सावन ...... आठवणीतला
___-___-___-___-___-_
दोन - चार दिवसांपूर्वीच सहज पाणी या विषयावर चर्चा सुरु झाली मैफिल मधे. चर्चा इतकी झाली की शेवटी त्या मेघराजा ला ही राहावल नाही आणि आला तो भेटीस. तर गेल्या दोन दिवसापासून न चुकता आमच्या कडे म्हणजे सोलापूर शहरात हजेरी लावत आहे.
मी तशी मुंबईत वाढलेली म्हणून पाऊस म्हंटल की मुंबईकरांच्या आठवणी फार त्या पावसा सोबत. पावसाळी खरेदी , बॅगेत लहान घडी करून प्लास्टीक पिशव्या, पर्स मधे मावेल अशी लहानशी छत्री, शाळकरी विद्यार्थी पुस्तकांना पारदर्शी मोठ्या कॅरीबेग ( पिशवी ) मधे पुस्तक वह्या नीट नेटक ठेवणे, पावसाळी चपलांची खरेदी , ऑफीस जाणारे लोक एखाद एक्स्ट्रा कपडे सोबत घेऊन जाणे असे नाना प्रकारचे मुंबईकर अख्या मुंबईमधे भेटतील. सण उत्सवां सारखा तो पाऊस मस्त पैकी तीन महीने सोहळाच त्याचा. मे एकतीस उलटताच सर्वच आतुरतेने त्याची वाट पाहतात. त्यातही मुंबई म्हणजे लगबग वेगळीच. आमच्या मुंबईत पाऊस बहोत पडताय ना ! सोलापुर वाल्यांच्या नशीबी ते सुख काय नाय. नसू देत मी वळते पावसाळ्या कडे.
तर हा पाऊस असा धो-धो कोसळणारा. आधी उकाड्या मुळे पावसाची वाट पाहणारे नंतर चांगलेच हैराण होतात. मग मधेच कधीतरी तोंड दाखवायला आलेल्या नवीन नवरी सारखा सूर्य आपली कोवळी किरणं घेऊन येऊ पाहतो पण खट्याळ ढग त्याला येऊ देतील कसे ? जेव्हा असा ऊन जर आलाच समजा मग आमच्या चाळीतील बायकांची लगबग ओल्या व पावसा व्यवस्थित न वाळलेल्या त्या कपड्यांना ऊन दाखवण्या साठी. ही लगबग बिल्डींग मधेही अशीच असते याचा अनुभव येत आहे आता.
आम्ही होतो अंधेरी पूर्व येथील मरोळ पोलीस कॅम्प येथे राहायला. माझ्या आजोबांच्या काळातील घर त्या चाळीत. कडीयाची नातवंड म्हणून तरी बरीच ओळख होती जुन्या लोकांमधे. आम्ही राहत असलेल्या ठिकाणी बर्यापैकी जंगल होत. म्हणून अगदी खेड्यात राहिल्या सारखच वाटायच. मुंबईत लहानस खेडंच जणू. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनतर अधे मधे लागणाऱ्या पावसाळी सुट्टया जेव्हा जेव्हा हाय अलर्ट घोषित करण्यात यायचा. त्यात आमची शाळा आय ई एस मिठा नदीच्या काठावर. पोलीस कॅम्प मधील मुल पुल ओलांडून शाळेत जात होती म्हणून नदी भरली की पोलिसांच्या व शाळेतील शिपाई दादांच्या मदतीने आम्ही ये जा करत होतो. जास्तच पाऊस पडू लागला तर अर्ध्यातून शाळेत पालक येऊन मुलांना घेऊन जायची मुभा होती. मग घरी शेजारी आमच्या आया मोर्च्याला निघाल्या सारखे गट करून शाळेत घ्यायला येत. त्यात छत्री असायची म्हणून डोक व खांदा सोडला तर आई जवळपास पूर्ण भिजलेली असायची. कधी कोणी जर येऊ शकल नाही तर त्यांच्याही मुलांना जबाबदारीने सोबत घेऊन यायचे व सुखरूप घरी सोडायचे त्यांच्या. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी .
या पावसात धमाल मजा यायची. सगळ्या शेजारच्या बायका आई मिळून उन्हाळ्यात बनवलेल्या वाळवणी चे पदार्थ सगळ्यांच्या घरात तळले जात असत. कधी तरी वडा पाव. मुंबई मधे असलो तरी घरासमोर मुबलक जागा होती म्हणजे अंगण हे होते घराला. पावसाळ्या मधे जास्तीच्या दोऱ्या कपडे वाळवण्या साठी?. दोऱ्या काय ते तोरणच प्रत्येकाच्या दारातले कधी ही पाहा कपडे हे लटकलेलेच त्यावर. मजा अशी यायची काय सांगू आता. रोज सकाळी सहा नंतर घरात गजर असायचा त्यात एकच वाजायच "मेरी चड्डी कैसा नही सुखी ? वो काले की बराबर सुकती" बरं असा बोलणारा माझा दादा. आजवर काय याचा राझ कळाला नाही नेमकी त्याचीच ओली कशी राहते ? मग तो लहान भावाची टाइट झाली तरी घालायचा मग दुसऱ्या दिवशी परत आधी छोट्याची वाळली का पाहायचा तेव्हा ती पण ओलीच असायची. खूप हसू यायच मला. शाळेला निघण्या आधी न्यूज पाहायचच रेडी होता होता. मग मस्त हलत झुलत शाळेत पोहचायचयं. शाळेत ते पायऱ्या वरून वाहणार पाणी त्याचा खळखळाट एवढ छान वाटायच मन प्रसन्न प्रसन्न.
या बायका घरी काय करायच्या तर आम्ही गेल्यावर आधी चहा पित असतील. चहा - चपाती नंतर काम. अस आम्ही शाळेत विचार करत होतो. आई आता काय करत असेल ? दुपारी घरी येता येता दोन वाजायचे चाळीत एंन्ट्री केली तस देसाई यांच घर तिथे काय एवढा पाऊस लागत नव्हता. मग पुढे पुढे चालत आल की मिर्झा च्या घराजवळ पाणी वाहत जायच फरशी वरून त्यात पाय धुवायचे. थोड पुढे आल्यावर शेडगेंच्या कोपर्याला भदा-भदा पाणी पडायचं पत्र्यावरून तिथेच छत्री उघडायची रेनकोट घातल असेल तर टोपी डोक्यावर घ्यायची. पुढे झेंडे सरांच्या क्लासेस जवळ गटारात जाणार उतार असल्याने भरपूर पाण्याचा वेग असायचा त्यात दोन चार उड्या मारायच्या हे सर्व कोणी पाहत नाही याची सतर्कता घेऊनच केल जायच. पुढे आलं की साताऱ्याच्या मुलाणी भाभीच घर चांगल मोठ येता येता खिडकीत नजर टाकायची तसच काय बनवलं विचारून पुढे जायच म्हणजे आई ने बनवलेल आवडल नाही तर तेवढीच सोय आपली. असच करत आठवडा निघून जायचा. रोज दिवस मावळतीला आला की कधी एकदा बाबा घरी येतात वाट पाहायची. ट्रॅफीक ओ मुंबईतल फार ते तास तास त्याच्यातच उभे राहा. कोणी ट्रॅफीक पोलीस ते पिवळे अथवा पारदर्शी रेनकोट घालून आपल काम चोखपणे बजावत असायचे. सगळ्यांनाच घरी जायची घाई. त्यावेळी चारचाकी गाडी म्हणजे अप्रुप आता काय तेवढ वाटत नाही. चारचाकी च्या काचा चढलेल्या त्यावर फॉग जमलेल. रांगेत सर्व गाड्या उभ्या त्यात वरून पाऊस रिमझीम रिमझीम रुम झूम रुम झूम. रेडीओ एफ एम चालू सर्वांचे त्यावर मंद संगीतातील रोमांचक गाणी ऐकत तास निघून जायचा. फोन वगैरे आता सारखे नव्हते म्हणून फोन बघण्यात कोणी व्यस्त नव्हते. त्या ट्रॅफीक च्या गर्दीत कोणी उकळेले शेंगदाणे , मक्याची कणस , तर कोणी गजरे विकत त्यांची एक वेगळीच जंग तेवढ्यात पावसात पोटा साठी फक्त. बाबा एकदा का घरी आले मग कस जीव भांड्यात पडायचा आनंदात की काय नेमक आईच्या हातून भांडी पडायची. मग सुरू न्यूज , वाफाळता गरम गरम पांढरा शुभ्र भात, पिवळी डाळ फोडणीची सोबत सकाळ पासून न हललेल्या चपात्या आणि ज्वारीची भाकरी सोबत काही तरी भाजी तर कधी मच्छी पाणी सुटल तोंडाला सोलापुरात काय मिळणार अस.
शनिवार रविवार सुट्टी मग आम्ही पेपर उगाच चाळत बसायच शाळेचा गृहपाठ करायचा. कराळे मामींच्या दारातून पुढे असण्याऱ्या घसरगुंडी ( ती गांड्या साठीची ) त्यावर उगच कपडे घासत घसरत जायच. पंचतंत्र पाहायच. इडली , वडे , डोसा हा बेत जवळपास लोकांच्या घरी असायचाच. मग " मच्छी वाला , मच्छी वाला" करत मासे विकणारे फिरायचे गल्लीतून. सकाळी पाव वाला आला की लहान भाऊ बरोबर वेळ लावून ठेवत असे पैसे वगैरे घेऊन मग " अंकल कड़क वाला दो" म्हणत कडक नरम पाव घेऊन सरळ चहाच्या वाडग्यावर.
मच्छी वाला आला दारात मग मुलाणी भाभी थांबवत मग एक - एक करून सगळेच जमणार. आम्ही नाका मुरडत तिथेच उभे राहणार दुरुन लतिका अगदी किळस आल्यासारख पाहायची शाकाहारी होती ती म्हणून.
मुलाणी भाभी " अरे भैय्या देख के लगाओ ज्यादा डालो मच्छी साफ करके इतनाच होताय" म्हणत जास्त मच्छी तर घ्यायच्याच वरून त्यालाच साफ करून दे म्हणायच्या. कराळे मामी डबे बनविण्यात बिझी मग मम्मी म्हणायची " जा पप्पी की माँ को बुला झिंगे अच्छे है बोल" निरोप धाडायची अगदी एका घराच्या अंतरावर. सगळे मग त्या भैय्याची टोकरी खाली करत पावसात दोन चार दिवसाच भागायच फ्रिज करून ठेवली तर. त्यावर मुलानी भाभी " देख मै ली तो सबने लिया अब मुझे भाव कम करके दे" म्हणत बिचाऱ्या मासे वाल्या कडून शेवट आपलच खरं करून घेत. आता पुढे मासे फ्राय करायचे का सुक बनवायच का करी बनवायची यावर दुपारच किंवा रात्रीच मेन्यू फिक्स. बाबा घरी असले की ते कॅसेट लावायचे आम्ही तिघे वेंधळ्या सारख आत एक बाहेर एक बसायचो जरा पाऊस नसला तर मग हाताला कोणाच्या लागलो तर शपथ. कॅसेट लावून बाबा खिडकीतून बाहेर पाहात उभे राहत सकाळी कव्वाली , नंतर मस्त जिंदगी प्यार का गीत है मग अशीच गाणी सुरु. त्या गाण्यांच अर्थ आज कळत आहे. जेव्हा आयुष्य आम्हाला नाचवतोय.
असा हा पाऊस पुन्हा आम्हाला मिळणे शक्य नाही. मनसोक्त भिजायचं त्या पावसात. मला तर नुसते भिजायला कारण हवे असायचे. शाळेतील वर्ग मित्र मैत्रिणी हे देखील माझ्या सारखे वेडेच कॅम्प मधे राहाणारे पोलिसांची पोरं ते खेकडे विकायचे चक्क. मला आपल गांडूळ पकडण्यातच मजा यायची. आता मुलाला पकडे म्हटलं तर नकटं कुठच "ईईई ... मै नही पकडूंगा " म्हणतो. पाऊस बाहेर धो - धो कोसळायचा आम्ही पाहायच त्याला घरातूनच या भाबड्या आशेने की शेजारच्याने काही चमचमीत बनवलं असेल तर आणून द्याव की नाही लवकर. बाबा च्या ऑर्डर वर मग मूग, चणे, शेंगदाणे, असे एका मागे एक आई मीठ लावून भाजून द्यायची. मग काय बसायच एक दोन पडलेले दात घेऊन चणे चबाते. आमच्या येथे सार्वजनिक शौचालय होते जवळच होते पण पावसाळ्यात मी तर कधी पाण्याची बादली भरून घेऊन गेलल आठवत नाही. जाता येता वाटेत एवढ पाणी पडायच वरून आणि प्रत्येकाच्या दारात बादल्या, पाण्याचे टप ठेवलेलेच असायचे एक तर पाऊस मग छत्री धरा एका हातात व दुसऱ्या हातात भरलेली बादली मला सुकाळ्यात धड चालता येत नव्हत मग पावसाळा त्यात मग जायचे खाली बादली घेऊन टॉयलेट च्या नजीक असणाऱ्यां पैकी एकाच्या टपातून घ्यायच पानी सर्वांना माहित होत म्हणून ओरडण्याचा प्रश्न नाही. सांगायच काय तर अगदी गरजेला जाणही ऍन्जॉय केल. मग मोठे झालोत मनातील ओलावा गेला तसा ओलावा किचकट वाटू लागला. पावसात चिंब भिजणार पण घरात फरश्या ओल्या नको आहे की नाय गंम्मत. काय लिहू नी काय नको झालय. असो पण आता बालपणीचा पाऊस मिळणे कठीणच. सगळ कस सोनेरी क्षण होते ते किती किंमत मोजली तरी बालपण मिळणार नाही. तो बालिश पणा आता शोभणार ही नाही भले खोटा मोठेपणा गुंडाळून फिरलो तरी चालेल. ती निरागसता, प्रत्येक क्षणात आनंद शोधणे पुन्हा जमणार नाही.
वाचल्या बद्द्ल धन्यवाद ! तुम्ही देखील तुमच बालपण कमेंट मधे नक्की शेअर करा थोडक्यात. आवडेल मलाही. लेख कसा वाटला नक्की कळवा तसेच शेअर करायला विसरू नका.
लेखिका : अहाना
( सदर लेख नावासकट शेअर करण्यास हरकत नाही. कृपया नाव बाजूला काढून शेअर करू नये ) .

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा