची आई बोलते..

सखी उठून नाश्ता करत असते, " बाबा आज संध्याकाळी मॉल ला जाऊया का..? नाही तर गार्डन मध्ये..? " सखी बाहेर जाण्यासाठी हट्ट धरून ठेवते..

" अरे बाळा आज खुप कामं आहे.. आज नको.. " विशाल बोलतो..

" आजी तु तरी सांग ना बाबाला..? मला खुप बोर झालंय.. " सखी हट्ट धरून ठेवते..

" बरं बरं जाऊया... मस्त मॉल मध्ये जाऊया.. आणि खुप सारा खाऊ खाऊया.. मग तर झालं..? "विशाल बोलतो..

संध्याकाळ होते, पाच वाजलेले असतात...

विशाल घरी येतो आणि सखीला घेऊन मॉलसाठी निघतो..

गाडी एका मॉल जवळ येऊन थांबते, विशाल सखीला घेऊन बराच वेळ मॉल मध्ये फिरतो. शॉपिंग करतो तेवढ्यात त्याला सीमाचा आवाज येतो..," सखी... सखी.. " आणि सीमा सखी जवळ येते..

" अरे वाह आज पप्पांची मॉल मध्ये आणलं का..? " सीमा विचारते आणि सखीचे गाल खेचते..

सखी विशाल च्या मागे जाऊन त्याचा हात घट्ट धरते.. " अगं असं घाबरायला काय झालं..? तुझी आई तर आहे मि.. "

विशाल ला तिचं बोलणं खटकत, " सॉरी तु तिची आई नाही.. तुला दिसत नाही का ती घाबरली आहे ते ... " विशाल रागात बोलतो..

" अरे चिडतो कशाला...? आणि तिला जन्म तर मि दिला आहे.. मग तिची आईचं ना... बरोबर ना बाळा..? " सीमा बोलते..

" तुझं काय कामं आहे, जे करायला आलीस ते कर आणि निघ.. " विशाल बोलतो.

" चिडू नकोस.. कायद्याने मि तिची आई आहे.. तुझी बायको जरी नसली तरी.. लक्षात असूदेत.. " सीमा त्याला थोडक्यात धमकावतेच जणू..

" पप्पा मला भिती वाटतेय आपण प्लीज जाऊया ना.. " सखी बोलते..

" पाहिलंस..! आई म्हणे मि तिची. बघ ही किती घाबरते तुला, त्यामुळे दुर राहा तिच्या पासुन.. " आणि विशाल तिला घेऊन मॉल मधुन बाहेर पडतो..

विशाल तिला घेऊन, घरी येतो..
" आजी... " सखी त्याच्या आईला घट्ट मिठी मारते..

" हे काय अशी घाबरली का आहेस तु..? काय झालं..? " त्याची आई विचारते..

" सीमा भेटली होती मॉलमध्ये, नाही म्हटलं तरी जबरदस्ती करत होती.. " विशाल चिडत बोलतो.

" ती तिथे काय करत होती..? " आई विचारते..

" मला काय माहित ती का आली होती ते, हा काय प्रश्न झाला..? ही माझ्या आयुष्यातुन कधी जाणार आहे काय माहित..? " विशाल बोलतो..

क्रमश...





🎭 Series Post

View all