सारं काही तिच्यासाठी भाग -22

प्रेम
भाग -22


काही वेळ विशाल गाडीतच विचार करत बसलेला असतो, " शालिनी नक्की खरं बोलते आहे की...? सागर नावाचा कोणी व्यक्ती अस्तित्वात असेल का..? तिने जे काही सांगितलं ह्यावर विश्वास कितपत ठेवू..? " त्याच्या डोक्यात आणि मनात अनेक प्रश्न येत होते..

आणि ह्या सगळ्याच उत्तर मला इथे नक्कीच भेटेल.

गाडी हॉस्पिटल जवळ पार्क कडुन विशाल गाडीतून उतरतो, आणि सरळ हॉस्पिटल ची पायरी चढतो..

हॉस्पिटल च्या सुरवातीलाच समोरच रिसेपशन काउंटर असतो, " सागर नावाची व्यक्ती किती नंबर ला आहे..? " काउंटर वर बसलेल्या हॉस्पिटलच्या स्टाफ ला विशाल विचारतो.

" सॉरी पण सागर आडनाव काय आहे...? " ती काउंटर वर बसलेली मुलगी विचारते..

" आडनाव...? अरे यार आडनाव तर माहित नाही.. " विशाल स्वतःशीच बोलतो..

" सॉरी सर आडनाव सांगताय ना..? " ती मुलगी पुन्हा विचारते..

" आडनाव तर माहित नाही पण... अपघात झाला आहे तो पेशंट... प्लीज एकदा पहा ना..? " विशाल नम्रतेने विचारतो..

" नाही सर सागर नावाच असं बिना आडनाव च नाही शोधता येणार... " ती मुलगी बोलते..

" सागर इनामदार.. " विशाल च्या पाठून आवाज येतो..
विशाल दचकतो... " शालिनी...? "

" घ्या सागर इनामदार नाव त्याचं... खरं की खोटं हे पहायला आला आहात ना..? " शालिनी बोलते..

" हो... " विशाल बोलतो..

शालिनी त्याच्या हाताला पकडते आणि तडक त्याला सागर जिथे ऍडमिट असतो त्या रूममध्ये त्याला खेचत आणते.

सागरच्या बाजूला लावलेला पडदा बाजूला करते, " हा आहे सागर... सागर इनामदार... पाहिलं ना..? की अजुन ही विश्वास बसत नाही आहे तुमचा..? " शालिनी च्या डोळ्यांतून पाणी येतं..

विशाल शांतपणे एकटक त्याच्या कडे पाहत उभा असतो, अपघात झाल्या पासुन निपश्चित पडलेला सागर, ज्याने स्वतःचे पाय ही गमावले होते. जीव गेलेल्या व्यक्ती सारखा तो दिसत होता..

शालिनी सागरच्या जवळ जाते, त्याच्या हातावर हात ठेवते, " दोन वर्ष झाली, हा असाच जीव नसल्यासारखा पडून आहे. त्याला कळत ही असेल की नाही माहीत नाही.. आमची तर आशाच संपली आहे.. पण जेव्हा जेव्हा मि ह्याच्या हातावर हात ठेवते ना, तेव्हा तेव्हा मला विश्वास भेटतो की कधीतरी... कधीतरी सागर उठेल आणि मला म्हणेल असं रडू नकोस मि आहे.. "

" खरंच मला माफ कर... मि तुझ्यावर विश्वास नाही ठेवला.. पण मला कळत नव्हतं मि काय करायचं. आणि रहावलं नाही म्हणुन इथे आलो.. " विशाल तिची समजुत घालतो..

पण कदाचित त्याचा आता काही उपयोग नव्हता, शालिनीवर अविश्वास दाखवून विशाल ने चूक केली होती..

" तुम्ही विश्वास गमावून बसला आहात, आता मात्र एकच उपकार करा. प्लीज माझ्या आयुष्यातून कायमचे निघुन जा. " आणि ती त्याच्या पुढ्यात हात जोडते.

" अगं पण...? " ती त्याच्या कडे पहातचं नाही, ती हात जोडून एकटक सागर कडे पहातचं असते..

" ठीक आहे तुला जे योग्य वाटेल ते... आणि तसंच होईल.. " विशाल बोलतो.

तेवढ्यात सागर ची आई आत येते, " थांब विशाल.. "

" आई... " शालिनी बोलते.

" तु इतक्यात हार मानलीस...? दे तिला उत्तर.. " विशाल ला सागर ची आई बोलते.

विशाल थांबतो, " मि समजलो नाही...? " विशाल बोलतो.

" शालिनी ला कायम चं संभाळशील ना..? आहे का तयारी तुझी..? करशील तिच्याशि लग्न...? " सागर ची आई बोलते.

विशाल हे ऐकुन गोंधळतो, त्याला कळत नाही की हे खरं घडतंय की स्वप्न आहेत..

" आई अहो काय बोलत आहात...? मि कसं...? सागर ला दिलेलं वचन..मि सागरला तुम्हाला दोघांनाही वचन दिलं आहे.. " शालिनी बोलते..

"आम्हाला दिलेलं वचन सोड, तु तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार कर... आणि सागरचं तु नको विचार करुस, आता पर्यंत खुप विचार केलास." सागर ची आई बोलते.

क्रमश...