Login

साथ आपली शतजन्माची भाग - १

नि:स्वार्थीपणाने केलेल्या प्रेमाची किंमत उशीरा का होईल समोरच्याला आत्मसात होते.

©®प्रज्ञा बो-हाडे

जलद कथामालिका लेखन

रीया आणि प्रणव लहानपणा पासून एकमेकांचे शेजारी असल्याने प्रत्येक क्षण दोघे आनंदाने साजरे करत असायचे. बाहुलांचे लग्न लावता लावता दोघांच लहानपणी खोट-खोट लग्न देखील लावले होते. प्रणवला त्या लहानश्या वयात प्रेमाची चाहूल लागलेली होती. तो रीयाला क्षणभर ही नजरेच्या दूर होवून देत नव्हता.
रीयाला नातेवाईकांच्या लग्नाकरता मे महिन्याच्या सुट्टित गाली जावे लागले. इकडे प्रणव रीयाची वाट पाहत आजारीच पडून घेतले. रीयाचा ध्यास इतका की तहान-भूक विसरुन रीया कधी येणार घरी असे आपल्या आई-वडिलांना विचारुन हैराण करु लागला.
आपल्या मुलाच रीयावर खूप प्रेम आहे हि बाब घरच्यांनाही कळू लागली. दोघांचही वय वाढू लागले. एकत्र खेळ खेळणारे आता आपल्या अभ्यासात मग्न होवू लागले. प्रणव अभ्यासात हुशार होता. तरी आपल्याला गणितातील प्रमेय जमत नसल्याचा बहाणा करत रीयाकडे समजवायला यायचा.
रीयालाही आता प्रणवचे आपल्यावर जिवापाड प्रेम असल्याचे जाणवते. प्रेम आहे तर मग बोलून कधी दाखवणार? असा प्रश्न विचाराव अस अनेकदा मनात आले. वेळ आली की तो नक्की बोलेल. या विचाराने रीयाने देखील हा विषय काढायचा नाही असे ठरवले.

      

दिवस पुढे सरकत होते. शालेय शिक्षण संपून काॅलेजला जाण्याचे वय झाले होते. रीयाला कला श्रेत्रात रस असल्याने तीने कला शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवले.
प्रणव हुशार असल्याने घरच्यांनी त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे सुचवले. प्रणवच्या समोर बिकट परीस्थिती उभी राहिली. घरच्यांच ऐकल तर, रीयापासून दूर जावून दुस-या काॅलेजला अॅमिशन घ्यावे लागेल.
तिला अभ्यासाबाबत अडचण घेवून जाता येणार नाही. तिचे ते गोड हास्य पाहता येणार नाही. काय कराव? घरच्यांच देखील ऐकायला हव. आपल्याला एवढ कष्ट करुन शिकवले. त्यांची इच्छा पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे.
निर्णय काही केल्या ठरत नव्हता. दुस-या दिवशी फाॅर्म भरण्याची शेवटची तारीख होती.


लांब राहूनही प्रेम करता येत. आपल्या आई-वडिलांचे ऐकून प्रणवने विज्ञान शाखेत प्रवेश केला.
रीयाला या गोष्टीचा भयानक राग आला होता. तिने प्रणवशी बोलणे बंद केले होते. प्रणव तिची रोज समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता.
रीयाला वाटले, आता प्रणव आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम करत नाही. प्रेम जर असते त्याने माझ्यासारखेच कला शाखेत प्रवेश घेतला असता.


प्रणवने रीयाला पत्रा द्वारे माफी मागण्याचा प्रयत्न केला. तिला आवणा-या बांगड्यांचा सेट गिफ्ट केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रीयाची घरच्यांनी देखील समजूत काढली. रीया काही ऐकण्याच्या आणि समजून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती. प्रणवने आणलेला सेट तिने खाली फेकून दिला.
तश्या बांगड्यांचे तुकडे आजूबाजूला पसरले. प्रणवच्या डोळ्यात आसवांचे थेंब जमा झाले. बांगड्यांच्या काचा स्वत:च्या हाताने गोळा करताना प्रणव आपल्या हदयाचे चिरलेले तुकडे देखील गोळा करत असावा.


रीयाला त्यावेळी प्रणवची जरासुद्धा दया येत नव्हती. त्याच्या भावना तिच्यापर्यंत न पोहचण्याइतकी रीया निष्ठूर झाली होती. प्रणव काहीच न बोलता तिथून निघून गेला. रीयाला झाल्या घटनेचा तिळमात्रही पश्चाताप होत नव्हता.स्वत:च मत ठरवून प्रणव पासून रीया दूर गेली. रीया आता बोलायलाच तयार नाही. अभ्यासावर फोकस ठेवत प्रणव चांगल्या मार्कांनी पास होतो. रीया मात्र वेगळ्याच चक्रव्यूहात अडकली गेली.


रीया कोणत्या चक्रव्यूहात अडकली असणार ते पाहूया पुढिल भागात.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all