सारं काही तिच्यासाठी भाग -8

Prem
भाग -8

" अहो सर... मला नाही वाटत ती येईल... " मोहन विशालला बोलतो.

" तुम्ही पुढचं नका सांगु... आणि तुम्हाला कसं माहित ती येणार नाही करून...? " विशाल बोलतो..

पि ए हातात रिसिव्हर घेतो आणि तिचा नंबर पुन्हा डाईल करतो.. पण त्याचा काहीच अर्थ नव्हता... शालिनी त्याचा फोन घेतंच नव्हती..

" सर ती उचलत नाही आहे.. एक काम करता का... तुमच्या फोन वरून लावून पहा ना, कदाचित उचलेल.. " पि ए त्याला सुचवतो..

" ओके.. " आणि विशाल मोबाईल वर तिचा नंबर डायल करतो..

तरी सुद्धा शालिनी कॉल घेत नाही..
" मुद्दाम करते का ही..? "विशाल स्वतःशीच पुटपुटतो..

" सर कदाचित तिला राग आला असेल आणि तिला हा जॉब कदाचित नको ही असेल.. " पि ए बोलतो.

" आजकाल मुलींच्या मनातलं काही सांगु नाही शकत.. " विशाल स्वतःशीच बोलतो..

"पण सर आपल्याकडे आधीच दोन बायोडेटा आलेले आहेत, त्यातूनच कोणी चांगला स्टाफ भेटतंय का ते पाहूया..." पि ए बोलतो.

" ह्याला कस सांगु की काल तिला मि किती काय काय म्हणालो ते... " विशाल स्वतःशीच बोलतो..

" बरं तुम्ही ऑफिस बंद करा आणि निघा... पण हा, उद्या पुन्हा तिला कॉल लागतो का ते पहा.. मि निघतो.. " असं बोलुन विशाल निघतो..

" सर का त्या मुलीच्या इतके पाठी पडले आहेत, आज दोन इंटरव्हिव होते ते कॅन्सल करायला लावले... " पि ए स्वतःशीच पुटपुटतो..

विशाल गाडी सुरु करतो, आज त्याला गाणी ऐकायचा मुड होतो.. आणि तो जुनी रोमँटिक गाणी लावतो..

सामोरं असलेली गाडीची काच नीट करतो, अचानक त्याला बसं स्टॉप वर शालिनी उभी दिसते.. तो पटकन गाडी थांबवतो, गाडी रिवर्स मध्ये घेतो आणि तिच्या सामोरं जाऊन उभी करतो..

गाडीची काच खाली करतो, आणि तो तिला आवाज देतो..
" शालिनी.. " तो हसऱ्या चेहऱ्याने तिला आवाज देतो...

" तुम्ही... " ती एकदम मंद स्वरात बोलते..

" लिफ्ट हवी आहे का..? आणि फोन कुठे आहे तुमचा..? " तिच्याशी तो आदराने बोलतं असतो..

" नाही नको.. " आणि खिशातला फोन काढून ती दाखवते.. " हा काय.. "

" जरा बोलायचं होतं.. ? आहे का वेळ..? " विशाल बोलतो.

आणि तो गाडीचा दरवाजा खोलतो आणि तिला बसायला सांगतो..

शालिनी गाडीत बसते, गाडी एका हॉटेल जवळ येऊन थांबते.. " कॉफी...? " विशाल विचारतो..

" हो आता इथे आलोच आहोत तर घेऊया... " आणि शालिनी गाडीचा दरवाजा खोलून बाहेर येते..

विशाल तिला हात देतो पण ती त्याचा हात धरत नाही..

विशाल आणि शालिनी हॉटेल च्या आत जातात, सामोरं डायनिंग असत त्यावर विशाल आणि शालिनी बसतात..

वेटर येतो, " येस सर.. " वेटर बोलतो..

" दोन कॉफी... " वेटर ला विशाल ऑर्डर देतो..

" बाकी हॉटेल छान आहे... " शालिनी बोलते, सुरवात कुठून करायची म्हणुन शालिनी फॉर्मॅलिटी म्हणुन बोलते..

" सकाळ पासुन मि तुला इतके कॉल केले, पण तु एकही कॉल घेतलास नाही ? " विशाल बोलतो..

" नाही ते थोडी कामात होती... " शालिनी बोलते..

" अरे वाह, छान उत्तर...म्हणजे मुद्दाम घेतलास नाही, मि बडबडलो त्यावेळेस त्याचा राग की... अजुन काही? "विशाल विचारतो.

" मला काही राग वगरे नाही, खरंच कामात होते दुसऱ्या.. " शालिनी बोलते..

" बरं उद्या पासुन ऑफिस जॉईन कर.. तुझ्या सारख्या एम्प्लॉयी ची कंपनीला गरज आहे.. " विशाल बोलतो..

क्रमश...

🎭 Series Post

View all