सारं काही तिच्यासाठी भाग -21

प्रेम
भाग 21

बराच वेळ विशाल ऑफिस मध्ये शालिनीचा विचार करत बसलेला असतो..

तेवढ्यात मोहन आत येतो, " सर तासाभराने मिटिंग आहे, कॉन्फरन्स रूम रेडी करू ना..? "

" नाही नको.. कॅन्सल करा.. आणि हो उद्या सुद्धा मिटिंग ठेवू नका.. " विशाल बोलतो.

हे ऐकुन मोहन ला धक्काचं बसतो, " अहो सर कसं शक्य आहे..हे असं कॅन्सल करून आपल्या कंपनीच खुप नुकसान होईल.. " मोहन बोलतो.

" होउदे मला त्याची चिंता नाही..!" विशाल बोलतो.

" मग सर कसली चिंता आहे..? अहो सर गेल्या काही महिन्यापासुन तुम्ही अनेक मिटिंग कॅन्सल केल्या आहेत..कारण तरी सांगा..? " मोहन विचारतो.

" माझ्यासाठी कॉफ़ी पाठवा आणि मिटिंग कॅन्सल कशी करायची हे पहा.. " विशाल बोलतो.

आणि मोहन कॅबिन बाहेर येतो..
" सरांना नक्की काय झालंय माहित नाही, पण हा ही शालिनी आल्या पासुन सर असे विचित्र वागतायत.. इतकं नक्की. " मोहन स्वतःशीच बोलतो.

विशाल संध्याकाळी घरी पोहचतो, आणि शालिनीला कॉल करतो. पण शालिनी काही केल्या त्याचा कॉल घेईना..

म्हणुन तो तिला मॅसेज ही पाठवतो, पण त्याचा काहीच अर्थ नसतो.
त्याला वाटलेलंच तेच झालं होतं, शालिनी ने जॉब सोडला होता. आणि आता त्याला ती दुर जाईल ह्याची भिती वाटतं होती.

रात्रीचे नऊ वाजलेले असतात, तो तिच्या घराजवळ पोहचतो. आज त्याला काही करून शालिनीला भेटायचं होतं, तिला अनेक प्रश्नांचा जाब विचारायचा होता.

पण घराला कुलूप असतो, " तुझ्या घरा जवळ आलो आहे, पण घराला कुलूप आहे.. " विशाल तिला मॅसेज करतो.

मॅसेज पाठवून बराच वेळ झालेला असतो, पण तिचा काहीचं रिप्लाय येतं नाही.

तो न राहून पुन्हा मॅसेज करतो, " मला भेटायचं आहे, मनात अनेक प्रश्न आहे ज्याची उत्तरे मला हवी आहेत.. मि आता तुला भेटायला हॉस्पिटलला येतं आहे... " विशाल चा मॅसेज.

शालिनी फोन पाहते, विशाल चा मॅसेज वाचते शेवटी ती रिप्लाय करते. " मला भेटायची इच्छा नाही, आणि प्लीज इथे यायची तसदी घेऊ नको.. " शालिनीचा रिप्लाय.

विशाल मॅसेज पाहतो, आणि तो तिचा मॅसेज पाहुन हसतो. त्याला तिचा फार राग आलेला असतो, पण तो व्यक्त करू शकत नव्हता. कारण त्याला तिला गमवायच नव्हतं.

सकाळ होते, विशाल घरीच असतो., " हे काय आज ऑफिस नाही का..? " त्याची आई विचारते.

" नाही... सध्या ऑफिस ला सुट्टी.. " विशाल आईला शांत दिसतो, काही तरी बिनसल्या सारखं आईला जाणवत.

" अरे म्हणजे काही खास कारण आहे की...? नाही तु बाहेर चालला आहेस कुठे की...? " आई त्याला विचारते.

" हो, सिटी हॉस्पिटल.. " विशाल बोलतो.

" पण सिटी हॉस्पिटल कशाला...? बरं वगरे नाही की कोणी ऍडमिट वगरे आहे..? " आई त्याला विचारते.

"आई गं किती विचारशील..?" विशाल चिडचिड करतो.

" अरे चिडायला काय झालं..? काळजी वाटली म्हणुन विचारलं.. " आई बोलते.

आणि विशाल तडक निघतो, आणि गाडी सुरु करतो. गाडी थेट सिटी हॉस्पिटल जवळ थांबवतो.

क्रमश...




🎭 Series Post

View all