सारं काही तिच्यासाठी भाग -1

सामाजिक कथा.
वरील कथा काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काहीच संबंध येतं नाही..



" पप्पा आज स्कूलमध्ये मिटिंग आहे... तु येणार आहेस ना...? " सखी फोन वर त्याला बोलतं होती.

" हो सोन्या.. मि लवकरात लवकर पोहचेन.. तु काळजी करू नकोस.. " आणि समोरून फोन कट होतो.

विशाल सांगितल्या प्रमाणे वेळेच्या आधीच सखीच्या स्कूलमध्ये पोहचतो.

विशाल ची नजर सखीला शोधत असते, तेवढ्यात सखी त्याला आवाज देते...
" पप्पा... " सखी समोरून येते, आणि त्याला घट्ट मिठी मारते.

" बघ आलो की नाही वेळेच्या आधी.. आता क्लासरूम मध्ये जाऊया नाही तर टीचर ओरडेल... " विशाल बोलतो...

विशाल आणि सखी क्लासरूममध्ये जातात, समोरच सखीची टीचर बसलेली असते. विशाल टीचरच्या समोर ठेवलेल्या खुर्ची मध्ये बसतो.

" येस मिस्टर पाठक... हे काय एकटेच आलात... नाही म्हणजे सखीची आई सुद्धा लागेल ह्या मिटिंगला... " टीचर बोलते.

" सॉरी पण तिला यायला वेळ नव्हता... म्हणुन मि आलो.. " विशाल बोलतो.

" बरं.. सखीचा अभ्यास खुप बिघडला आहे.. ती स्कूल मध्ये टॉपर येणारी मुलगी, अशी अचानक अभ्यासात पाठी पडते.. तुम्ही नोटीस केलं आहे की नाही.. " टीचर विशाल ला सांगत असतात.

विशाल सखीकडे पाहतो...

" सॉरी मिस.. पण ती कधी असं वागली नव्हती... नेहमी टॉपर असायची.. पण..? " विशाल मध्येच थांबतो.

" अहो पाठक... घरात काही तणावाच वातावरण आहे का...? नाही मुलांवर त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.. प्लीज तुम्ही त्याच प्रेशर मुलांवर नका देऊ.. " टीचर बोलते.

विशाल गाडी ला चावी लावतो, आणि घराकडे यायला निघतो.

सखी गाडीतून बाहेर पाहत असते, विशाल तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं प्रयत्न करतो.

" सखी आईस्क्रिम खाणार का...? " विशाल विचारतो.

वाटेत तो गाडी थांबवतो, " हो पप्पा.. पण चॉकलेट फ्लेवर.. " सखी बोलते.

विशाल गाडीतून उतरतो, आणि तिला हवं त्या दुकानातून तो तिच्या आवडतीची आईस्क्रीम विकत घेतो.

गाडी एका बाजूला पार्क केलेली असते, तो तिला आईस्क्रीम आणुन देतो. आईस्क्रीम पाहुन सखी खुश होते.

" चॉकलेट आईस्क्रीम... " सखी खुप खुश होते, सखी ची आईस्क्रिम खुप आवडीची असते.

" मग काय... तुझ्या पप्पाला आज द्यावीशी वाटली.. तुला आवडते ना... " विशाल बोलतो.

" हो खूपच पप्पा..." पण सखी मध्येच नर्वस होते.

विशाल ला ते जाणवत, " काय गं... काय झालं.. खा की.. " विशाल बोलतो.

" पप्पा रे आजकाल अभ्यासात माझं मन लागतंच नाही.. " शेवटी सखी विशाल जवळ बोलुन दाखवते.

तोही तिच्या कलेने घेतो, " का रे पिल्लू काय झालं... "विशाल विचारतो.

" माहित नाही.. पण नाही लागत.. " सखी बोलते.

" तुला नसेल काही जमत तर मला विचार... मि समजावेन.. " विशाल बोलतो.

" पप्पा आई का सोडून गेली... तिला मि नाही आवडायची का ..? आणि मग अशी महिन्याच्या प्रत्येक तारखेला का भेटते.. आणि जेव्हा ती भेटते ना मग माझं मन नाही लागत.. " सखी बोलुन दाखवते.

शेवटी तिच्या मनात होतं, ते ओठांवर आलंच.

सखीने विचारलेल्या प्रश्नांच उत्तर विशालकडे नव्हतं, पण ह्या लहान मुलीला काय उत्तर द्यायचं हे ही त्याला कळत नव्हतं.

" तुझ्या प्रश्नांच उत्तर मि तुला, तु मोठी झाल्यावर नक्की देईन.. " विशाल तिला समजावून सांगतो.

विशाल आणि सखी घरी येतात, सखी जाऊन विशालच्या आई ला म्हणजे सखी आजीला मिठी मारते.

" आजी तुला माहित आहे, आज पप्पांनी मला आईस्क्रीम खाऊ दिली.. " सखी उत्साहात सांगते.

" अरे वाह.. " विशालची आई विशाल कडे पाहते, तो कसल्या तरी विचारात दिसतो.

आणि तसाच तोह बेडरूम मध्ये जाऊन फ्रेश होतो.

बाल्कनीत उभा विशाल सखीचा विचार करत असतो , आणि एकीकडे तिला काय उत्तर द्यायचं हे ही कळत नसतं.

रात्र होते, जेवून झाल्यावर विशाल बेडरूमच्या बाल्कनीत उभा असतो, त्याची आई संधी साधून त्याच्या जवळ जाते.
त्याच्या हातावर मुखवास ठेवत , मुखवास हा तर बहाणा असतो.
तिला त्याच्याशी काही वेगळं बोलायचं असत, कारण विशाल कधीच स्वतःहून बोलायला येतं नाही.

" मग आज काय झालं...? तु गेलेलास ना सखीच्या स्कूलमध्ये.. " आई त्याला विचारते.

" हो... गेलेलो.. " विशाल शांतपणे बोलतो.

" ह्म्म्म... मग काय म्हणाल्या टीचर..? " विशाल ची आई विशालला विचारते.

" त्यांना सखीचे आई वडील एकत्र मिटिंग ला येणं अपेक्षित होतं.. पण मि एकटाच पाहुन त्यांनी लगेच प्रश्न केला... सायली कुठे आहे..? " विशाल सांगतो.

आई शांतपणे विचारते, " मग तु खरं सांगितलंस की...? "

" नाही मि काही म्हणालो नाही... इतकंच सांगितलं कामाच्या प्रेशरमुळे ती येऊ शकली नाही.. " विशाल बोलतो.

" आता उद्या परवा मध्ये कोर्टाची तारीख असेल ना ... सखी ला सायलीकडे सोडायला... " विशाल ची आई विचारते.

" हो... पण... हे किती दिवस चालणार... सखी ने आज स्वतःहून सांगितलं की स्कूल मध्ये तिचं लक्ष का नाही.. मम्मा आपल्या सोबत का नाही... तिला ही कुठे ना कुठे आई हवीच असेल ना... " विशाल खुप वैतागलेला असतो.

त्याच्या मनातली भडास तो आई जवळ बोलुन दाखवतो.

" तु दुसरं लग्न का नाही करत... त्याने अनेक प्रॉब्लेम सुटतील... " आई बोलते.

क्रमश...