Login

तेरा साथ हो तो - भाग - तिसरा ( अंतिम भाग )

saathiya


तेरा साथ हो तो – भाग – ३ ( अंतिम भाग )


साधना मला माहितीय की, तुला माझा राग येत असेल. साधना \"कुणीतरी आहे आपलं ज्याला आपल्या असण्या नसण्याने फरक पडतो\" ही भावना नेहमीच सुख देते. साधना फक्त आकाश चे बोलणे ऐकत होती.


आकाश बोलत राहिला.... साधना म्हणूनच वाटतं की, एका माणसाने दुसऱ्या माणसावर एक ठराविक हद्दीपर्यंत विश्वास ठेवावा. कारण समोरच्या व्यक्तीचे निर्णय शेवटच्या क्षणी अस्तित्वाच्या भांडणामुळे बदलले तरी त्याला दोष देण्याचा हक्क नसतो.


\"त्याच्या जागी आपण असतो तर आपले निर्णय बदललेच नसते याची शाश्वती आपण देऊ शकतो का?\" हा प्रश्न स्वत:ला विचारावा. उत्तर मिळायला जितका उशीर लागेल ना तितकं महत्व असतं स्वत:च्या श्वासाला." तू शाश्वती देशील का....


पण मी हे ठामपणे सांगू शकतो कि .... माझा माझ्या प्रेमावर खूप विश्वास आहे आणि तो मी तुला भविष्यात साथ देवून पूर्ण करणार हे हि तेवढच पक्क आहे, मी ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं तिने माझ्या जवळच्या माणसांवरहि तितकंच प्रेम करावं हि माझी माफक अपेक्षा आहे आणि ती तू पूर्ण करावीस एवढचं मला वाटत, माझी अपेक्षा नक्कीच चुकीची नाही आहे, माझ्या आई- वडिलांना तू तुझ्या आई- वडिलांप्रमाणेचं समज एवढंच माझं म्हणण आहे....... आणि संसार संसार काय असतो गं – सगळ्या कुटुंबाला एकत्र ठेवून हसत खेळत पुढे जाणे हाच संसार असतो गं.....आपण एकमेकांच्या साथीने सुखाचा संसार करू बघ तू......


साधनाला आता हळू हळू हे सगळे पटतही होते.


"\"तू रागावू नकोस साधना "

"रागवत नाहीयेय रे. तू बोललास ते पटतंय मला. तू म्हणालास ना की, समोरच्याच्या जागी स्वत:ला ठेवले की समोरचा चुकीचा वागला असे कधी वाटतच नाही.

गरज वेळेनुसार बदलत असते..

पण मनाच्या अस्तित्वात मान - अपमान, आपल्यांची साथ, स्वप्न, इच्छा यांचं अढळ स्थान असतं. हे आकाशने साधनाला पटवून दिले

आणि त्यामुळेच तिने सर्व घरातल्याना सांभाळून घेऊन एकत्र राहण्याची तयारी दाखवली.. आणि भविष्यात ती बखुबी निभावली ही... आज दोघ हि त्यांच्या दोन जुळ्या मुलांबरोबर सुखाने संसार करतायत...

नमस्कार - सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे... ( देवरुख - रत्नागिरी )
0

🎭 Series Post

View all